सदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा २
चित्रपटअभिनेते
[संपादन]संकल्प,
जरी चित्रपटअभिनेतेचे चित्रपटाभिनेते असे संधीकरण व्याकरणनियमांनुसार होत असले तरी मला वाटते की असे करण्याने हे येथील भाषा अधिकाधिक क्लिष्ट होत जाईल. मराठी विकिपीडियावरील भाषा ही व्याकरणदृष्ट्या अचूक पण त्याचबरोबर शक्य तितकी सोपी असावी असे माझे मत आहे. असे केल्याने कमीतकमी मराठी शिकलेल्या व्यक्तीलाही याचा अर्थबोध लवकर होईल व उपयुक्तता वाढेल. मला तर वाटते की चित्रपटअभिनेतेचे परत चित्रपट अभिनेते करावे.
असो. इतर विद्वान मंडळींचे मत काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
अभय नातू १४:२९, २९ मार्च २००७ (UTC)
- साध्या किंवा साधारण वापरात असलेल्या शब्दांबद्दल प्रश्नच नाही राष्ट्र पतीचा अर्थ राष्ट्रपती पेक्षा वेगळा होऊ शकतो! त्यामुळे असे शब्द सामासिकच वापरले पाहिजेत.
- अभय नातू १४:५४, २९ मार्च २००७ (UTC)
'राष्ट्र पती'चा वेगळा काय अर्थ होऊ शकतो ते मला समजू शकत नाही, तरीसुद्धा राष्ट्रपती असे जोडूनच लिहायला पाहिजे. ते व्याकरणदृष्ट्यापण योग्य आहे. चित्रपटाभिनेते संपूर्णतः बरोबर असले तरी, आणि संकल्पद्रविडांचा सामासिक शब्दांचा कितीही रास्त आग्रह असला तरी असे जोडशब्द मराठीच्या अर्वाचीन प्रकृती आणि संकेतांना धरून नाहीत असे माझे चुकीचे का होईना पण प्रांजळ मत आहे. मी विद्वान नाही, तरीसुद्धा नातूंच्या 'अर्थबोध आणि उपयुक्तता यांचा बळी देऊन क्लिष्ट सामासिक शब्द बनवू नये' या विचारांशी मी सहमत आहे. --J--J १७:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
- राष्ट्र पती हे माझ्याकडून आलेले चुकीचे उदाहरण होते. माझा म्हणण्याचा उद्देश होता की काही शब्दांचा अर्थ सामासिक व असामासिक रुपांत वेगळा होउ शकतो (वर्तमानपत्र - न्यूझपेपर, वर्तमान पत्र - आत्ताचे पत्र). अशावेळी जेथे जे पाहिजे तेच वापरले पाहिजे.
- अभय नातू १७:०८, १० एप्रिल २००७ (UTC)
-- वर्तमान पत्र/वर्तमानपत्र---अगदी योग्य उदाहरण!.--J--J १८:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
लेख वाचन
[संपादन]नमस्कार संकल्प,
काहि ठिकाणि लेख न दिसता फ़क्त कुठल्यातरी कोडचावापर करा अस येतय, त्यासाठी काय करावे? उदा: gnu.org.com असे. मी नविन असल्याने ल़क्षात येत नाहिये. कृ पया सांगता का?
Re : संपादनपद्धतीविषयी
[संपादन]I will try to take care of this particular problem in the future.
Maihudon ११:५२, ९ एप्रिल २००७ (UTC)
क्वांटम
[संपादन]संकल्प,
मला क्वांटम या शब्दासाठी पुंजभौतिकी असे वाचल्याचे आठवते आहे. तसेच जर्मन नावांजवळ (उदा. माक्स प्लांक लेखातील विद्यापीठांची नावे) त्यांची मराठी किंवा इंग्लिश उच्चारही दिले तर त्यांना ओळखणे सोपे होईल.
अभय नातू ०४:०१, १० एप्रिल २००७ (UTC)
महाराष्ट्र सरकारच्या भाषासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या भौतिकशास्त्र परिभाषा कोशात(१९८१) 'क्वांटम'साठी 'क्वांटम' हाच शब्द दिला आहे. फिजिक्स ला भौतिकशास्त्र आणि फिजिक्सच्या एखाद्या शाखेसाठी भौतिकी. उदाहरणार्थ क्लासिकल फिजिक्ससाठी अनाधुनिक भौतिकी, न्यूक्लीयर फिजिक्ससाठी न्यूक्लीयी भौतिकी आदी. क्वांटम फिजिक्स(?) असा काही विषय असेल तर त्याला हिंदी प्रतिशब्द पुंजभौतिकी असू शकेल. हिंदी शब्दांपेक्षा मराठी शब्द वेगळा असावा. क्वांटम मेकॅनिक्सला क्वांटम स्थितिगतिशास्त्र असा प्रतिशब्द कोशात आहे.--J--J १७:३३, १० एप्रिल २००७ (UTC)
वेस्ट ईंडीझ
[संपादन]संकल्प,
वेस्ट ईंडीझ हा स्थानिक उच्चार आहे. इंडीज हा हिंदी उच्चार वाटतो.
अभय नातू १५:३८, १० एप्रिल २००७ (UTC)
ईंडीझ मधील ई बद्दल मी स्थानिक व्यक्तीकडून पुनः खात्री करून घेईन. सध्या वेस्ट इंडीझ असे मुख्य पान ठेवले आहे.
अभय नातू १६:३२, १० एप्रिल २००७ (UTC)
डॅनिएल जोन्जने त्याच्या उच्चारकोशात इंडिज़(ज़- दंततालव्य-उर्दूतला) हा उच्चार दिला आहे. मराठीतल्या 'झापड'(डोळ्यावर येते ती) किंवा झग्यातला झ हिंदीत नाही. त्यामुळे z चा उच्चार त्यांना ज़ेड(ज ला नुक्ता) असा लिहावा लागतो. मराठीत दोन झ आहेत, त्यामुळे आपल्या इंग्रजी- मराठी कोशात ज़ की ज्य असा गैरसमज होऊ नये म्हणून ज़ च्या ऐवजी झ असे छापले असते. अमेरिकन हेरिटेज डिक्शनरीत इंडीज़ हा उच्चार आहे. मराठीच्या उपान्त्य स्वर दीर्घ लिहिण्या-उच्चारण्याच्या प्रकृतीशी हा दीर्घ डी जुळतो. 'इ' मात्र कुठेही दीर्घ नाही.--J--J १७:५५, १० एप्रिल २००७ (UTC)
लेख लिहिणे
[संपादन]संकल्प मी गोवा हा लेख संपादित करायला घेतो आहे. तर जे इंग्लिशमध्ये दिले आहे त्याचं भाषांतर करायचं का?
-समीर
अकेमेनिड
[संपादन]मला या विषयी कल्पना नव्हती (म्हणजे घोरीचे - घुरीड)होते हीच कल्पना नव्हती. हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. जुन्या फारसीमध्ये हा शब्द Hakhāmanishiya असा उच्चारला जातो असे इंग्रजी विकिवरून कळले, परंतु तो सध्या प्रचलित आहे का याबाबत माहिती नाही. माझे प्रमुख स्रोत इंग्रजी असल्याने मूळ शब्द मिळण्याची शक्यता थोडी कमीच दिसते. :)असो. या शब्दाचा याचा मराठी उच्चार कसा होईल?
याबाबत काय करावे हे मला तरी सुचत नाही. तुम्हाला काही सुचवणी असल्यास नक्की कळवा.
बाकीचे बदल करते.
धन्यवाद. priyambhashini १३:४९, १८ एप्रिल २००७ (UTC)
साचा
[संपादन]संकल्प,
With regard to your message on Don's page -- It is possible to modify template usage on multiple pages using bots, if the content to be added/modified is repeatitive in nature.
अभय नातू १६:५५, २० एप्रिल २००७ (UTC)
Language
[संपादन]I created language pages only for links that were there on bharatiy bhaaShaa page. I guess we need to have proper links for all important pages.
Maihudon १५:०१, २२ एप्रिल २००७ (UTC)
वर्गीकरणाचा syntax उमगत नाही. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:४४, २६ मे २००७ (UTC)
Please delete 'शिवराज्याशिषेकदिन'
[संपादन]Please help. Since spelling is wrong, i created one with correct spelling.
भरत निःसंदिग्धीकरण
[संपादन]भरताचे निःसंदिग्धीकरण करावे लागेल याची कल्पना असल्याने सम्राट भरत असे लिहिले परंतु निःसंदिग्धीकरण कसे करावे किंवा माझ्यासारख्या वापरकर्त्याला ते करता येते का? याबाबत विशेष माहिती नाही. :) priyambhashini ०९:३७, २८ मे २००७ (UTC)
नमस्कार, इंग्रजी विकिपीडियावर (कदाचीत अमेरिकन कायद्यांतर्गत) चित्रपट जाहिरात किंवा स्क्रिनशॉट प्रतिमा वापरायची परवानगी आहे. चित्रपट जाहिरात (पोस्टर) हे विकिपीडियावर वापरल्याने (प्रतिमेचा दर्जा कमी करुन) चित्रपट-निर्मात्याला काहीच नुकसान होत नाही. आपण अशोक सराफ अभिनीत चित्रपटाचे पोस्टर येथे वापरुयात काय? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १०:४९, २८ मे २००७ (UTC)
मध्य प्रदेशाचा इतिहास
[संपादन]टेक्सासचे प्रजासत्ताक प्रमाणे मध्य प्रदेशचा इतिहास असे वर्गीकरण बरोबर होईल. मध्य प्रदेशाचा इतिहास चुकीचे नाही पण भारतीय राज्यांच्या बाबतीत काही एक प्रमाण ठरवायला पाहिजे (मिझोरामाचा...गुजराताचा?)
अभय नातू ०९:५८, ६ जून २००७ (UTC)
आणि
[संपादन]Dear Sankalp ,
I have added new word entry आणि in Marathi Wiktionary .I need your support in correcting templates and shuddha lekhan.
Thanks and regards
Mahitgar १७:०९, ८ जून २००७ (UTC)
भीमण्णा..
[संपादन]अण्णांवरच्या लेखात मी काही बदल केले आहेत.
कळावे,
तात्या अभ्यंकर.
रेघा
[संपादन]संकल्प,
शक्यतो लेखांमध्ये आडव्या रेघांचा वापर टाळावा. विशेषतः लेख व वर्गवारीच्या दरम्यान कारण वर्गवारी ही आपल्या वेगळ्या कोष्टकात असते. जर लेखातील मजकूरात दोन (structurally) वेगळे भाग दाखवायचे असतील तर अशी रेघ द्यावी, उदा. प्रत्येक दिवसाच्या लेखात प्रतिवार्षिक पालन व मागील/पुढील दोन दिवसांच्या दुव्यांमध्ये.
अभय नातू ०६:३८, ५ जुलै २००७ (UTC)
Request
[संपादन]Greetings Sankalpdravid!
Can you please kindly help me translate this article into the unique Marathi language?
Any help would be very gratefully appreciated, Thankyou very much. --Jose77 ०६:०९, ६ जुलै २००७ (UTC)
MediaWiki:Recentchangestext
[संपादन]Mahitgar ०४:४९, ११ जुलै २००७ (UTC)
पुरु की पुरू
[संपादन]हे मी J ना विचारून घेते. मलाही फारशी कल्पना नाही. मातृक/ पैतृक नावाने बदल करते. सुचवणीबद्दल धन्यवाद.
priyambhashini १४:२७, १ ऑगस्ट २००७ (UTC)
खरं आहे. उदाहरणांमुळे चित्र अगदी स्पष्ट झालं. बदल करते.
priyambhashini १६:४४, १ ऑगस्ट २००७ (UTC)
मल्हार वारी गाण्याविषयी
[संपादन]१. अगं बाई अरेच्चा! या चित्रपटातील 'मल्हार वारी' हे गाणे मी मराठी विकीवर उतरविले होते. ते आपण काढून टाकले आहे त्याबद्दल आश्चर्य वाटले. अशा पद्धतीचे लेखन अपेक्षीत नाही काय?
२. पार्श्वगायकांमधे सुखविंदर सिंग देखील आहे असे मला वाटते.
३. अवांतर en.wikipedia.org आणि mr.wikipedia.org हे वेगळे आहेत का? अर्थात, दोन्हीकडे एकच सदस्यत्व चालत नाही का?
निरुभाऊ ०७:०५, ५ ऑगस्ट २००७ (UTC)
hi i am gajanna salunkhe mala marathi tipy karayche aahe te kase larayche malla madat havi aahe my contact 9224479910 gajusalunkhe@yahoo.co.in
Text at the bottom of articles
[संपादन]Sankalp,
When I logged in yesterday after almost a week, I noticed that all the articles are missing the standard text at the bottom of the page that used to have info such as last time the page was modified, etc.
Have you noticed anyone changing this page? This comes from a system-page so only admins should have the right to change it.
I will be away from the net for a few more days off and on. In the meanwhile, can you investigate?
Thx,
अभय नातू १३:०९, १२ ऑगस्ट २००७ (UTC)
संकल्प द्रविड,
आपण सध्या उपलब्ध आहात का? मी सकाळी चावडीवर ई.स. -> इ.स. विषयी कौल मागितला होता. मला काही प्रतिसाद मिळाला तर लगेचच आता कामाला लागायचे होते. सध्या विकिपीडियावर असल्यास कृपया माझ्या संपर्क पानावर अथवा चावडीवर आपली प्रतिक्रिया द्यावी,ही विनंती.
श्रीहरि १०:४१, १३ ऑगस्ट २००७ (UTC)
संकल्प द्रविड,
त्वरीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी आपला इ-मेल वाचला आहे. लगेच आता माझ्याकडे दूरध्वनीचे संपर्क माध्यम उपलब्ध नसल्याने संध्याकाळी वगैरे मी नक्की संपर्क करेन. परंतु माझ्या चावडीवरील प्रस्तावाला काहीच उत्तर नाहीये! सध्या मी कामाला बसून वेळ मिळाल्यास कारणी लावू इच्छितो. तेव्हा चावडीवर एखादा फेरफटका जरूर मारून मला जमल्यास काही मत द्यावे.
श्रीहरि १०:५१, १३ ऑगस्ट २००७ (UTC)
धन्यवाद
[संपादन]मी करीन. चूक सुधारण्यासाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद, मी आता तसा बदल करतो.
नवीन प्रस्ताव
[संपादन]मी मध्य-पूर्व आशियाई देश ह्या नावाचा वर्ग तयार करण्याचे कारण, आतापर्यंत पुष्कळवेळा अरेबिया उपखंडास याच नावे संबोधले जात होते. तसेच वृत्तपत्रांतही काहीवेळा हेच संबोधन येते. त्याचप्रमाणे मी बर्याच माहिती इंग्लिशमध्ये पाहिल्या (आपल्याकडे विविध माहिती कमी स्वरूपात मिळते), म्हणून मी अरेबिया उपखंडातील देशांस मध्य-पूर्व आशियाई देश वर्गात टाकले. पण, तुमचे म्हणणे बरोबर आहे, आशिया संदर्भात विचार करता त्या देशांस नैऋत्य आशियाई देश म्हणून उल्लेखावयास हवे. मी तसा बदले करतोच.
मूळात सगळ्या भाषा सारख्या नसतात. तसेच, प्रत्येक भाषेत विशिष्ट उच्चार्ण पद्धती असते, आपल्या सोयीसठी प्रत्येक भाषा आपल्या वर्णमालेतील शक्य तेवढी अक्षरे वापरून भाषांतरीत करतात. म्हणूनच International Phonetic Alphabets ची निर्मिती करण्यात आली. इंग्लिश विकिपीडियावर बर्याच ठिकाणी उच्चार स्पष्ट करण्यासाठी International Phonetic Alphabet मधील विशिष्ट अक्षरे वापरली आहेत. अशावेळी आपण गरजेनुरूप देवनागरी लिपीत काही चिन्हे निर्माण करण्यास काही हरकत आहे काय? म्हणजे आपण सरळ आपल्या भाषेतील अक्षरे वापरून शब्द लिहावे, आणि कंसात देवनागरी लिपीत शब्द लिहून उच्चाराप्रमाणे काही चिन्हे अक्षरांवर ठेवून शब्दाचा उच्चार दाखवावा. ही कल्पना कशी वाटते?
लेख पूर्ण नाहीत
[संपादन]संकल्प द्रविड, मी लिहिलेले लेख पूर्ण नाहीत, ते ओळखणे सोपे जावे (to know the version) म्हणून 'तुमचे नाव लिहा' हा Marker वापरतो. BTW Can u tell me how to use templates?. विनीत देसाई ०८:०६, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
धन्यवाद! बेळगावाबाबतची शुभ बातमी हाती आल्यामुळे माहिती लगेचच समाविष्ट करावीशी वाटली.महाराष्ट्र एक्सप्रेस ०८:५४, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
विकि प्रकल्प संवाद
[संपादन]संकल्प द्रविड,
आपण विकिपीडियाच्या सूसुत्रीकरणासंदर्भात विचारांचे आदानप्रदान करण्यासंबंधी म्हणाला होतात. मी आपले नेहमीच स्वागत करतो. परंतु त्या दिवसानंतर आपल्याकडून पुन्हा संपर्क झालेला नाही. आपण आपला भ्रमणध्वनी क्रमांक मला इ-मेल वर कळवला होतात खरे, पण मी म्हणाल्याप्रमाणे आपण विकि-चावडी वर वा आपापल्या विकि-चर्चा पानांवर जर विचारांची देवाणघेवाण केली तर ती सगळ्यांसाठी उपलब्ध होईल व त्यांचीही बहुमुल्य मते जाणायची संधी मिळेल. असो, आपल्या सोयीप्रमाणे आपण केव्हाही माझ्याशी विकि-माध्यमातून संपर्कात राहू शकता.
श्रीहरि १३:५५, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
वर्ग:अव्यय
[संपादन]- वर्ग:अव्यय
Please have look at classification under वर्ग:अव्यय at Marathi Wiktionary, see if you can add or correct any entries wherever whenever possible,your suggestions are welcome.Thanks & Reagards Mahitgar
Image not getting displayed in डेनिस रिची
[संपादन]Thanks for ur help, I changed image used in डेनिस रिची article. But now its not displaying it Same image is available in English article Do u have any idea? विनीत देसाई १४:२०, २२ ऑगस्ट २००७ (UTC)
उ. देव-देवता
[संपादन]तुम्हाला जर इ-मेलवर चर्चा करावयाची असल्यास तुम्ही मला तुमचा इ-मेल आयडी देऊ शकता का? की मी माझा देऊ?
तुमची पुराणासंदर्भात सूचना वाचली. अझ्टेक पुराणांबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे त्यात केवळ एका व्यक्तीचा उल्लेख आहे. म्हणून पौराणिक व्यक्तींचा वर्ग निकालात निघाला. दैवतांसंदर्भातील तुमची सूचना मी नक्कीच उपयोगात आणीन. अजूनतरी मी अझ्टेक देव-देवतांपैकी एकावरच लेख लिहिला आहे. नंतर जे लेख लिहीन त्याप्रमाणे मी वर्गीकरण करीन.
<edit>
साचा:मेसोअमेरिकन पुराणांवरील अपूर्ण लेख ह्या लेखामध्ये काहितरी गडबड झाली आहे. त्यामुळे अकोल्मीझ्टली ह्या लेखात "साचा:मेसोअमेरिकन पुराणांवरील अपूर्ण लेख" हा लेख ज्या वर्गात येतो तो वर्गही त्या लेखात येतो. त्या वर मला काहितरी उपाययोजना हवी आहे.
श्रीराम लागू व अशोक सराफ यांच्या चित्रांबद्दल
[संपादन]सुभाष, तुम्ही श्रीराम लागू व अशोक सराफ या लेखांमध्ये दोन नवीन छायाचित्रे वापरली आहेत असे दिसले; तसेच त्या दोन्ही चित्रांच्या संचिका तुम्हीच चढवल्यात असे दिसले. ती दोन्ही चित्रे तुम्हाला कुठून मिळाली, व ती 'कॉपीराइट-फ्री' आहेत का? विकिपीडियावर कॉपीराइट-मुक्त चित्रेच वापरायची परवानगी आहे. तुम्ही चढवलेल्या चित्रांचे कॉपीराइट आहेत किंवा नाहीत ते कळवा, म्हणजे त्यानुसार ही चित्रे वापरायची किंवा उडवायची हे ठरवता येईल.
--संकल्प द्रविड ०८:२८, २७ ऑगस्ट २००७ (UTC)
सर्वप्रथम विकिपेडिया वरील तुमचे योगदान खुपच प्रशंसनीय आहे मराठी विकिपेडिया वर लिहण्याचा हा माझा पहिला प्रयास आहे मी अपलोड केलेले चित्रे ऑनलाइन वर्तामानपत्र मधुन घेतली आहेत जे मला वाटते की बरोबर नही तरी तुम्ही शेवटचा निर्णय घेणे श्रीराम लागू - http://www.hindu.com/mag/2004/12/12/stories/2004121200480500.htm अशोक सराफ - http://www.tribuneindia.com/2000/20000625/spectrum/tv.htm धन्यवाद सुभाष राऊत
Commons:मुखपृष्ठ
[संपादन]- Commons:मुखपृष्ठ is now operational again.Please keep contributing to this page .All of us Marathis need to support it
- Mahitgar १८:११, ५ सप्टेंबर २००७ (UTC)
टीपणी: मराठी भाषेत टाईप करणे आता खुपच सोपे झाले आहे. http://www.google.com/transliterate/indic/
धन्यवाद
[संपादन]धन्यवाद.
मला Palais चा उच्चार हवा होता. Bourbon चा उच्चार बुर्बोन असून फ्रेंच राज्यक्रांतीमधील जो बुर्बोन वंश होता तो हाच.
Aniruddha Paranjpye १७:५६, ७ सप्टेंबर २००७ (UTC)
विलंबाबद्दल क्षमस्व
[संपादन]संकल्प द्रविड,
आपण मला आपला भ्रमणध्वनी क्रमांक कळवला आहे व संपर्क करण्याची सूचना दिलेली आहे. मी प्रथमतः क्षमाप्रार्थी आहे की, सध्या काही दिवस आमच्या कार्यक्षेत्री ढीगभर कामाचा लोंढाच असल्याने मी ना विकिपीडियावर जास्त वेळ देऊ शकत आहे; ना आपल्याशी संपर्क करू शकलो. आपण समजून घ्याल, अशी आशा आहे.
माझ्याकडे संपर्कासाठी वैयक्तिक दूरध्वनीयंत्रणा नसल्यानेही थोडी अडचण आहे. आपल्याला कदाचित आश्चर्यच वाटेल; पण मी भ्रमणध्वनी वगैरे घेतलेला नाही. त्यामुळे थोडी गैरसोयच आहे हे खरे; पण येते काही दिवस तरी मी तो घेणार नाहीये. तरी कृपया आपण विकिपीडियाच्या माझ्या चर्चापानी जी चर्चा करायची आहे त्याबाबत जरूर संपर्कात राहावे, ही आवर्जून विनंती. मी आपल्याशी विचारविनिमय होण्याची आतूरतेने वाट पाहात आहे. अभय नातू, harshalhayat देखील चर्चासत्रात नियमीतपणे सामील झाले, तर आनंद वाटेल.
ध्वनीसंपर्क माध्यमाच्या अनुपस्थितीमुळे होणार्या आपल्या गैरसोयीबद्दल पुनश्च क्षमस्व.
श्रीहरि १३:२६, १० सप्टेंबर २००७ (UTC)
संकल्प द्रविड,
आपण चर्चेसाठी सध्या(आता) विकिवर उपलब्ध आहात का? असल्यास थोडा विचारविनिमय करणे आवडेल...
श्रीहरि १०:५५, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
साचा संदर्भात साहाय्य हवे
[संपादन]संकल्प,
कसे आहात ?
- विक्शनरी मदतचमू
- ~~~~
या साचा नंतरचे लेखन साचा सोबत जोडले जात आहे.{{साचा:विक्शनरीसाहाय्य}} हा साचा दुरूस्त करण्यास मदत हवी आहे.शनिवारी मी पुण्यात असेन दुरध्वनीवर बोलू.
विजय १६:३६, १३ सप्टेंबर २००७ (UTC)
sangeetkar info box
[संपादन]no worries by the way you can now type marathi using google transliterate http://www.google.com/transliterate/indic/ transliterate thanks --सुभाष राऊत ०५:४४, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
साचा: succession box
[संपादन]I taken codes from en:wiki, but I used in mr:wiki this not works properly. वर्ग: राज्यकर्ता साचे
Aniruddha Paranjpye ०६:५४, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
I'am Sorry, Problem is solved.
Aniruddha Paranjpye ०७:०२, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
Yes, I didn't wrote because, I didn't know how they works. Then firstly I created Templates, then used, and now I know how to use it. But there are more descriptions so, I am writing how to use it in Barah, and will add in Template.
Aniruddha Paranjpye १०:३७, १४ सप्टेंबर २००७ (UTC)
माहितीचौकट अभिनेता
[संपादन]माहितीचौकट अभिनेता या साच्यात जन्म_स्थान वापरण्यात आले नाही सुभाष राऊत २०:१७, १८ सप्टेंबर २००७ (UTC)
मूलद्रव्य संदर्भ
[संपादन]वर्ग चर्चा:मूलतत्त्व येथे तुमची मदत हवी आहे!
– केदार {संवाद, योगदान} ११:०९, २७ सप्टेंबर २००७ (UTC)
cricket vishai mahiti dya
[संपादन]Please let me know in Marathi a conversation between teacher and student about cricket
Protect a page
[संपादन]Sankalp,
Mahitgar left me this message. Can you take care of it while I'm away from my admin login credentials?
Abhay, please protect unending this page from anonymous users on top priority . Mahitgar १८:१२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
The page in question is - अंजनी थॉमस
MarathiBot १८:२७, १६ ऑक्टोबर २००७ (UTC) (Abhay)
Santa Cruz
[संपादन]Sankalp,
I believe सांताक्रुझ is the right spelling, as evidenced by its english version, cruz. Cruise would be transliterated as क्रूझ.
MarathiBot १८:३२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)
editing
[संपादन]I am happy you are correcting my edits
but i am losing my edits
please let me complete the article
if you have corrections message me
thanks
सुभाष राऊत ०८:०८, २९ नोव्हेंबर २००७ (UTC)
thanks a lot sankalp
actually i was completing the presidents of india
it might take a few more days to complete me the main template
but i will leave messages if i am stuck
once the main template is done then we can test the same for each sub type of templates
सुभाष राऊत ०९:०९, २९ नोव्हेंबर २००७ (UTC)
कार्यकाल
[संपादन]i m making the changes but instead of कार्यकाल i am sure कार्यकाळ is correct.
सुभाष राऊत ०९:३२, ५ डिसेंबर २००७ (UTC)
साचा:माहितीचौकट पदाधिकारी
[संपादन]just for safety, could you please protect this template? offcourse give right to me say for a month or so.
सुभाष राऊत ०९:३९, ५ डिसेंबर २००७ (UTC)
माहितीचौकट पदाधिकारी
[संपादन]could you please check the template for more changes so that we can finalise the same
i know it is just 20-30 % complete
in the mean i am also working on साचा:माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
please recommend any changes to it
draft is on सदस्य:सुभाष राऊत/temp
सुभाष राऊत ०१:१०, ७ डिसेंबर २००७ (UTC)
साच्यात केल्यास अति उत्तम, मी जरी काही केल्यास ते PST hours मध्ये करणार
धन्यवाद
सुभाष राऊत ०९:१८, ११ डिसेंबर २००७ (UTC)
New user and शास्त्रज्ञ एका नविन पिढीचा!
[संपादन]Hi Sankalp, It seems that some new user has written this article. Can we add suggestions to discussion page to make it as per wikipedia standards, rather than deleting it? That person might be a real scientist. हेरंब एम. ०९:११, १९ डिसेंबर २००७ (UTC)
I agree that if no one modifies it, it will contribute to "not so good" article, however, I think that we should 1. Flag such articles and give some time (1-2 months) to the user to change it as per standards 2. After that time, we should delete it.
The "contributing member" had an intention to add something but just does not know the standards. And it was a big article so considerable effort was put in typing (if it was not copied.). So the above decision will surely not-demotivate the contributor.
Thanks,
हेरंब एम. ११:४७, १९ डिसेंबर २००७ (UTC)
common.css
[संपादन]the http://mr.wikipedia.org/wiki/MediaWiki:Common.css page is quite old i need to update the same, for reference you can check http://en.wikipedia.org/wiki/MediaWiki:Common.css i am looking more for the navbox part but it would be better if we update the file सुभाष राऊत ०८:५६, २१ डिसेंबर २००७ (UTC)
airforce
[संपादन]भारतीय वायू सेना" हे पान "भारतीय हवाईदल" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: मराठीतील रूढ शब्दप्रयो�
तुम्ही केलेले वायू सेना चे स्थानांतर हवाई दल मला बरोबर नाही वाटत
हवाई दल हा मुळता हिंदी शब्द आहे
सुभाष राऊत १८:२१, २८ डिसेंबर २००७ (UTC)
ऑस्ट्रेलियाला येणे हा लेख
[संपादन]नमस्ते संकल्प, ऑस्ट्रेलियाला येणे हा लेख बदलून त्याचे ऑस्ट्रेलियाला पर्यटन व ऑस्ट्रेलियाला देशांतर असे दोन भाग केले आहेत. दुवे देवून मुळ पान तसेच ठेवले आहे. मात्र Immigration to Australia हा लेख काहीसा वेगळा आहे असे वाटले. देशांतराचा इतिहास - ऑस्ट्रेलिया अशा काहीश्या मथळ्याचे पान कदाचित त्यासाठी योग्य राहील की काय असे वाटते. यात अजून बरीच माहिती येवू शकेल पण तुर्तास इतकेच लिखाण शक्य झाले आहे. -निनाद कट्यारे
इतर भाषां मध्ये असलेले प्रकाशचित्र मराठी विकिवर कसे आणावे
[संपादन]इतर भाषां मध्ये असलेले प्रकाशचित्र मराठी विकिवर कसे आणावे याबाबत काही सांगाल का? सत्यजित राय या लेखात मी चित्राचा दुवा देवून पाहिले पण ते आले नाही.
calculations
[संपादन]It seems that calculations / using expressions with devenagri numbers is not possible. English numbers have to be used for this purpose, is there any way to do calculations using devnagri numbers or is there any method to convert any devnagri number to english for calculation purpose, I have done something simillar for {{YearDEV2EN}} but it only for a set of numbers, doing it for all the numbers is impossible using template (obviously a simple template).
Maihudon १०:११, १४ जानेवारी २००८ (UTC)
साचा:माहितीचौकट लेखक
[संपादन]no problem we can delete it but we may have to update articles using it what links here
सुभाष राऊत ०९:३२, १६ जानेवारी २००८ (UTC)
न्यायक्षेत्र साचा
[संपादन]thanks sankalp.
thanks for checking and it is good to have you do the enhancement, for now i am stopping the work on the template
I am going to start creating and updating pages using the same.
सुभाष राऊत ०६:०४, २२ जानेवारी २००८ (UTC)
भाषांतर
[संपादन]कृपया मी केलेल्या खालील भाषांतरांवर आपले मत कळवावे.
१. Biosphere Reserve - सुरक्षित जैविक क्षेत्र २. National Park - राष्ट्रीय उद्यान ३. Wildlife Sanctuary - अभयारण्य ४. Reserve forest - राखीव जंगले
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२४, २२ जानेवारी २००८ (UTC)
- आपण केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. तसेच w:en:World Heritage Siteला काय म्हणता येईल हे कृपया कळवावे.
- कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५६, २३ जानेवारी २००८ (UTC)
धन्यवाद
[संपादन]बार्नस्टार बद्दल आभार. मराठी विकिपीडियाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:१७, २३ जानेवारी २००८ (UTC)
हलंत
[संपादन]संकल्प,
काही काळापूर्वी झालेल्या चर्चेत J यांनी म्हणल्याप्रमाणे प्रमाण मराठीत हलंत शब्द नाहीत. के. शंकरनारायणन् चे परत के. शंकरनारायणनकडे पुनर्निर्देशन करावे.
अभय नातू ०७:२६, २४ जानेवारी २००८ (UTC)
hello
[संपादन]well... I will leave that subject now. It is fine for me to remove that text. I am looking forward for Marathi typing facility on Wikipedia.
यादी
[संपादन]नमस्कार संकल्प,
सौरभदा यांनी माझ्या चर्चा पानावर खालील संदेश लिहिलेला आहे. मला त्याचे सुयोग्य उत्तर सुचले नाही. कृपया आपण त्यांना (व मला सुद्धा) या बाबतीत मदत करावी ही विनंती.
कौस्तुभ, म्हंटल्याप्रमाणे वर्गविस्तार करत आहे मात्र या संपूर्ण वर्गविस्तारांची यादी कोठे पाहता येईल? जसे की मराठी गीतकार , मराठी साहित्यिक, कवी, कवयित्री वगैरे! आणि मराठी गीतकार या नावाने सर्च करता त्यांची यादी का समोर येत नाही? तसेच अगदी तंतोतंत नाव जुळल्याशिवाय कुठलेही पान दिसत नाही.मग अगदी सहजासहजी माहिती कशी उपलब्ध करता येईल? तसेच एकच व्यक्ती गीतकार व संगीतकार असता किंवा दिग्दर्शक ,निर्माता असता वर्गविस्तार कसा करावा? या बाबी खूपच निरुत्साहक आहेत. :(
सौरभदा ०४:४२, ३१ जानेवारी २००८ (UTC)
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:००, ३१ जानेवारी २००८ (UTC)
मासिक सदर
[संपादन]संकल्प,
कृपया मासिक सदर बदलावे. copy text from साचा:मुखपृष्ठ सदर/temp to साचा:मुखपृष्ठ सदर. यासाठी सदस्यांचा कौल कौलपानावर घेतलेला आहे.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:४५, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
ट्रान्सलेटविकि प्रकल्पात योगदान विनंती
[संपादन]प्रिय विकिपीडियन मीत्रहो,
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
आपला नम्र Mahitgar १७:२०, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
Dear Sankalp, How are you At please give a little time for above project also it is mid way and your help can make it we achive it faster. Thanks amd Regards Mahitgar ०६:०९, २० फेब्रुवारी २००८ (UTC)
- Not an issue ,Actualy there were few picture and photography related terms may be you would have given better justice to them besides checking up on shuddhalekhan also was needed, as of now those are translated .
- We will need to find fresh volunteers to complete remaining 2 phases.
- Mahitgar ०६:०३, २७ फेब्रुवारी २००८ (UTC)
raised a request for adminship
[संपादन]i have raised a request to grant admin rights for marathi wikipedia at विकिपीडिया:कौल. Please let me know if there are any questions.
सुभाष राऊत (चर्चा • योगदान • संख्या • नोंदी • स्थानांतराची नोंद • रोध यादी • विपत्रपत्ता)
माहितीचौकट ग्रह
[संपादन]साचा:माहितीचौकट ग्रह हा साचा HTML टेबलाच्या आराखड्यावर बनवला आहे असे दिसते. तो Infobox प्रकारात करता येईल का? इतर बहुसंख्य माहितीचौकट साच्यांप्रमाणे लूक-अँड-फील दिसण्याकरता असे सुचवावेसे वाटले. --संकल्प द्रविड (चर्चा) १३:१३, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- संकल्प i am sorry i didnt get, could you explain more, as per me it is as per infobox category.
- --सुभाष राऊत १६:४१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
कृपया Infobox प्रकारातील साच्याचे एखादे उदाहरण द्यावे. कारण वर्ग:माहितीचौकट साचे मध्ये वेगवेगळे साचे आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:३१, १४ फेब्रुवारी २००८ (UTC)
- Sankalp, got your point. I will do the necessary changes in the template. Regards, कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५२, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
साचा बदललेला आहे. कृपया {{माहितीचौकट ग्रह/धूळपाटी}} व {{माहितीचौकट पर्वतरांग/धूळपाटी}} बघून आपले मत द्यावे. नंतर मुख्य साचे बदलता येतील. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:२०, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)
अंबादास धाराव यांच्यावरील लेख
[संपादन]Your argument seems to be valid. But while writing this article I thought his death was symbolic indication of a movement which caused a lot of stir across the country was to a certain extent, without any justified motivation and completely lacked understanding of objectives set for movement by there leader.
Any ways If the article looks like it is inappropriate to be considered as wiki material, I dont have any problems if it is removed.
Maihudon ०७:५१, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
- I think we should better create an article for महाराष्ट्रातील दंगली / दुर्घटना. In which we can add more encyclopaedic information. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५४, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
संदर्भ
[संपादन]संकल्प, संदर्भ देताना {{Cite journal}} व {{cite web}} या साच्यांमध्ये असणार्या accessdate, retrived on, etc. या तारखांना चुकीचे दुवे येत आहेत. मी तात्पुरत्या स्वरुपात या तारखांचे दुवे disable केलेले आहेत. तरी सुद्धा इथे थोडे लक्ष घालावे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:२५, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
अभय नातू
[संपादन]संकल्प, तीन दिवस झाले अभय नातू इथे दिसले नाहीत. काही संपर्क माध्यम असल्यास जरूर संपर्क करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२१, १६ फेब्रुवारी २००८ (UTC)
- हो, या साच्यांमध्ये चूक झालेली आहे. मी दुरुस्त करतो. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:२८, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)
- (वि.सू. मी अभय नातूंची चौकशी सहजच केली. प्रबंधकांची कामे तुम्ही तसेच सुभाष करीतच आहात. (कौस्तुभ)
कॉनस्टांन्झ तळे या शीर्षकात शुद्धलेखनाची चूक वाटते आहे. विशेषत: स्टांन्झ मध्ये अनुस्वार तसेच अर्धा ’न’ आहे. जर चूक असल्यास योग्य नावाने पुनर्निर्देशन करावे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:५७, २० फेब्रुवारी २००८ (UTC)
इ.स.
[संपादन]संकल्प, मला वाटते की १८३८ (नि:संदिग्धीकरण) नावाने पृष्ठ तयार करुन इ.स., शा.स. शि.स, इ. संदिग्धता टाळता येईल. पण इ.स. चा दुवा देताना अतिशय किचकट काम होत आहे. उदा. कुठल्याही दिवसाच्या पानावर, दिनविशेषवर तसेच प्रत्येक लेखात अनेक ठिकाणी इ.स. चा दुवा द्यावा लागतो. अशा वेळी ही समस्या जाणवते.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:१४, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)
मुखपृष्ठ
[संपादन]मला वाटते की १ मार्चला मुखपृष्ठ बदलावे. मुखपृष्ठ/धूळपाटी छान दिसते आहे.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५४, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)
German pronounciations
[संपादन]Dear Sir
I little disagree with the changes you have made regarding pronounciations, Bodensee - i feel its not बोडेन्जी but बोडन-से.
Prounciations
[संपादन]The word should be pronUnciations not pronoun---J १०:३१, ९ मार्च २००८ (UTC)
शनि का शनी?
[संपादन]शनी हे जास्त योग्य वाटते. मत द्यावे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:२८, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)
मराठीत शनी
[संपादन]संस्कृत-हिंदीत शनि, मराठीत शनी. परंतु 'शनि' या नावाचे पानसुद्धा हवे.--J १०:२८, ९ मार्च २००८ (UTC)
उ. चर्चा डायजेस्ट ;)
[संपादन]१. इ.स. नि:संदिग्धीकरण - नि:संशय हे अतिशय मोठे काम आहे. आणि माझ्या मते सांगकांम्यांकरवी करून घेणे सोयिस्कर आहे. तरी सुद्धा १८३८ (नि:संदिग्धीकरण) हे शीर्षक सुटसुटीत करता आले तर बरे पडेल. तसेच अशी पृष्ठे सांगकाम्यांकरवी तयार करावीत का हा सुद्धा चर्चेचा (आणि काही प्रमाणात वादाचा) विषय ठरू शकेल. सध्या मला वाटते की फक्त पुनर्निर्देशने तयार करावीत.
२. या संदर्भात अजून एक म्हणजे फक्त जी संख्या पाने (अथवा इतर शक पाने) तयार करण्यात येतील त्या पानांबद्दलच नि:संदिग्धीकरण पृष्ठे तयार करावीत.
३. मी काही (उदा. १० - १५) पुनर्निर्देशने तयार करायची हरकाम्याला आज्ञा देतो. बघूया इतर सदस्यांची काय प्रतिक्रिया आहे ते.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:००, २६ फेब्रुवारी २००८ (UTC)
माहितीचौकट ग्रह
[संपादन]साचा:माहितीचौकट ग्रह/धूळपाटी छान झाला आहे. तरी सुद्धा बर्याच गोष्टींच्या व्याख्या माहित नसल्याने अडचण येत आहे. उदा. अभिव्यक्त प्रत, निरपेक्ष प्रत, इपॉक, अर्ध-अँप्लिट्यूड, इ. या संदर्भात मला वाटते की खगोलशास्त्रातील व्याख्या नावाचा लेख तयार करुन या सर्व (व इतर अनेक) व्याख्यांची यादी तयार करावी. कारण या प्रत्येक पॅरॅमीटरचे लेख पान बनविणे उचित वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:३५, ९ मार्च २००८ (UTC)
Olympic Related
[संपादन]- Demonstration sports
Maihudon ०८:०२, १२ मार्च २००८ (UTC)
मराठी शब्द आणि 'साचा:वर्षगांठ1' बद्दल
[संपादन]basically i was trying have a template which will represent Anniversary year (which will be calculated as of date).
e.g. today is the 78th anniversary of jalainwala baagh massacre. while creating template i referred to vaze dictionary, i had a feeling that it was hindi word.
सुभाष राऊत १७:३७, १२ मार्च २००८ (UTC)
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८
[संपादन]नमस्कार,
विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी कोणत्या लेखाची निवड करावी असे आपणास वाटते? माझ्या मनात जर्मनी हा लेख निवडावा असा विचार आहे.
संकेत अंधारीकर २०:२१, १६ मार्च २००८ (UTC)
US State
[संपादन]Thanks sankalp.
सुभाष राऊत १४:१८, १८ मार्च २००८ (UTC)
bot
[संपादन]No problem, i have not received the 'read receipt' hence confirmed. regards, Kaustubh
धन्यवाद
[संपादन]आपण केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद.
- प्रथमत: एकसुत्रीपणा राखण्यासाठी विकिपीडियाचा सिंटेक्स वापरावा हे मला पटले आहे.
- दुसरी गोष्ट म्हणजे मला कुठेही माझे नाव प्रदर्शित करण्याची इच्छा नाही.
- मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या जागतिक पातळीवरील द्न्यानात भर घालण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिल.
- मी नवीन सदस्य असल्यामुळे कदाचित प्रथमतः मला वरील गोष्टींची कल्पना नव्ह्ती.
- माझा हातभार आपण स्वीकार कराल अशी अपेक्शा आहे.
--उदय कुलकर्णी १६:३३, १९ मार्च २००८ (UTC)
Iberia च्या उच्चाराबद्दल थोडॆसे
[संपादन]नमस्कार,
हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये या शब्दाचा उच्चार इबेरिया असाच होतो. इंग्रजीप्रमाणे स्पॅनिशमध्ये I या अक्षराचे दोन उच्चार होत नाहीत. केवळ ’इ’ असाच उच्चार होतो. मी BBCवर ही इबेरिया असा उच्चार ऐकला आहे; शिवाय माझ्या स्पॅनिशच्या शिक्षकांना विचारून-जे स्वत: स्पॅनिश आहेत-खात्रीही करून घेतली आहे.
विकिपीडियावर स्थानिक नावांनीच लेख तयार व्हावे असा आग्रह असतो. मग हेच मत सर्व शब्दांना का लागू होऊ नये?
संकेत अंधारीकर १८:३६, २० मार्च २००८ (UTC)
http://en.wikipedia.org/wiki/Iberian_Peninsula#Name
- संकल्प, जर तुझ्या संगणकात audio ऐकण्याची सुविधा असेल तर इथे उच्चार दिलेला आहे. ऐकून confirm करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:४५, २१ मार्च २००८ (UTC)
Iberia च्या उच्चाराबद्दल थोडॆसे.
[संपादन]नमस्कार,
हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये या शब्दाचा उच्चार इबेरिया असाच होतो. इंग्रजीप्रमाणे स्पॅनिशमध्ये I या अक्षराचे दोन उच्चार होत नाहीत. केवळ ’इ’ असाच उच्चार होतो. मी BBCवर ही इबेरिया असा उच्चार ऐकला आहे; शिवाय माझ्या स्पॅनिशच्या शिक्षकांना विचारून-जे स्वत: स्पॅनिश आहेत-खात्रीही करून घेतली आहे.
पटियाला या लेखासंदर्भात प्रचलित नावांपेक्षा स्थानिक नावांनीच लेख तयार करण्याचा आपला आग्रह होता. मग हेच मत सर्व शब्दांना का लागू होऊ नये?
संकेत अंधारीकर १८:३२, २० मार्च २००८ (UTC)
http://en.wikipedia.org/wiki/Iberian_Peninsula#Name
अभय, जर तुमच्या संगणकात audio ऐकण्याची सुविधा असेल तर इथे उच्चार दिलेला आहे. ऐकून confirm करावा. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:४५, २१ मार्च २००८ (UTC)
नमस्कार,
Iberia या शब्दाचा स्पॅनिश उच्चाराशी संबंधित दुवा जरी मला मिळाला नसला तरीही I या स्वराच्या स्पॅनिश उच्चाराबद्दल थोडी माहिती व मिळालेले दुवे पुढे देत आहे.
स्पॅनिश भाषेत कोणत्याही स्वराचे दोन भिन्न उच्चार होत नाहीत. आय या उच्चारासाठी स्पॅनिशमध्ये ay किंवा ai असे लिहावे लागते (Aire-आयरे, ayudar-आयुदार). उदा. Idea या शब्दाचा इंग्लिश आणि स्पॅनिश अर्थ व स्पेलिंग एकच आहेत, मात्र स्पॅनिश उच्चार ’इदेआ’ तर इंग्लिश उच्चार ’आयडिया’ असा होतो. I पुढे जर कोणताही दुसरा स्वर नसेल तर स्पॅनिशमध्ये उच्चार ’इ’ असाच होतो. इंग्लिशमध्ये I च्या उच्चारासाठी विषेश नियम नाहीत. खासकरून अमेरिकन लोकं याबाबत आग्रही नसतात. उदा. Iran-आयराक, Iraq-आयरान, Idaho-आयडहो, Issac-आयझाक असे उच्चार तर Irine-आयरिन, Illinois-इलिनॉय असे एकाच शब्दात I चे दोन वेगळे उच्चार आपल्याला माहित आहेत. स्पॅनिशमध्ये असा गोंधळ नाही. स्पेलिंग आणि उच्चार यांचा संबंध बघितला तर स्पॅनिश ही युरोपीय भाषांमध्ये बोलण्यास सर्वात सोपी भाषा आहे; कारण भारतीय भाषांप्रमाणे स्पॅनिशमध्ये जसे बोलले जाते तसेच लिहीले जाते.
स्पॅनिश उच्चारांसाठी Mariam-Webstar सारखे इंग्लिश शब्दकोश किती प्रमाण मानावेत याबाबत शंका आहे. अमेरिकेत ओहायो राज्यात Iberia नावाचे एक गाव तसेच लुइझियाना राज्यात Iberia Parish हे चर्च आहे. संदर्भ आणि I चा ’आय’ असा उच्चार करायची प्रवृत्ती आणि लक्षात घेता Mariam-Webstar मध्ये आयबेरिया असा उच्चार असल्यास नवल नाही.
Iberia शब्दाचा उगम, स्थानिक व भाषिक संदर्भ लक्षात घेता इबेरिया हा उच्चार जास्त सयुक्तिक आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Iberia http://www.donquijote.org/spanishlanguage/alphabet/i.asp http://en.wikibooks.org/wiki/Spanish/Pronunciation http://en.wikipedia.org/wiki/Spanish_phonology
संकेत अंधारीकर १५:२६, २१ मार्च २००८ (UTC)
prefix = उपपद की पूर्वप्रत्यय?
[संपादन]please confirm --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:२८, २१ मार्च २००८ (UTC)
I suggest उपपद shall be more appropriate. plz comment. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:१४, २५ मार्च २००८ (UTC)
’आद्रियान’- ’आद्रियन’
[संपादन]I have gone through the link that you have provided, but I guess, I still need more time to understand grammer. so I expect you to be alert as ever for all my new contribution :-).
Presently I am working/ planning to work on F1 and olympic articles and your corrections and suggestions are always welcome rather needed.
Maihudon १९:२०, २५ मार्च २००८ (UTC)
देवड व देवगड
[संपादन]देवड व देवगड एकच आहेत का? --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०६, २६ मार्च २००८ (UTC)
- संकल्प, काल बोलल्याप्रमाणे मी तालुक्यांची पाने बनविण्यासाठी सांगकाम्याचा कितपत उपयोग होतो ते तपासले. मला असे दिसले की सांगकाम्या कुठल्याही पानाचे स्थानांतरण करण्याची सुविधा देत नाही. मी pythonच्या सुद्धा स्क्रीप्टस तपासल्या. त्यामध्ये जी स्थानांतरणासाठीची स्क्रीप्ट दिलेली आहे ती देवनागरी अक्षरे घेत नाही. कारण ती command prompt वर रन होते. आज संध्याकाळी मी लॅपटॉप वरून पुन्हा एकदा रन करून पाहीन. (मी अगोदरच लॅपटॉप मध्ये मराठी इंटरफेस तसेच दक्षिणी आशियाई भाषा सपोर्ट टाकलेला आहे. तरी या संदर्भात अभय नातूंशी सुद्धा चर्चा करावी. (कारण ते C# चे प्रोफेशनल आहेत), कदाचित ते एखादे external module लिहून देऊ शकतील.
- सध्या तरी तालुक्यांची पाने स्वत: तयार करण्यावाचून मार्ग दिसत नाही. क.लो.अ.--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:०९, २८ मार्च २००८ (UTC)
स्पॅनिश उच्चार
[संपादन]नमस्कार,
टेलेफोनिका (Telefónica) साठी तेलेफोनिका वापरावे. संतेंदर समूह (Grupo Santander) साठी सान्तान्देर समुह वापरावे. सांतांदेर असा शब्द वापरू नये कारण यात n चा उच्चार हा स्वरयुक्त (स्+आं आणि त+आं) नसून अर्धव्यंजनात्मक (न्+ता आणि न्+दे) आहे.
संकेत अंधारीकर १८:२५, २६ मार्च २००८ (UTC)
नम्र विनंती
[संपादन]संकल्प आपला हेतु आणी विचार मान्य आहेत परंतू गेल्या कित्येक वर्षात मराठी न वाचल्या / लिहिल्यामुळे बहुदा शुद्धलेख्ननातिल चुका पटकन लक्षात येत नाहीत. शुद्ध लिहीण्याचा माझा प्रयत्न राहिलच परंतू जर चुका आढळल्या तर कृपया माझ्या निदर्शनास आणुन द्यावे म्हणजे पुढच्या वेळेपासुन त्या चुका टाळण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद प्रणव कुलकर्णी १९:५१, ३ एप्रिल २००८ (UTC)
Wikipedia:Current events/एप्रिल
[संपादन]नमस्कार,
Wikipedia:Current events/एप्रिल हे पान अजून तयार झाले नाही. तयार करण्यासाठी मदत हवी आहे.
संकेत अंधारीकर ११:५०, ४ एप्रिल २००८ (UTC)
Wikipedia:Current events/एप्रिल हे पान तयार केल्या बद्दल धन्यवाद. मात्र सद्य घटना या दुव्यावर क्लिक केल्यास अजूनही मार्च महिन्याचे पान उघडते. याबाबत काही करता येईल का?
संकेत अंधारीकर १६:१६, ४ एप्रिल २००८ (UTC)
वर्ग:चीनी सम्राट
[संपादन]नमस्कार,
वर्ग:चीनी सम्राट या वर्गातले सर्व लेख वर्ग:चिनी सम्राट या वर्गात हलवण्यासाठी मदत हवी आहे. चिनी सम्राट, चिनी भाषा, चिनी लोक अशा शब्दप्रयोगांत चिनी हे विशेषणरुप आहे. कृपया पुढील दुवा पहा. ही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तयार केलेल्या पहिल्या मराठी विश्वकोशाच्या ५व्या खंडाची pdf file आहे. यात पृ्ष्ठ १० वर चीन या विशेषनामाचे चिनी असे विशेषणरुप दिले आहे. व्याकरणाच्या दृष्टीने चिनी असा उच्चार योग्य ठरतो. शिवाय या वर्गातील सर्व लेखांच्या शीर्षकांमध्ये मूळ उच्चारांच्या दृष्टीने सुधारणा करणे गरजेचे आहे. http://vishwakosh.org.in/pdf%20files/Khanda-5.pdf
संकेत अंधारीकर ०७:४२, ८ एप्रिल २००८ (UTC)
अंतरविकि का आंतरविकि
[संपादन]संकल्प, Interwiki साठी योग्य शब्द कुठला ते सांग. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२६, १२ एप्रिल २००८ (UTC)
- ता.क. चर्चा पान आर्चिव्ह करावे.