कादंबरीकार
कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते. मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.
इतिहास
[संपादन]इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या संस्कृत लेखकाने केले. दहा कुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली कादंबरी आहे असे काही इतिहास तज्ज्ञ मानतात. तसेच सॅतिरिकॉन हे इ.स पूर्व ५० मध्ये लिहिलेली रोमन काव्य कादंबरीही आद्य कादंबरी मानली जाते. मात्र कथावस्तू असलेली, सातव्या शतकात बाणभट्ट लिखित कादंबरी नावाचा ग्रंथ हीच पहिली कादंबरी मानली जावी असे अनेकांचे मत आहे.
या 'कादंबरी' ग्रंथावरून मराठीत काल्पनिक अनेक प्रकरणे असलेल्या लेखनास कादंबरी हे नाव पडले. हिंदी भाषेत या लेखन प्रकारास उपन्यास म्हणतात, तर गुजराथीत नवलकथा.
जपानी लेखिका मुरासाकी शिकिबू याही एक आद्य कादंबरीकार मानल्या जातात. त्यांनी अकराव्या शतकात गेंजी मोनोगातरी नावाची पहिली कादंबरी लिखित स्वरूपात निर्माण केली.
लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ.स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.
बाबा पद्मनजी यांनाही त्यांच्या यमुनापर्यटन या लेखनामुळे काही इतिहासतज्ज्ञ आद्य कादंबरीकार मानतात.
नेमीचंद्र हा कानडी भाषेतील आद्य कादंबरीकार मानला जातो. त्याने लीलावती ही कादंबरी चंपूपद्धतीत लिहिलेली आहे.
मराठी भाषेतील प्रमुख कादंबरीकार
[संपादन]- रणजित देसाई
- शिवाजी सावंत
- विष्णू सखाराम खांडेकर
- ना. सी. फडके
- जयवंत दळवी
- श्री. ना. पेंडसे
- भालचंद्र नेमाडे
- भा. रा. भागवत
- राजेंद्र खेर
- शरच्चंद्र मुक्तिबोध
- बाबा कदम
- अरुण साधू
- गोनीदा
- विश्राम बेडेकर
- सुहास शिरवळकर
- मधु मंगेश कर्णिक
- दि. बा. मोकाशी
- भाऊ पाध्ये
- विलास सारंग
- मिलिंद बोकील
- गंगाधर गाडगीळ
- रंगनाथ पठारे
- रमेश इंगळे
- व. पु. काळे
- प्रभाकर पेंढारकर
- व्यंकटेश माडगुळकर
- उद्धव ज. शेळके
- कैलास दौंड
- ना. सं. इनामदार
- अंबरीश मिश्र
- देवदत्त पाटील
- आशा बगे
- गौरी देशपांडे
- कविता महाजन
- माधुरी शानभाग
- शांता गोखले
- अंबिका सरकार
- दशरथ यादव
- बाबाराव मुसळे