२०१७ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग ३
२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन | |||
---|---|---|---|
दिनांक | २३ – ३० मे २०१७ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | ५०-षटके | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी | ||
यजमान | युगांडा | ||
विजेते | ओमान | ||
सहभाग | ६ | ||
सामने | १८ | ||
सर्वात जास्त धावा | भाविंदू अधिहेट्टी (२२२) | ||
सर्वात जास्त बळी | खावर अली (१४) | ||
|
२०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन ही क्रिकेट स्पर्धा २३ ते ३० मे २०१७ दरम्यान युगांडा येथे पार पडली.[१] स्पर्धेतील सामने लुगोगो, क्याम्बोगो आणि एंटेबी येथे पार पडले.[२] स्पर्धेतील ओमान आणि कॅनडा ह्या पहिल्या दोन स्थानांवरील संघांना, विभाग दोन मध्ये बढती मिळाली.[३] पावसामुळे अंतिम सामना अनिर्णित राहिला आणि गट फेरीतील पहिल्या स्थानावर राहिल्याने ओमानला स्पर्धेतील विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले.[४]
स्पर्धेच्या यजमानपदासाठी कॅनडा, मलेशिया आणि युगांडा ह्या तीन देशांनी बोली लावली होती.[५] ऑक्टोबर २०१६ मध्ये, सुरक्षाव्यवस्था आणि खर्चाची योग्य व्यवस्था असल्यास, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्पर्धेसाठी युगांडाचा प्रस्ताव मान्य केला.[६] डिसेंबर २०१६ मध्ये दोन आयसीसी अधिकाऱ्यांनी, देशाची फर्स्ट लेडी जॅनेट मुसेवेनी आणि पंतप्रधान रुहाकाना रुगुंडा यांची भेट घेतली. मुसोविनींनी ह्यावेळी स्पर्धेला पाठींबा दर्शविला.[५]
संघ
[संपादन]पात्र संघांची नावे खालीलप्रमाणे:
- युगांडा (५वे स्थान - २०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)
- कॅनडा (६वे स्थान - २०१५ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन)
- मलेशिया (३रे स्थान - २०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन)
- सिंगापूर (४थे स्थान - २०१४ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन)
- अमेरिका (१ले स्थान - २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार)
- ओमान (२रे स्थान - २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार)
मैदाने
[संपादन]स्पर्धा खालील मैदानांवर पार पडली:
- लूगोगो क्रिकेट ओव्हल, लुगोगो मैदान, कम्पाला
- क्याम्बोगो क्रिकेट ओव्हल, क्याम्बोगो युनिव्हर्सिटी, कम्पाला
- एन्टेब्बे क्रिकेट ओव्हल, एन्टेब्बे
तयारी
[संपादन]अमेरिकेने मार्च महिन्यात ह्युस्टन, टेक्सास येथे एक निवड शिबिर आयोजित केले, ज्यामध्ये प्रथम श्रेणीतील अनुभव असलेल्या इब्राहिम खलील, रॉय सिल्वा आणि कॅमिलस अलेक्झांडर ह्या तीन खेळाडूंसह ५० खेळाडू होते.[७] स्पर्धा सुरू होण्या आधी दक्षिण आफ्रिकेतील सहा दिवसांच्या दौऱ्यातसुद्धा अमेरिकेने भाग घेतला.[८] स्पर्धेपूर्वी मलेशिया संघ एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कप २०१७ स्पर्धेमध्ये खेळला,[९] कॅनडा संघ बार्बाडोस येथे काही सराव सामन्यांमध्ये सहभागी झाला[१०] आणि युगांडाने केन्याला पाच ५०-षटकांचे सामने खेळण्यास आमंत्रित केले होते.[११] कॅनडा संघ झिम्बाब्वेत तीन सराव सामने सुद्धा खेळला.[१२]
संघ
[संपादन]स्पर्धेसाठी खालील खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली:[१३]
कॅनडा[१४] प्रशिक्षक: हेन्री ओसिंडे |
मलेशिया[१५] प्रशिक्षक: बिलाल असद |
ओमान[१६] प्रशिक्षक: दुलिप मेंडीस |
सिंगापूर[१७] प्रशिक्षक: ट्रेव्हर चॅपल |
युगांडा[१८] प्रशिक्षक: स्टीव्ह टिकोलो |
अमेरिका[१९] प्रशिक्षक: पुबुदु दस्सानायके |
---|---|---|---|---|---|
लॉस एन्जेल्स येथील प्रशिक्षणादरम्यान झालेल्या हाताच्या दुखापतीतून न सावरल्याने फहाद बाबरऐवजी सागर पटेलची निवड अमेरिकेच्या संघात करण्यात आली.[२०]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "टिम्स ट्रॅव्हल टू युगांडा जस्ट थ्री स्टेप्स फ्रॉम क्रिकेट वर्ल्ड कप २०१९". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "युगांडा: मोर टूर्स फॉर क्रिकेट क्रेन्स बिफोर वर्ल्ड क्रिकेट लीग". ऑल आफ्रिका (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ओमान, कॅनडा सेक्युअर प्रमोशन; युएसए अव्हॉइड रेलीगेशन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्याने ओमानला २०१७ आयसीसी क्रिकेट लीग विभाग तीन स्पर्धेचे विजेतेपद". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "फर्स्ट लेडी प्लेजेस गव्हर्नमेंट बॅकिंग फॉर वर्ल्ड क्रिकेट लीग". डेली मॉनिटर (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "केप टाऊन येथील आयसीसी मंडळाच्या बैठकीचे परिणाम". आंतररराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अमेरिकेच्या निवड शिबिरामध्ये माजी भारतीय, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचे खेळाडू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मधल्या फळीतील फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचे अमेरिकेचे प्रशिक्षका दासनायके ह्यांचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "एमर्जिंग टीम्स एशिया कप प्रिव्ह्यू". आशियाई क्रिकेट कौन्सिल (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "कॅनडाचा बार्बाडोस दौरा". क्रिकेट कॅनडा (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "केनियाचा युगांडा दौरा". युगांडा क्रिकेट असोसिएशन (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट: कॅनडा ह्या महिन्यान झिम्बाब्वेचा दौरा करणार". न्यू झिम्बाब्वे (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन कर्णधारांना क्रिकेट विश्वचषक २०१९ चे स्वप्न जिवंत राहण्याची आशा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट कॅनडा संघ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३". क्रिकेट कॅनडा (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी मलेशिया क्रिकेट संघ". मलेशिया क्रिकेट ट्विटर (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग ३: युगांडाच्या संघाचे नेतृत्व सुलतानकडे". मस्कत डेली (इंग्रजी भाषेत). 2017-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी सिंगापूरचा संघ". फेसबूक (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "विश्व क्रिकेट लीग विभाग ३ साठी युगांडाचा संघ जाहीर". कावोवो स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "खलील आणि अलेक्झांडर अमेरिकेकडून पदार्पण करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.
- ^ "युएसए कॉन्फिडन्ट अॅज दासनायके हेल्स प्रिपेअरेशन्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१७ रोजी पाहिले.