सुर्यफूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेही पहा : सूर्यफूल

Sunflower macro wide

सूर्यफूल हे ॲस्टरेसी कुळातील वनस्पती आहे. शास्त्रीय नाव हेलीऍन्थस ॲनस आहे.हिच्या ७० प्रजाती आहेत.

यातील अनेक प्रजातींच्या बियांतून खाद्यतेल काढले जाते.

सूर्यफूल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांच्या क्षेत्रापैकी २८ % क्षेत्र सूर्यफुलासाठी व एकूण खाद्यतेलांपैकी १० % उत्पादन सूर्यफुलाच्या तेलाचे आहे. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवडीसह मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यांत प्रामुख्याने सूर्यफुलाची लागवड केली जाते. राज्याच्या एकूण सूर्यफूल क्षेत्रापैकी ७० % क्षेत्र मराठवाड्यात आहे. सूर्यफूल हे गळिताचे त्यामानाने नवीन पीक असून महाराष्ट्र राज्यात सन २००२ - २००३ वर्षी एकूण २.८९ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली होते. बियांचे उत्पन्न १.४३ लाख टन होते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ४९४ किलो आहे.

हवामान[संपादन]

सूर्यफूल हे पीक सर्व प्रकारच्या हवामानांत येऊ शकते. हे पीक महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला असतो.कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सूर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो. पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. २० डी. ते २२ डिग्री सें.ग्रे. तापमान सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक असते.

जमीन[संपादन]

सूर्यफुलाच्या वाढीसाठी वाळूमिश्रित जमीन अधिक चांगली असली तरी सूर्यफुलाच्या मुळाच्या वाढीसाठी निचरा होणारी जमीन आवश्यक असते. निचरा होणाऱ्या जमिनीत अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होऊन पिकाची वाढ जोरात होते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असल्यास सूर्यफूलाची रोपे चांगली येतात.

बीजप्रक्रिया[संपादन]

पेरणीकरिता चांगले, टपोरे बी हवे असते. बारीक बिया बाजूला काढल्या जातात. १ किलो बियाणे २५ ते ३० मिलिलिटर जर्मिनेटर आणि १ लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते ६ तास भिजवून सावलीत वाळवले जाते. त्यामुळे उगवण लवकर, एकसारखी आणि चांगली होते.

पूर्वमशागत[संपादन]

सूर्यफुलाच्या मुळ्या जमिनीत ६० सेंमी खोलवर जात असल्यामुळे १५ ते २० सेमी खोलवर नांगरट करावी लागते. कुळवाच्या २ - ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडून शेत सपाट करून घ्यावे लागते.जमिनीचा पोत व सुपिकता सुधारण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत प्रतिएकरी ४ - ५ गाड्या आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० किलो जमिनीत पसरल्यानंतर पाळ्या देऊन शेत सपाट करून घेतात.[१]

Gallery[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]