बुलबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुलबुल /
वल्गुवदाद्य
Red-vented Bulbul (Pycnonotus cafer) feeding at Kapok (Ceiba pentandra) at Kolkata I IMG 2535.jpg
शास्त्रीय नाव वल्गुवदाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश पिक्नोनोटिडी (Pycnonotidae)

बुलबुल अर्थात वल्गुवदाद्य (शास्त्रीय नाव: Pycnonotidae, पिक्नोनोटिडी ;) हे चटकाद्या श्रेणीतील पक्ष्यांचे एक कूळ आहे.

वर्णन[संपादन]

बुलबुल मध्यम आकारमानाचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे पक्षी आहेत. यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजूस केसांसारखी विकसित पिसे असतात. बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. हे जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.

आवाज[संपादन]

Redvented Bulbul.ogg लाल बुडाच्या बुलबुलाचा आवाज

आढळ[संपादन]

या पक्षिकुळातील जाती मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडांत आढळतात.

खाद्य[संपादन]

फळे, कीटक, मध हे बुलबुलांचे मुख्य खाद्य आहे.

घरटे[संपादन]

बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

  • डॉ. म.वि. आपटे. प्राणिसृष्टी भाग दुसरा.
  • मारुती चितमपल्ली. पक्षिकोश.
  • रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन. दक्षिण भारतातील पक्षी.
  • सलीम अली. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • सलीम अली व एस. डिलन रिपली. अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉंटिनेंट (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • रिचर्ड ग्रिमेट, कॅर्ल इन्स्किप, टिम इन्स्किप. पॉकेट गाइड टू द बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉंटिनेंट (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]