अमोल पालेकर
अमोल पालेकर | |
---|---|
जन्म |
अमोल कमलाकर पालेकर २४ नोव्हेंबर[१], इ.स. १९४४ मुंबई, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शन |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९७१ -आजपर्यंत |
भाषा |
मातृभाषा: मराठी अभिनय: मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट | गोलमाल (हिंदी चित्रपट), रजनीगंधा |
पुरस्कार | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार (इ.स. १९७९) |
वडील | कमलाकर पालेकर [२] |
आई | सुहासिनी पालेकर [२] |
पत्नी | संध्या गोखले |
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.[१]
पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.
मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.
मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.
त्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे.[३]
वैयक्तिक जीवन
[संपादन]अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत[२]. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे[२][४][५] पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.[६].
अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके
[संपादन]मराठी:
- अवध्य
- आपलं बुवा असं आहे
- काळा वजीर पांढरा घोडा
- गार्बो
- गोची
- पार्टी
- पुनश्च हरि ॐ
- मी राव जगदेव मार्तंड
- मुखवटे
- राशोमान
- वासनाकांड
हिंदी :
- आधे अधुरे
- चूप कोर्ट चालू है
- पगला घोडा
- सुनो जनमेजय
- हयवदन
अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट
[संपादन]- आक्रीत (मराठी)
- थोडासा रूमानी हो जाय (हिंदी)
- धूसर(मराठी)
- ध्यासपर्व
- पहेली (हिंदी)
मानसन्मान
[संपादन]- २१ व २२ जानेवारी, इ.स. २०१२ या दोन दिवशी सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान अमोल पालेकरांना मिळाला होता.
- झेनिथ एशिया सन्मान (डिसेंबर २०१८)
- फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार - इ.स. १९७९ साली गोलमाल या चित्रपटासाठी.
- विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. अमोल पालेकर यांना इ.स.२०१२ साली हा पुरस्कार मिळाला आहे.
- अमोल पालेकर यांना २०१२सालापर्यंत महाराष्ट्र सरकारचे सहा पुरस्कार मिळाले आहेत.
रंगभूमीसाठी योगदान
[संपादन]अमोल पालेकर यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही त्यांची नाटके गाजली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.
चित्रपटसृष्टीतील योगदान
[संपादन]हिंदी चित्रपटांतील दमदार कारकीर्द
बासु चॅटर्जी यांच्या 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांनी हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’ यासारखे अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते मध्यमवर्गीय समाजातील नायकांचे प्रतिनिधित्व करताना दिसले.
दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून
[संपादन]- ’वी आर ऑन..होऊन जाऊ द्या’ या नावाचा एक हलकाफुलका विनोदी मराठी चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सतीश आळेकर, आनंद इंगळे, विजय केंकरे, वंदना गुप्ते, मनोज जोशी, सुहासिनी परांजपे, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि अशोक सराफ, निवेदिता सराफ, यांच्या सारखे २० प्रसिद्ध मराठी कलावंत काम करीत आहेत. पटकथा, सहदिग्दर्शन आणि निर्मिती पालेकरांच्या पत्नी संध्या गोखले यांची आहे.
अभिनेता म्हणून
[संपादन]अन्य भाषेतील चित्रपट
[संपादन]- मदर (बंगाली) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दीपंकर डे )
- कलंकिनी (बंगाली) (सहकलाकार - ममता शंकर, दिग्दर्शक - धीरेन गांगुली )
- चेना अचेना (बंगाली) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चटर्जी )
- कन्नेश्वर राम (कन्नड) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठ्यू )
- पेपर बोट्स (कन्नड आणि इंग्रजी) (सहकलाकार-दीपा, दिग्दर्शक - पट्टाभिराम रेड्डी )
- ओळंगळ (मल्याळम) (सहकलाकार - जयराम आणि अंबिका, दिग्दर्शक - बालू महेंद्र )
चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)
[संपादन]
|
संदर्भ
[संपादन]- ^ a b "'आपल्यातीलच एक' थोडासा रूमानी झाला तेव्हा..." 2015-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-24 रोजी पाहिले.
२४ नोव्हेंबर हा अमोल पालेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा याच कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
- ^ a b c d अमोल पालेकर: बातों बातोंमें
- ^ "Star touch to animated film on HIV/AIDS". The New Indian Express. 27 November 2010. 16 December 2010 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ Silvers of the year Archived 2011-09-27 at the Wayback Machine..
- ^ "Amol Palekar is back in action, this time with an English language ..." Indian Express. 2 August 2010. 13 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Amol Palekar at ibnlive". 2008-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अमोल पालेकर चे पान (इंग्लिश मजकूर)
- राष्ट्रीय पुरस्कार यादी इ.स. २००१
- ग्रेटभेटमध्ये अमोल पालेकर Archived 2010-12-02 at the Wayback Machine.