असुर
असुर (संस्कृत: असुर) हा भारतीय धर्मातील प्राण्यांचा एक वर्ग आहे. त्यांचे वर्णन हिंदू धर्मातील अधिक परोपकारी देवांशी (ज्यांना सुर म्हणूनही ओळखले जाते) संबंधित शक्ती शोधणारे राक्षस म्हणून केले जाते. त्याच्या बौद्ध संदर्भात, या शब्दाचे भाषांतर कधीकधी "टायटन", "डेमिगॉड" किंवा "अँटीगोड" केले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार असुरांना सतत देवांची भीती असते. 2-6 असुरांचे वर्णन भारतीय ग्रंथांमध्ये चांगल्या किंवा वाईट गुणांसह शक्तिशाली अतिमानव देवता म्हणून केले आहे. सुरुवातीच्या वैदिक साहित्यात, चांगल्या असुरांना आदित्य म्हणले जाते आणि त्यांचे नेतृत्व वरुण करतात, तर दुष्ट असुरांना दानव म्हणतात आणि त्यांचे नेतृत्व वृत्र करतात. 4वैदिक ग्रंथांच्या सुरुवातीच्या थरात अग्नी, इंद्र आणि इतर देवतांना असुर देखील म्हणले आहे, ते त्यांच्या संबंधित डोमेन, ज्ञान आणि क्षमतांचे "स्वामी" आहेत या अर्थाने. नंतरच्या वैदिक आणि उत्तर-वेदिक ग्रंथांमध्ये, परोपकारी देवांना देव म्हणले जाते, तर द्वेषपूर्ण असुर या देवांशी स्पर्धा करतात आणि त्यांना "देवांचे शत्रू" मानले जाते. ५–११,२२, ९९–१०२
देव, यक्ष (निसर्ग आत्मे), राक्षस (भयंकर मानव खाणारे प्राणी किंवा राक्षस), भूत आणि इतर अनेकांसह असुर हिंदू धर्माचा भाग आहेत. हिंदू आणि बौद्ध धर्मातील अनेक विश्वशास्त्रीय सिद्धांत आणि दंतकथांमध्ये असुरांना वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे.[१]
असुर किंवा दैत्य हे हिंदू पुराणांत वर्णिलेले लोक आहेत. असुर हे सुर (देव) नाहीत असे लोक होय. असुरांकडे देवांप्रमाणेच अमानवी शक्ती असते.[२]
अगदी सुरुवातीच्या वैदिक ग्रंथांमध्ये अग्नी, इंद्र व इतर देवांचा उल्लेख असुर (ज्ञान, शक्ती आणि प्रदेशांचे अधिपती या अर्थाने) असाच केलेला आहे. नंतरच्या वैदिक साहित्यामध्ये आणि वेदोत्तर साहित्यामध्ये देव आणि असुर हे एकमेकांचे शत्रू असून ते एकमेकांवर सतत कुरघोडी करीत असल्याचे आढळते. असुरांचे दोन गट असून त्यांतील 'सुष्ट' असुरांचा नेता वरुण आहे तर 'दुष्ट' असुरांचा नेता वृत्र होय.[३]
असुर हे राक्षस, यक्ष किंवा दस्यु या लोकांसमान असले तरी हे गण एकच नाहीत.
शुक्राचार्य - असुरांचा गुरु
प्रसिद्ध असुर
[संपादन]- अघासुर : बकासुराचा भाऊ ; याला कृष्णाने मारले.
- अंधकासुर : हिरण्याक्षाचा मुलगा. आपल्या शक्तीमुळे हा इतका ताठला की याला पुढचे मागचे काही दिसेना. त्याने पार्वतीला पळवून नेले होते. शंकराने याचा नाश करून पार्वतीला सोडविले आणि अंधकासुराचे रूपांतर वास्तुपुरुषात केले.
- अनलासुर : हा सतत आग ओकणारा असुर होता. पर्वताएवढा मोठा होऊन गणपतीने या असुराला गिळले. पोटात आग होऊ लागल्याने गणेशाने दुर्वा सेवन केल्या.
- अपस्मार (असुर) : शंकराच्या नटराज रूपात त्याने उजव्या पायाखाली दाबून ठेवलेला राक्षस.
- अरिष्टासुर : याला श्रीकृष्णाने बालपणीच वध केला. ह्याचेच दुसरे नाव वृषभासुर.
- आग्यासुर : असुर जमातीची देवता.
- काकासुर :श्रीरामाने बालपणीच गळा दाबून वध केला.
- कामासुर : याला मुकाम्बिका देवीने मारले.
- कालकंज : विटांची शिडी करून त्यावरून स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करणारे असुर. इंद्राने त्याची वीट काढून घेतल्यामुळे हे धडाधड कोसळले.
- किर्मीरासुर :बकासुराचा भाऊ. भीमाने याचा वध केला. (हा असुर नसून राक्षस असावा.)
- कैटभ : मधु-कैटभ जोडीतला अेक.
- कोयलासुर : असुर जमातीची देवता.
- कोल्हासुर : केशी राक्षसाचा मुलगा ,कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्रीमहालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला.
- गजासुर : हा महिषासुराचा मुलगा. इच्छेनुसार कधीही हत्ती होऊ शकत असे. ब्रह्मदेवाने याला कामवासनेने वश होणाऱ्या व्यक्तीकडून मरण येणार नाही असा वर दिला होता. शंकराने याला मारून याचे डोके गणपतीला बसवले.
- गयासुर : याच्या पाठीवर शिळा ठेवून देवांनी यज्ञ केला, आणि त्याला मुक्ती दिली. बिहारमधल्या ज्या ठिकाण हे घडले तेथे गया नावाचे शहर आहे.
- घोरासुर : घोरत असलेल्या माणसाला मराठीत घोरासुर म्हणतात. आणि त्याच्या घोरण्यातून निर्माण होणाऱ्या संगीताला 'घोरासुराचे आख्यान'. या देवीपुराणात 'महिषासुराचा' उल्लेखही केला आहे.
- जंभासुर : श्रीदत्तात्रेयाची पत्नी अनघालक्ष्मी देवीने वध केला.
- तारकासुर : याचा कार्तिकेयाने वध केला.
- त्रिपुरासुर : याला भगवान शंकराने मारले, आणि त्यांची तीन नगरे (पुरे) जाळून टाकली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरान्तक पौर्णिमा म्हणतात.
- धेनुकासुर : गाढवाच्या वेशातल्या या असुराच्या तंगड्या धरून छोट्या बलरामाने त्याला झाडावर आपटले. त्यातच त्याचा अंत झाला.
- नरकासुर : सत्यभामेने वध केला. याचेच नाव भौमासुर. याच्या कैदेत असलेल्या १६,१०० स्त्रियांना श्रीकृष्णाने पत्नी म्हणून स्वीकारले. नरकासुराचा वध ज्या दिवशी झाला त्या आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी भारतात दिवाळीचा पहिला दिवस- नरक चतुर्दशी- साजरा होतो.
- पंचजन दैत्य : शंखासुराचे दुसरे नाव.
- पुलोमा हा असुरांचा राजा होता. याच्या पुलोमी नावाच्या कन्येचा इंद्राशी विवाह झाला होता.
- प्रलंबासुर : याचा बलरामाने वध केला.
- बकासुर : एकचक्रा नगरीच्या जवळ राहणाऱ्या खादाड आणि नरभक्षक बकासुराला भीमाने बुकलून बुकलून मारले. २. बगळ्याच्या रूपात असलेल्या एका बकासुराला गायी चरायला आलेल्या श्रीकृष्णाने गळा दाबून मारले.
- बली : श्रीविष्णूने याला बटुरूपात येऊन पाताळात धाडले.
- बाणासुर : श्रीकृष्णाने वध केला.
- भस्मासुर : श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन याला भस्मसात केले. हाच वृकासुर.
- भौमासुर : नरकासुराचेच दुसरे नाव. याच्या कैदेत असलेल्या १६,१०० स्त्रियांना श्रीकृष्णाने पत्नी म्हणून स्वीकारले.
- मधु-कैटभ : राक्षसांचे पूर्वज असुर. यांचा वध भगवान विष्णूने केला; म्हणून त्याला मधुसूदन आणि कैटभाजित् ही नावे मिळाली. मार्कंडेय पुराणानुसार कैटभाचा वध दुर्गॆने केला, म्हणून दुर्गेला कैटभा हे नाव मिळाले.
- मयासुर : त्वष्ट्याचा हा पुत्र मोठा स्थापत्यकार होता. पांडवासाठी याने मयसभा बांधली. २. रावणपत्नी मंदोदरीच्या वडलांचे नावही मयासुर होते.
- महिषासुर : ह्याचा वध दुर्गादेवीने केला. या वधाअगोदर महिषाने समस्त देवींचा जबरदस्त पराभव केला होता. दुर्दशा झालेल्या या तमाम देवी मदत मागण्यासाठी दारोदार फिरल्या. इंद्र त्यांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. त्याने या देवींना शिवाकडे पाठवले आणि शिवाने विष्णूकडे. विष्णूने महामाया दुर्गेला सांगितले आणि शेवटी या दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला.
- मुकासुर : याला मुकाम्बिका देवीने मारले.
- रावण : रामायणातला खलनायक
- लवणासुर : याने मथुरा नगरी सजवली. हा मधुदैत्याचा मुलगा होता. जिचे लक्ष्मणाने नाक-कान कापले ती शूर्पणखा लवणासुराची मावशी.
- लोहासुर : असुर जमातीची देवता.
- वत्सासुर : गाईच्या वासराच्या (वत्साच्या) रूपात गायरानात आलेल्या या असुराला कृष्णाने पोटात ठोसे मारून ठार केले.
- असुर वरुण : पारसी लोकांचा देव -अहुर मज़्दा अवस्ताई भाषा.
- वलासुर : हे अनेक होते. ऋग्वेदातील कथेनुसार देवांच्या पणी नावाच्या नोकरांनी देवांच्या गायी पळवून त्या आपल्या देशात (फिनीशियात) नेऊन वलासुरांच्या पहाऱ्यात ठेवल्या होत्या. सरमा नावाच्या कुत्रीने त्यांचा शोध लावला. इंद्राने गाई सोडवून आणल्या.
- असुर वातापि : दक्षकन्या दनूचा मुलगा. याला नरकासुर आदी नऊ भाऊ होते. याचे नाव महाभारतात आले आहे.
- वृकासुर : भस्मासुराचे आधीचे नाव. २. शकुनीच्या एका मुलाचे नाव वृकासुर होते.
- वृत्रासुर : याला देवराज इंद्राने दधीची ऋषीच्या हाडांपासून बनवलेल्या वज्राने मारले.
- वृषभासुर : अरिष्टासुराचे दुसरे नाव.
- व्योमासुर : कंसाच्या या गुप्तहेराने खेळातल्या मेंढ्या बनलेल्या बाल कृष्णाच्या सवंगड्यांना आपल्या गुहेत लपवून ठेवले. कृष्णाने त्याला शोधले आणि ठार केले.
- शंकासुर : निष्कारण शंका काढणाऱ्या माणसाला शंकासुर म्हणतात.
- शंखचूड़ : पूर्वजन्माच्या वेळी श्रीकृष्णाचा मित्र गोप सुदामा होता, त्याला राधाने असुर योनीत जन्म घेण्याचा शाप दिला.
- शंखासुर : या नावाचा एक दैत्य समुद्रात रहात असे. त्याला पंचजन हे आणखी एक नाव होते. त्याच्या शरीरावर पांचजन्य नावाचा शंख होता. श्रीकृष्णाने समुद्रात बुडी मारून पंचजनाला मारले आणि शंख ताब्यात घेतला. संकासुर नावाचा पुष्पवृक्ष.
- असुर शुम्भ- निशुम्भ : देवीमहात्म्यानुसार कालिका देवीने वध केला.
- असुर स्वरभानु (राहु/केतु):श्रीविष्णूने मोहिनीरूप घेऊन सुदर्शनचक्राने दैत्यासुर राहुचा शिरच्छेद केला.
- संकासुर : हे एका पुष्पवृक्षाचे नाव आहे. काही लोक या झाडाला शंखासुर म्हणतात. इंग्रजीत Peacock Flower Tree. शास्त्रीय नाव - Caesalpinia pulcherrima
- सिंधुरासुर : या असुराचा वध गणपतीने केला. त्यावेळी गणपती मोरावर बसून आला होता. ज्या ठिकाणी हा वध झाला तेथे, म्हणजे मोरगावात, अष्टविनायकांतले मयुरेश्वराचे देऊळ आहे.
- हयग्रीवासुर : विष्णूपुराणनुसार मस्त्यावतारात विष्णूने एका राक्षसाला मारले होते. या हयग्रीव राक्षसाने ब्रह्माकडून वेद चोरून समुद्रात लपविले होते.
- हिडिंब : हा असुर नसून किर्मीरासुराप्रमाणे राक्षस होता.
- असुर हिरण्यकशिपु हिरण्यकशिपू : श्रीविष्णूने नृसिंहरूप घेऊन हिरण्यकशिपूचा तीक्ष्ण नखांनी वध केला.
- असुर हिरण्याक्ष : श्रीविष्णूने वाराहरूप घेऊन हिरण्याक्षलाचा तीक्ष्ण दातांनी वध केला.
रावणावरील पुस्तके
[संपादन]- असुर - एका पराभूताची गोष्ट (आनंद नीलकांतन); मंजुल पब्लिशिंग हाऊस
- असुर : शक्तिशाली साम्राज्याचा अस्त - रावणाची आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा (आनंद नीलकंठन)
- असुरेंद्र (ना.बा. रणसिंग) : लंकाधिपती रावणाची गोष्ट
- महात्मा रावण (डॉ. वि.भि. कोलते)
- रावण राजा राक्षसांचा (शरद तांदळे)
वेद आणि महाभारत वाचल्याने आपल्याल समजते की तेव्हा देव, दैत्य, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग आदि। जाती होत्या. देवतांना सुर, तर दैत्यांना असुर म्हणत. देवतांची उत्पत्ती अदिति पासून, तर दैत्यांची दिति पासून झाली. दानवांची दनूपासून तर राक्षसांची सुरसापासून झाली. गंधर्वांची उत्पत्ती अरिष्टापासून झाली. या सर्व कश्यपाच्या भार्या होत्या. अशाच प्रकारे यक्ष, किन्नर, नाग वगैरेंची उत्पत्ती मानली गेली आहे.
सुरुवातील सर्व महाद्वीप एकमेकांना जोडलेले होते. या जोडल्या गेलेल्या धरतीची ७ बेटांमध्ये वाटणी झाली होती. जम्बू द्वीप, प्लक्ष द्वीप, शाल्मली द्वीप, कुश द्वीप, क्रौंच द्वीप, शाक द्वीप आणि पुष्कर द्वीप. या सर्व बेटांच्या मध्यभागी जम्बू द्वीप होते.
सुरुवातीला जंबूद्वीपाचे ९ खंड होते. थे : इलावृत, भद्राश्व, किंपुरुष, भारत, हरिवर्ष, केतुमाल, रम्यक, कुरु आणि हिरण्यमय. याच क्षेत्रावर सुर आणि असुर यांचे साम्राज्य होते.
काही लोक मानतात, की ब्रह्मा आणि त्याच्या कुळातले लोक धरतीवरचे नव्हते. त्यांनी आक्रमण करून मधु और कैटभ नावाच्या दैत्यांचा वध करून आपल्या कुळाचा विस्तार केला होता. तेव्हापासून धरतीवरील दैत्यांच्या आणि स्वर्गातल्या देवतांच्या दरम्यान लढाई सुरू झाली.
देवता आणि असुरांची ही लढाई चालत राह्यली. जम्बूद्वीपच्या इलावर्त (रशिया) क्षेत्रात १२ वेळा देवासुर संग्राम झाला. शेवटी हिरण्यकशिपुचा पुत्र प्रल्हाद याचे नातू आणि विरोचनाचे पुत्र व राजा बलि यांच्याबरोबर इंद्राचे युद्ध झाले. देवता हरल्या आणि संपूर्ण जम्बूद्वीपावर असुरांचे राज्य झाले. जम्बूद्वीपाच्या मधोमध इलावर्त राज्य होते.
काही लोक असे मानतात की सर्वात शेवटी बहुधा शंबासुराशी युद्ध झाले, त्या युद्धात राजा दशरथानेसुद्धा भाग घेतला होता.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Asura". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-12-12.
- ^ Wash Edward Hale (1999), Ásura in Early Vedic Religion, Motilal Barnarsidass, आयएसबीएन 978-8120800618, pages 2-6
- ^ Wash Edward Hale (1999), Ásura in Early Vedic Religion, Motilal Barnarsidass, आयएसबीएन 978-8120800618, page 4