Jump to content

अंजनी थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंजनी थॉमस (जुलै १०, १९५९:होनोलुलु, हवाई, अमेरिका - ) या एक अमेरिकन गायक-गीतकार आणि पियानो वादक आहेत. या गायक-गीतकार लिओनार्ड कोहेन, तसेच कार्ल अँडरसन, फ्रँक गॅम्बाले आणि स्टेनली क्लार्क यांच्याबरोबरच्या कामांसाठी परिचित आहे.

थॉमसने होनोलुलुमध्ये संगीतशिक्षण घेतले. तेथे त्या गिटार, पियानो तसेच कंठ्य संगीत शिकल्या एक वर्ष बर्कली कॉलेज ऑफ म्युझिक येथे शिक्षण घेतल्यावर त्या न्यू यॉर्कला गेल्या. तेथे त्यांनी जॅझ क्लबमध्ये काम केले. संगीत निर्माता जॉन लिसॉउअर यांनी थॉमस यांना लिएनार्ड कोहेनच्या हॅलेलुया या गीतावर समूहगायक म्हणून काम दिले. थॉमस कोहेनबरोबर १९८५मध्ये पियानोवादक आणि गायक म्हणून दौऱ्यावर गेल्या. त्यानंतर त्यांनी सतत कोहेन बरोबर काम केलेले आहे.

थॉमसने २००० मध्ये अंजनी या संगीतसंचाद्वारे आपल्या एकल कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर २००१ मध्ये तिने द सेक्रेड नेम्स हा प्रसिद्ध केला – जो अरामी, ग्रीक आणि हिब्रू भाषेतील देवाच्या नावांना समर्पित केलेली स्तुतीपर संच होता. तिचे "ब्लू अलर्ट" हे गाणे २००७ मध्ये ओल्ड नेव्ही या कंपनीच्या टीव्ही जाहिरातीमध्ये वापरण्यात आले होते.

बाह्य दुवे

[संपादन]