Jump to content

साचा:मुखपृष्ठ सदर/temp

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंद्र
चंद्र

चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.

चंद्र ही एकच अशी खगोलीय वस्तू आहे ज्यावर मनुष्याने पाउल ठेवलेले आहे. सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटका करुन घेऊन चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसर्‍या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली. १९६६ साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान हे लूना ९ होते; तसेच लूना १० ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या. अमेरिकेची अपोलो मोहीम ही आजवरची एकमेव मोहीम आहे ज्यात मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवलेले आहे.

पुढे वाचा...

मागील अंक - फेब्रुवारी २००८ - जानेवारी २००८ - जून २००७ - मे २००७ - एप्रिल २००७ - मार्च २००७ - फेब्रुवारी २००७ - जानेवारी २००७‎ - डिसेंबर २००६ - संग्रह