सदस्य चर्चा:Prasannakumar/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०[संपादन]

मराठी विकिपीडियामध्ये सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प सुरू केला आहे. आपले योगदान सादर आमंत्रित आहे. गणेश धामोडकर १२:२९, ७ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार मंडळी कसे आहात? सहज चौकशी केली.[संपादन]

समस्त मराठी वाचक रसिकांना आणि मुख्या कार्यवाहक मंडळी ह्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. दिर्घ सुट्टी नंतर पुन्हा एकदा विकि वर आलो..बर वाटल तो पर्यंत अनेक बदल झालेले पाहिले परंतु खंत एकच आहे..लेखांची संख्या मात्र झपाट्याने वाढत नाहिये...खुपच संथ आहे गती.असो..स्लोली स्टेडीली..विन्स द रेस ... काही सूचना असतील तर अवश्य कळवा..शिव्या, तक्रारी देखील खपवून घेऊ..

धन्यवाद, कळावे, लोभ असावा, प्रसन्नकुमार.

जय महाराष्ट्र.माहितगार ०७:४८, ५ फेब्रुवारी २०१० (UTC)

स्तुत्य उपक्रम[संपादन]

दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणार्‍या चुका लेखाच्या लेखनाबद्दल शुभेच्छा.आपला उपक्रम स्तुत्य आहे .आपले पुढील लेखन वाचण्यास निश्चितच आवडेल.माहितगार १०:००, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

माहितगार[संपादन]

धन्यवाद, आपल्या शुभेच्छांशिवाय हा पूर्ण होऊच शकत नाही.

आपल्या प्रतिक्रिया पाठवा.[संपादन]

नमस्कार मंडळी, सध्या मी "दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणार्‍या चुका" हा लेख लिहित आहे,त्यानिमित्ताने मी ह्याच लेखाच्या संदर्भात आपणाशी संवाद व विचारांची देवाणघेवाण करू ईच्छितो तेव्हा ह्या ठिकाणी लेखात नेमके काय असावे /नसावे ह्याविषयी आपल्या सूचना जर आपण वेळात वेळ काढून पाठवू शकला तर मी आपला आभारी राहिन तसेच त्यासूचनांनुसार पुढिल लिखाण करेन.तसेच आपला अभिप्राय इथेच चर्चेत द्यावा हिच विनंती. कळावे, लोभ असावा.

मला वाटते या लेखाससध्या {{कामचालू}} साचा लावल्यास बरे होईल किंवा धूळपाटीवर स्थानांतरीत करण्याचाही विचार करावा. सध्या लेखातील काही भाग विश्वकोशिय स्वरूपाचा म्हणून विकिपीडियातच आहे त्या पानावरच ठेवावा लागेल,काही भाग विकिपीडीयातच विकिपीडीयाच्या सहाय्यपानांवर स्थानांतरीत करावा लागेल,तर काही भाग सहप्रकल्प विकिबूक्स येथे न्यावा लागेल, आणि काही भाग या चर्चा पानावर घ्यावा लागेल. पण मला वाटते सध्याच्या तुमच्या लेखन प्रेरणेत व्यत्यय न आणून घेता तुम्ही आधी तुमच्या मना प्रमाणे लेखन करून घ्या, दुरूस्त्यांना हात मग नंतर घालू.माहितगार १४:५१, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

प्रश्नोत्तरे[संपादन]

संपादनांच्या इतिहासात फक्त यादी स्वरूपात ती दर्शविली जातात ,एकूण किती संपादनं झाली हे कसे कळेल?

तुमची स्वतःची संपादनसंख्या बघण्यासाठी वर उजवीकडील माझ्या पसंती वर टिचकी मारा तेथे तुमची एकूण संपादनसंख्या कळेल. इतर सदस्याची संपादनसंख्या बघण्यासाठी http://mr.wikipedia.org/w/api.php?action=query&list=users&ususers=prasannakumar&usprop=editcount या पानावर जा. या युआरएलमधील prasannakumar काढून त्यासदस्याचे नाव घाला. अधिक सविस्तर माहितीसाठी http://toolserver.org/~vvv/sulutil.php?user=prasannakumar येथे पहा. या दोन्ही युआरएलमध्ये फक्त रोमन लिपीतील नावे चालतात.

संपादन म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपात मोजतात ?

संपादने दोन मुख्य प्रकारात मोडतात -- लेख संपादने व इतर संपादने. लेखांव्यतिरिक्त पानांवर (चर्चा, चित्र, इ) केलेली संपादने दुसर्‍या प्रकारात मोडतात.

आपल्या सदस्य खात्यात आपण जे भाषेचे साचे टाकतो ते टाकण्याचा अधिकार सदस्यास आहे का?जर असेल तर त्यास कसे जाणता येईल कि त्याला कोणत्या स्तराची भाषा येते.तो साचा कुठे दिलेला आहे? त्यासाठी काही निकष आहेत का?

कोणत्याही सदस्यास कोणताही साचा टाकण्यास बंदी नाही. ज्याप्रकारे सदस्याला माहिती नाही की त्याला एखादी भाषा कोणत्या स्तराची येते, त्याच प्रमाणे इतरांना ते ठरविणेही कठीण आहे. एखाद्याने मी इनुइत भाषा पारंगत आहे असे म्हणले तर म्हणो बापडा, कोणाचे काय गेले? हे साचे बघण्यासाठी एखाद्या सदस्याचे पान पहावे. माझ्या पानावर मी ५ साचे टाकलेले आहेत त्यावरुन कल्पना येईल.

स्टार (कार्याबद्दल देतात ते.) पद्धती काय आहे? तीची थोडक्यात माहिती द्यावी.म्हणजे तीच्याने काही अधिक अधिकार वगैरे मिळतात का किंवा तीचे निकष काय आहेत

बार्नस्टार हा एखाद्या सदस्याने इतर सदस्याला देण्याचा गौरवपुरस्कार आहे. हा कोणताही अधिकृत सन्मान नाही. तुम्हाला वाटले की एखादा सदस्य चांगले काम करीत आहे तर त्याचा हुरुप वाढवण्यासाठी कोणीही कोणालाही प्रदान करावा. याने कोणतेही अधिकार मिळत नाहीत. बार्नस्टारबद्दलच्या माहितीसाठी विकिपीडिया:बार्नस्टार हे पान पहा.

क.लो.अ.

अभय नातू २२:०९, ११ मार्च २०१० (UTC)

लेख हा काढून टाकण्याबद्द्ल आपले काय मत आहे.कळावे.आपणास तमिळ व मल्ल्यालम येते हे वाचून आनंद झाला.तमिळनाडू व केरळ मधिल किल्ले जर त्या भाषेच्या विकिपिडियावर अस्तील तर कृपया नावे किल्ल्यांच्या यादित टाकावीत.नावे मला सांगा मी उदधृत करेन.:)

विनोद रकटे ११.५६ १४ मार्च २०१०

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


सुंदर काम केले आहे.केरळमधील किल्लेतमिळनाडूमधील किल्ले येथे आपण खालील बाबतीत योगदान केल्यास मी पान काढा हे बदल मागे घेऊ शकतो.खरं तर् मी ते योगदान करायला हवे पण मला तमिळमल्ल्यालम या भाषा येत नाहीत

  • भारतातील इतर किल्ल्याच्या मानाने महत्व
  • बांधकामावर कोण्त्या शैलिचा प्रभाव
  • राजघराणे
  • चित्र दालन
  • मराठा,मुघल व इतर परकियांचे योगदान

विनोद रकटे

बदल केला आहे.विचार कळवा.चर्चा हि पाहणे. विनोद रकटे.

गौरव[संपादन]

मराठी विकिपीडियावरील तमिळ भाषा आणि तामिळनाडू विषयक योगदानाबद्दल

प्रसन्नकुमारजी,
तुमचे विकिपीडियावरील काम विकिपीडियाला वरच्या पातळीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. तुम्ही आजवर केलेल्या योगदानाबद्दल हे गौरवचिह्न तुम्हाला देण्यात येत आहे. तुमच्या कामाची दखल आधीच घेतली गेली नाही याबद्दल क्षमस्व!
कोल्हापुरी ०४:५१, २० मार्च २०१० (UTC)


एकहजारी संपादनांचा बार्नस्टार[संपादन]

एक-हजारी बार्नस्टार
Prasannakumar, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.



नमस्कार प्रसन्नकुमार! आपल्या मराठी विकिपीडियावरील संपादनांनी एक हजारांचा आकडा ओलांडल्याबद्दल हा बार्नस्टार गौरव! आपल्याकडून असेच भरघोस योगदान मराठी विकिपीडियाला लाभत राहील, अशी आशा बाळगतो.
आपण हा बार्नस्टार आपल्या सदस्यपानावर लावू शकता. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:५३, २० मार्च २०१० (UTC)

गौरव[संपादन]

तुमच्या योगदानाबद्दल

.

तुमच्या कामाने मिळवलेला हा गौरव तुमच्या सदस्यपानावर अभिमानाने मिरवा!

अभय नातू २३:४७, २० मार्च २०१० (UTC)

चोल राजांची मंदिरे[संपादन]

चोल राजांची मंदिरे हा 'भारतातील जागतिक वारसा स्थाने' अंतर्गत असलेला लेख सध्या अपूर्ण आहे. आपण त्यात हातभार लावल्यास ते काम पूर्ण होईल.बघा कसे जमते ते.

वि. नरसीकर (चर्चा) १०:१६, २३ मार्च २०१० (UTC)


माझ्या विनंतिस मान दिल्याबद्दल मी आपला म‌‌नःपुर्वक आभारी आहे.आपण करीत असलेल्या कामाबद्दल कृपया माझ्या हार्दिक शुभेच्छा स्विकाराव्यात.तसेच मी मागे आपणास आराध्यवृक्ष या लेखाबद्दल कळविले होते.

>कृपया आराध्यवृक्ष हा लेख बघावा. त्यात मल्याळमतमिळ भाषेतील काही शब्द आहेत. ते तपासुन कृपया आवश्यक असेल तेथे शुद्धलेखन करावे ही विनंती.<

यात जमेल तसे (आपले हातातले नियोजित काम पूर्ण करुन) योगदान द्यावे.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:३७, २४ मार्च २०१० (UTC)


वि. नरसीकर (चर्चा) ०३:३७, २४ मार्च २०१० (UTC)

तुकड्यांमध्ये लेखन[संपादन]

आपणास एक विनंतीवजा सूचना कराविशी वाटते.आपण जे तुकड्यात लेखन करता त्याएवजी तो लेख एकसंध तयार करुन मग तो विकिपीडियावर टाकावा.अशाने server वरचे load विनाकारणच वाढते.आपण जर on-line लेखन करीत असाल तर 'झलक पहा' वर टिचकी मारुन ते केलेले थोडेसे काम तात्पुरते जतन करु शकता.मग तो लेख पूर्ण झाल्यावर 'जतन' करा. मला योग्य वाटले ते मी आपणास सांगत आहे. कृपया कोणत्याही प्रकारचा गैरसमज करु नये ही विनंती.आपणास लेखनाबद्दल हार्दिक शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) १४:४२, २४ मार्च २०१० (UTC)

साचा:विष्णुंची प्रसिद्ध देवालय[संपादन]

यात देवालये असे अनेकवचन हवे. कृपया योग्य ती दुरुस्ती करावी ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०९:१४, १ जून २०१० (UTC)

वर्गीकरण[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार!

तमिळनाडू व एकंदरीत दक्षिण भारतविषयक लेखांमध्ये आपण सध्या जोमाने भर घालत असल्याचे पाहत आहे. परंतु आपण बनवलेल्या बहुसंख्य नवीन लेखांमध्ये लेखांचे वर्गीकरण केलेले दिसत नाही. कृपया नवीन वर्ग योग्य त्या लेखांमध्ये वर्ग करावेत; जेणेकरून अन्य सदस्यांना ते लेख एका ठिकाणी सापडणे, शोधणे सोपे होईल बव अन्य सदस्यांना भविष्यकाळात त्यामध्ये अधिक समृद्ध भर घालणे सोयीचे होईल.

धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:४९, १ जून २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

हल्ली वरचेवर भेट होत नाही म्हणून सहज चौकशी करावी असे वाटले,नविन लेखांतील आमच्या कामा कडे लक्ष असूद्या म्हटलं ,काही कमीजास्त असेल तर कळवा

प्रसन्नकुमार,

गेले काही महिने मी इतर कामांत अतिव्यग्र असल्याने येथे पूर्वीप्रमाणे वेळ देता येत नाही, पण माझे (हल्ली फारसे बारीक नसले तरी ही) येथ लक्ष असतेच.

अभय नातू १९:३८, १ जून २०१० (UTC)

नावातील आद्याक्षरे[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावरील लेखाच्या शीर्षकात आद्याक्षरे असली तर आद्याक्षरांच्या गटानंतर एक जागा (स्पेस) सोडण्याचा संकेत आहे. प्रत्येक आद्याक्षरानंतर जागा सोडू नये - उदा. आर. अमुकतमुक, ए.के. अँटोनी, ए.आर. अबक के. डफ, इ.

अभय नातू

मी उपलब्ध असलेल्या लेखातच लेखन करीत आहे. कृपया ही गोष्ट अभय नातू यांना कळवावी ही विनंती. ते योग्य तो बदल करतील. ईतरभाषिक नावांचे त्यांना ज्ञान जास्त चांगल्या प्रकारे आहे.कळविल्याबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०६:५७, ६ जून २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार, तुमचा संदेश मिळाला, वाचून चांगले वाटले. हो मला माझ्या शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल कल्पना आहे, म्हणुन माझि गती खूप कमी आहे. मी वेळो-वेळी अभय नातु, संकल्प द्रविड, माहितगार अस्या बर्‍याच लोकांकडून मदत घेत राहतो. "हर्मायोनी" हा लेख अधीपासुन तैयार होता. मी त्यात फक्त मजकुर टाकला. मला ही आधी "हर्मायनी" अथवा "हर्मायोनी", नेमके काय लिहायचे, हेच कळत नव्हते. मी लेख लिहीताना हिंदी अनुवादाचा वापर करत नाही, सर्व लेख स्वत इंग्रजी मधुन भाषांतरित करतो.

तुमच्या विविध अमुल्य सुचणेबद्द्ल धन्यवाद, व मी माझ्या स्टार ट्रेक बद्द्लच्या सगळे लेख लिहिण्याच्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवीन.

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०९:२८, ७ जून २०१० (UTC)

प्रमाण भाषा हवी[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार!

आपण वर्ग:कोच्चीतील पर्यटन स्थळं हा वर्ग केल्याचे पाहिले. वर्गीकरण प्रमाण भाषेच्या संकेतांनुसार, शुद्धलेखनाच्या नियमांनुसार करायला हवे. हा वर्ग खरे तर वर्ग:कोच्चीतील पर्यटनस्थळे या नावाने बनवायला हवा. कृपया वर्गीकरण करताना शुद्धलेखन व प्रमाण भाषेचे नियम काळजीपूर्वक पाळावेत.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३४, ८ जून २०१० (UTC)

नमस्कार प्रसन्नकुमार! प्रमाण भाषा वापरण्यासंबंधीच्या वरील सूचनेनुसार योग्य ते बदल करावेत ही विनंती. 'माणसे, पर्यटनस्थळे' हे लिखित प्रमाण रूपे असल्यामुळे विकिपीडियावर 'माणसं, पर्यटनस्थळं' वगैरे बोली रूपे टाळावीत. थोडक्यात, तुम्ही नुकताच बनवलेला वर्ग:मराठी माणसं या वर्गाचेही नाव चुकीचे लिहिले गेले आहे. वर्ग:मराठी व्यक्ती या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या वर्गात सर्व लेख हलवावेत. तसेच, वर नोंदवलेल्या सूचनेनुसार वर्ग:कोच्चीतील पर्यटनस्थळे हा वर्ग तयार करून संबंधित लेख त्या वर्गात हलवावेत. धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०५, १३ जून २०१० (UTC)
नमस्कार प्रसन्नकुमार! वर्गीकरणात योग्य बदल केल्याबद्दल धन्यवाद! चुकीचे वर्ग काढले आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४०, १४ जून २०१० (UTC)

विमानतळ आणि शहरांची योग्य नाव[संपादन]

नमस्कार,

तुम्ही लिहिलेल्या यादीतील विमानतळांबद्दलच्या लेखांच्या चर्चापानावर बरोबर नाव लिहिले असता सदस्य योग्य तो बदल करतील.

अभय नातू ०१:५७, ९ जून २०१० (UTC)

गौरव[संपादन]

अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह

अभय नातू १८:२९, ९ जून २०१० (UTC)

लेख नावे, वर्गीकरण[संपादन]

नमस्कार, मी अधूनमधून अवर्गीकृत पाने मध्ये चक्कर मारीत असतो. यावेळी वर्ग "तमिळनाडु" की तमिळनाडू (शेजारील लिंक पहावी) [१] मध्ये आधीच असलेले पण र्‍हस्व / दीर्घ किंवा तत्सम बदल (उदा. कांचीपूरम आणि कांचीपुरम) करून नवे पण अवर्गीकृत असलेले बरेच लेख दिसले. या संदर्भात उच्चाराप्रमाणे, योग्य नाव असलेले लेख ठेवून अन्य लेखांचे पुनर्निर्देशन व्हावे. कोणताही नवा लेख संपादन करतांना त्या नावाचा लेख अस्तित्वात आहे की नाही हे आधी पहावे, नव्या लेखाचे वर्गीकरण त्याप्रमाणे योग्य वर्गात करावे. तुमच्या कामाच्या धडाक्याबद्दल कौतुक वाटते, तुम्ही कमी काळात खूप लेख संपादन केले आहेत, अभिनंदन. Gypsypkd ०५:३७, १४ जून २०१० (UTC)

त्रिशूर, इ.[संपादन]

तृश्शूर हे नाव अधिक योग्य वाटते असे माझे मत आहे

संदर्भ देता येतील का?

अभय नातू ०५:२३, १५ जून २०१० (UTC)

नावाच्या विवरणाबद्दल धन्यवाद. हेच किंवा असेच विवरण एखाद्या समसमिक्षित (peer-reviewed) प्रकाशनात मिळू शकेल काय? तसे मिळाल्यास त्याचा संदर्भ लेखात देता येईल व नंतर होणारे वाद टळतील.
अभय नातू २२:२६, १५ जून २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

धन्यवाद, माझ्या कामीची दखल तुम्ही घेतलीत त्यासाठी. मी पण GECA चा विद्यार्थी आहे आणि औंरगाबादचा आहे.

तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुमचे अभिनंदन व शुभेच्छा.

Maihudon ०६:२५, १७ जून २०१० (UTC)

इंग्लिश मजकुरासंबंधी विनंती[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार!

आपण लिहावयास घेतलेल्या लेखांपैकी काही लेखांमध्ये इंग्लिश मजकूर (बहुधा भविष्यकाळात अनुवादण्यासाठी) ठेवलेला दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत मराठी विकिपीडियावर अनुवादण्याच्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असे इंग्लिश परिच्छेद महिनोन्महिने त्या लेखात पडून राहण्याचा आणि त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या वाचनीयता/दर्जा वाचकांच्या/ अभ्यागतांच्या मनातून घसरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आपल्या मनात मराठी भाषांतरासाठी निश्चित आराखडा/वेळापत्रक/तुमच्या उपलब्ध वेळेविषयी खात्री नसल्यास, तूर्तास लेखांमध्ये जमेल तितका (२-३ वाक्ये असल्यासही हरकत नाही) मराठी मजकूरच लिहावा, इंग्लिश मजकूर शक्यतो ठेवू नये, अशी व्यक्तिगत विनंती (प्रबंधकपदावरून नव्हे :) ). इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा आंतरविकी दुवा देणे/ संदर्भाचे दुवे नोंदवणे, इतपत तजवीज करणे तूर्तास श्रेयस्कर ठरेल.

इंग्लिश मजकूर उडवायचा नसल्यास, किमान लपवावा - म्हणजे इंग्लिश मजकूर 'कमेंट करावा'. कमेंट करण्याचे चिन्ह वरच्या टूलबारात आहे. कमेंट करण्यामुळे तो मजकूर संदर्भासाठी संपादन खिडकीत दिसेल, पण लेखाच्या दृश्य पानावर दिसणार नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०९, १९ जून २०१० (UTC)

मशीदींसाठी वर्ग[संपादन]

प्रसन्नकुमार,

मशीदींसाठी वर्ग करतो. तोपर्यंत साचा:युरोपातील मशीदी याचे भाषांतर करुन तुम्ही तयार केलेल्या मशीदींच्या लेखांत तो घालावा.

अभय नातू १८:३३, २४ जून २०१० (UTC)

किमान मजकुराची अपेक्षा[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार!

आपण गेले काही दिवस मराठी विकिपीडियासाठी उत्साहाने काम करीत आहात, त्यामुळे माझ्यासारख्या अन्य विकिकरांनाही कामाला हुरूप येत आहे. तुमच्या उत्साही सहभागाचे कौतुक आहेच, पण त्याच्या जोडीने काही बाबींवर अधिक सुधारण करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष वेधावेसे वाटते. गेल्या काही दिवसांतल्या आपण बनवलेले लेख निरखले असता, त्यात मोजके दोन-तीनच शब्द किंवा शीर्षकाचीच पुनरावृत्ती असल्याचे दिसते. परंतु सर्वसामान्य वाचकाच्या/पाहुण्या नेटिझनाच्या दृष्टीने मी असे लेख मराठी विकिपीडियावर पाहिल्यास, मला त्यातून माहितीचे एकही वाक्य मिळत नाही, अशी खंत जाणवते. त्या विषयाची इंग्लिश विकिपीडियाइतकी सांगोपांग माहिती मराठी विकिपीडियावर मिळाली नाही, तरी किमान लेखाच्या विषयानुरूप एखाद-दोन वाक्ये असतील, तरी बरे होईल. अभ्यागताच्या दृष्टीने सध्या मराठी विकिपीडियाची आशयघनता बरीच कमी आहे. उदा. येथील सांख्यिकीनुसार इंग्लिश विकिपीडियाची खोली (डेप्थ) ५९९, मल्याळम विकिपीडियाची ३८०, फ्रेंच विकिपीडियाची १३९, बंगाली विकिपीडियाची ९९, चिनी विकिपीडियाची ६७, तमिळ विकिपीडियाची २८ तर मराठी विकिपीडियाची १७ आहे. पानाच्या डावीकडच्या 'सुचालन' पट्टीत 'अलीकडील बदल' या दुव्याखाली 'अविशिष्ट लेख' दुवा आहे - त्या दुव्यावर टिचकी मारली असता, एखाद रँडम लेख वाचकाला पेश केला जातो. प्रयोग म्हणून आपण 'अविशिष्ट लेख' दुव्यावर १० वेळा टिचकी मारून १० रँडम पाने उघडून बघा, त्यातील बहुसंख्य पानांवर एखाद्या ओळीची किंवा त्याहूनही कमी माहिती भरलेली आढळते. एकंदरीत परिस्थिती पाहता मराठी विकिपीडियावर लेखसंख्या वाढवण्याच्या जोडीने (किंबहुना त्याहूनही अधिक) लेखांची खोली (म्हणजे माहितीची व्याप्ती) आणि दर्जा (चित्रांचा, साच्यांचा वापर, सुसूत्र मांडणी, व्याकरण-शुद्धलेखन इत्यादी भाषक मूल्ये) या दोन्ही पैलूंवर मोठे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर तुमच्यासारख्या उत्साही विकिकरांकडून अधिक 'सखोल' योगदानाची अपेक्षा करावीशी वाटते. मी वर नोंदवलेली तुम्ही निर्मिलेल्या नवीन लेखांवरील निरीक्षणे ही वैयक्तिक पातळीवरील टीका असल्याचा गैरसमज करून घेऊ नये, अशी विनंती. किंबहुना तुमच्यासारख्या विकिकरांपाशी विश्वासाने आणि अपेक्षेने मांडलेले हे विचार आहेत. मराठी विकिपीडियाचे 'माहितीकोश' म्हणून मूल्य वाढवायचे असेल, तर आपल्याला ही सामायिक दूरदॄष्टी राखली पाहिजे. त्याच प्रांजळ हेतूने ही प्रतिक्रिया आपणास कळवत आहे.

धन्यवाद.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३७, २७ जून २०१० (UTC)

धन्यवाद! बाकी, रामचंद्र गोपाळ तोरणे या लेखात मराठी विकिपीडियावर अपेक्षित असलेल्या लेखनशैलीनुसार थोडे फेरफार केले आहेत. ते फेरफार एकदा बघा; जेणेकरून मराठी विकिपीडियाच्या लेखनशैलीशी आपल्या सर्वांची संपादने बरीचशी मिळती-जुळती असतील. आपल्या सहभागाबद्दल आदर आहेच. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:२५, ३० जून २०१० (UTC)

अभिनंदन![संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार! आपल्या अभिनंदनात्मक संदेशाबद्दल धन्यवाद आणि आपलेही तितकेच अभिनंदन/कौतुक! हा टप्पा मोलाचा असला, तरीही काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधून घ्यावेसे वाटल्याने विकिपीडिया:चावडी#सिंहावलोकन की कायसेसे येथे एक तुलना मांडली आहे; ती कॄपया पाहावी.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:३८, २ जुलै २०१० (UTC)

३०,०००[संपादन]

नमस्कार,

३०,००० लेखांनिमित्त पाठवलेला संदेश मिळाला. तुमच्याआमच्यासारख्या अनेक संपादक व हितचिंतकांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. अशीच प्रगती होईल ही आशा.

अभय नातू ०५:३१, ३ जुलै २०१० (UTC)

ऑडिओ व्हिडीओ फाईल फॉरमॅट्स साठी मराठी शब्द[संपादन]

सहसा ऑडियो = श्राव्य आणि व्हिडियो = दृक्श्राव्य असे होईल (सहसा व्हिडियोमध्ये आवाज आणि दृष्ये दोन्ही असतात).

फाइल = संचिका

फॉर्मॅट = ? (आत्ताच्या आत्ता याला शब्द सुचत नाही आहे)

अभय नातू ०५:३९, ३ जुलै २०१० (UTC)

फॉर्मॅट असेच म्हणावे. मात्र त्याचे व्याकरण '(तो) फॉर्मॅट (एकवचनात) => (ते) फॉर्मॅट (अनेकवचनात)' ('(तो) कागद - (ते) कागद' याप्रमाणे) असे लिहिणे योग्य ठरेल. 'फॉर्मॅट्स' असे अनेकवचन इंग्लिश व्याकरणाप्रमाणे होईल. हा शब्द मराठीत उसना घेतल्यास, त्याला मराठी व्याकरणाचे नियम वापरणे इष्ट ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:००, ३ जुलै २०१० (UTC)

Credits = श्रेयनामावली व शुद्धलेखनाच्या नियमांचे साहाय्य पान[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार!

कादलर दिनम येथे 'Credits' असे उपविभागाचे शीर्षक दिसले. तिथे कृपया 'श्रेयनामावली'/ 'कलाकार' असा काहीतरी मराठी शब्द लिहावा, अशी विनंती. मराठी लेखांमध्ये कारणाशिवाय दुसर्‍या लिपीतील लेखन भाताच्या घासत खडा लागावे, तसे लागते. त्यामुळे 'Credits' वगैरे शब्दांसारखे लेखन या किंवा अन्य लेखांमध्ये राहिले असल्यास, ते तसे दुरुस्त करावे. गरज भासल्यास चावडीवर मदत मागावी; परंतु लेखामध्ये 'सुपूर्त करतेवेळेस' अमराठी मजकूर शक्यतो असू नये, याची काळजी घ्यावी.

त्याच लेखात 'व्यक्तीरेखा' असे एका ठिकाणी लेखन झाले आहे. मराठी शुद्धलेखन नियमांनुसार अंत्याक्षर इकार-युक्त किंवा उकार-युक्त असलेल्या शब्दांचे लेखन दीर्घान्त केले जाते. म्हणजे 'व्यक्ती, गरिबी, कामसू' इत्यादी. मात्र यातील संस्कृतोद्भव शब्द मूळ सामासिक शब्दांमध्ये (जसे 'व्यक्तिरेखा') लिहिताना संस्कृतातील लेखनाप्रमाणे र्‍हस्व इकार-युक्त लिहिले जातात (शुद्धलेखन नियम क्र. ५.६ - नियमावलीसाठी पुढे दिलेला दुवा पाहा). मराठी विकिपीडियावर मराठी शुद्धलेखन नियमांचे पान उपलब्ध आहे; ते लिहितेवेळेस संदर्भ म्हणून वापरल्यास शुद्धलेखनाच्या चुका टाळावयास मदत होईल.

हे सांगायचे प्रयोजन म्हणजे, एव्हाना तुम्ही मराठी विकिपीडियावर रुळला आहात. आता आपल्या संपादनांमध्ये, लेखनामध्ये अधिक परिष्कृत (इंग्लिश : Refined) दर्जा वाचायला मिळावा व मराठी विकिपीडीयावर अधिक दर्जेदार लेखन तुमच्या योगे व्हावे, अशी (वाढीव :) ) अपेक्षा आहे. या अपेक्षांना आपले लेखन खरे उतरेल, असा विश्वासही वाटतो.

धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:५२, ४ जुलै २०१० (UTC)

वर्गीकरण[संपादन]

नमस्कार, तुम्ही बनविलेले काही लेख पाहिले. बर्‍याच लेखांची नावे वाचून ती कशाबद्दल आहेत ते समजले नाही तसेच अनेक लेखांचे वर्गीकरणही झालेले नाही किंवा बर्‍याच लेखांमध्ये त्यांचे इतर भाषेतील लेखांशी दुवे जोडलेले नाहीत. उदा. अजगर आणि गंधर्व हा लेख पहावा. या लेखाच्या नावावरून तो कशा विषयी आहे ते समजत नाही. योग्य लेखनाव/वर्गीकरण करावे. काही अडचण येत असल्यास मोकळेपणाने कळवावे. Gypsypkd ०५:४०, ६ जुलै २०१० (UTC)

गाण्यांचे लेख कशासाठी?![संपादन]

नमस्कार!

तुम्ही काही गाण्यांचे लेख बनवल्याचे पाहिले; त्याचे प्रयोजन कळले नाही? गाण्यांची शब्दरचना द्यायची असेल, तर त्यात प्रताधिकारांचे उल्लंघन होऊ शकते. विकिपीडिया 'मुक्त ज्ञानकोश' आहे, याचा अर्थ तो 'सर्वांसाठी खुला असलेला आणि प्रताधिकारमुक्त प्रकल्प' आहे. येथे लिहिलेल्या लेखांवर, सामग्रीवर कुणालाही प्रताधिकाराचा दावा करता येत नाही; त्याप्रमाणेच येथे प्रताधिकारित लिखाण/सामग्रीही अपवादात्मक परिस्थितींशिवाय चढवू नये, असे अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या गाण्यांवरील लेखांचे समर्थन मांडावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१०, ६ जुलै २०१० (UTC)

वर्गीकरण २[संपादन]

नमस्कार, कालच्या चर्चा वर्गीकरण प्रमाणे तुम्ही एका लेखाचे वर्गीकरण केल्याचे दिसले. पण तुम्ही तयार केलेले अवर्गीकृत, विषय कळत नाही असे अनेक लेख आहेत. उदा. अण्णा वडगावकर. विकिपीडियावरील सगळे अवर्गीकृत लेख येथे आहेत, त्यातील तुम्हाला शक्य असतील, तुम्ही तयार केलेले असतील असे सर्व लेख पहावेत, त्यांचे वर्गीकरण करावे. Gypsypkd ०७:५५, ७ जुलै २०१० (UTC)

वर्ग:ज्योतिष्यशास्त्र व वर्ग:ज्योतिष[संपादन]

नमस्कार!

वर्ग:ज्योतिष्यशास्त्र हा वर्ग चुकीचे लेखन आहे. 'ज्योतिष्यशास्त्र' असा शब्द नसून 'ज्योतिषशास्त्र' असा योग्य लेखन लिहिलेला शब्द योजला जाऊ शकतो.

आणि तसेही, हा वर्ग अगोदरपासून तयार असल्याने, आपण नवीन लेखांचे वर्गीकरण त्याच वर्गात करावे. आपले काम झाल्यावर मी वर्ग:ज्योतिष्यशास्त्र उडवून टाकेन. नवीन वर्ग बनवण्याआधी तत्सम नावांनी विकिपीडियावर शोधून बघावे. तत्सम वर्ग अगोदरच उपलब्ध असतील, तर ते संबंधित लेखांमध्ये सापडतील व तुमचा हेलपाटा वाचेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४६, ७ जुलै २०१० (UTC)

दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा[संपादन]

मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)

विन७, फाँट[संपादन]

नमस्कार,

विन७मधील फाँट बद्दल मला जास्त माहिती नाही त्यामुळे माझ्याकडे specific उत्तर नाही, पण वेगवेगळे फाँट वापरले असता तीच युनिकोड अक्षरे वेगवेगळी दिसतात हे नक्की, तरी बहुतेक तुमचा व विकिपीडियावरील फाँट वेगवेगळा असल्यामुळे असे होण्याची शक्यता आहे. विकिपीडियावर मंगल फाँट वापरला जातो (असे वाटते...बरीच वर्षे झाली install करून).

याला थोडेसे विषयांतर म्हणजे जिमी वेल्सशी झालेल्या माझ्या चर्चेत आम्ही यावर थोडेसे बोललो. मराठी विकिपीडियासमोरील समस्या यांत मी फाँटच्या प्रमाणीकरणाचा अभाव आणि ते फाँट ऑपरेटिंग सिस्टममध्ये नसल्याची क्षती हे दोन मुद्दे मांडले. जिमीने माझी ही व्यथा/तक्रार खुद्द बिल गेट्सशी बोलताना पुढे आणण्याची हमी दिली आहे. वेल्स व गेट्स यांची पुढील महिन्यात भेट ठरलेली आहे त्यावेळी हा मुद्दा वेल्स मांडतील. अर्थात, हे फक्त मराठी विकिपीडियाबद्दल नसून सगळ्याच अ-रोमन लिपी असललेल्या विकिपीडियांबद्दल आहे.

तरी विन८मध्ये अचानक देवनागरी लिपी प्रमाणीकृत (standard) झाली तर तुमच्या लक्षात येईलच की यामागचा कार्यकारणभाव काय आहे ते....:-)

अभय नातू १८:५७, ८ जुलै २०१० (UTC)

हिंदीविकिपीडियाचे प्रवेशद्वार म्हणजे मराठी विकिपीडियाचे दालन[संपादन]

हिंदीविकिपीडियाचे प्रवेशद्वार म्हणजे मराठी विकिपीडियाचे दालन,म्हणजेच इंग्रजी विकिपीडियाचे Portal; Portal शब्दाचे हिंदी विकिपीडिया आणि मराठी विकिपीडियाने केलेली भाषांअतरणे केवळ वेगळी आहेत.

आपण स्वतःही एखादे नवीन दालन पान चालू करू शकता.विकिपीडिया वाचकाभिमूख बनवण्यात portal/दालन/प्रवेशद्वार चांगली भूमिका निभावतात. आपल्याला असे दालन चालू करावयाचे असल्यास विकिपीडिया:नवी दालने येथे काही प्रमाणात सहाय्य आणि तयार रिकामे आराखडे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठी विकिपीडियावरील सध्याची दालन पाने आपल्याला वर्ग:दालने येथे पहावयास मिळतील पण सदस्यांच्या संपादन पाठबळा अभावी त्यातील बरीच अपूर्ण अवस्थेत आहेत त्यातल्या त्यात दालन:सूर्यमाला हे चांगल्या अवस्थेत आहे.त्या पाठोपाठ दालन:मराठवाडा येथे असा प्रयत्न मी केला आहे.

दालन शब्दापेक्षा प्रवेशद्वार हा शब्द बोध होण्यास किंवा अधीक प्रभावी वाटत असेल तर तसे कळवावे म्हणजे अजून व्यापक चर्चा करून मराठी विकिपीडियावरील दालन/प्रवेशद्वारांची संख्या वाढण्याच्या आधीच काही बदल घडवता येतो का ते पहाता येईल माहितगार १५:३५, ९ जुलै २०१० (UTC)

मी सांगण्याआधी माहितगारांनी आधी व जास्त माहिती तुम्हाला कळवलीच आहे.
प्रवेशद्वार पेक्षा दालन हा शब्द जास्त सयुक्तिक वाटतो कारण अशा पानावर एखाद्या विषयावरील वेगवेगळी artifacts मांडलेली असतील (लेख, साचे, चित्रे, इ). एखाद्या संग्रहालयात जसे इजिप्त दालन, आफ्रिका दालन अशा वेगळ्या खोल्यांतून त्या-त्या विषयांवर सर्वंकष माहिती दिली जाते असे काहीसे येथे अभिप्रेत आहे.
अभय नातू १५:४४, ९ जुलै २०१० (UTC)

दालनांविषयी आणि (पुनश्च) एक विनंती[संपादन]

नमस्कार!

तंजावूर लेखात मोजकी दोन-तीन वाक्ये वगळता इंग्लिश मजकूर आणलेला दिसत आहे. आपणाला कृपया एक विनंती पुन्हा करतो - लेख सुपूर्त करताना (= सबमिट करताना) पूर्ण मराठीत जेवढी थोडीथोडकी वाक्ये जमतील, तेवढ्याच आशयासहित का होईना, पण लेख शक्यतो मराठीतच सुपूर्त करावा. आपल्याला इंग्लिश विकीवरून हळूहळू भाषांतर करायचे असल्यास, ते हळूहळू तिकडचे पाहून परिच्छेदागणिक करता येईल. किंवा हवेच असल्यास, आपण इंग्लिश विकीवरील लेख आपल्या व्यक्तिगत संगणकावर डाउनलोड करून त्याचे छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये भाषांतर करून मराठी विकिपीडियावर आणू शकता. हे सर्व काम तुम्ही ऑफलाइन करू शकता अथवा टप्प्या-टप्प्याने ऑनलाइन करू शकता.

मराठी विकिपीडियावर मराठी नसलेला आशय आणायची घाई करण्याची काहीही आवश्यकता नाही. तो जिथे असेल, तिथून आपल्याला संदर्भासाठी कधीही पाहता येईल.

बाकी, आपण हिंदी विकीवरील जो दुवा दिला, त्याला ते लोक प्रवेशद्वार म्हणतात व इंग्लिशीत पोर्टल म्हणतात. आपल्याकडे 'दालन' या संज्ञेने उल्लेखलेला हा उपक्रम माहीतगारांनी आरंभला होता... काही दालने सुरूही केली होती. वर्ग:दालने इथे काही उदाहरणे पाहायला मिळतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:१७, ९ जुलै २०१० (UTC)

तमिळनाडु/डू[संपादन]

तमिळनाडु च योग्य आहे र्‍हस्व उच्चार कारण डु चा उच्चार ड् असाच होतो आणि तमिळ भाषेत र्‍हस्व लिहिले आहे.

मराठी शुद्धलेखननियमांनुसार शब्दांती कार आल्यास दीर्घ होतो. स्थानिक भाषेतील उच्चार जसेच्या तसे ठेवावे हे माझे वैयक्तिक मत आहे (म्हणजे तमिळनाडु असेच) पण याबद्दल मराठी विकिपीडियनांत एकवाक्यता नाही. कदाचित यावरुन पुन्हा चर्चा होईल सुद्धा.

अभय नातू १७:३६, ९ जुलै २०१० (UTC)

दालन[संपादन]

अहो नातू मी शिकतोय खरतर मी ते फक्त कॉपी पेस्ट करून काहीतरी करून पाहतोय एकदा का तांत्रिक बाजू कळाली ना मग अगदी सजावट करुनच दालने तयार करेल

तुम्ही पुढाकार घेउन दालन तयार करणे कौतुकास्पदच आहे. त्यात करताकरता ज्या दिसतील त्या दुरुस्ती सुचवत आहे. चुका काढतोय असे नाही... :-)

अभय नातू १७:३८, ९ जुलै २०१० (UTC)


संदर्भासाठी उपयुक्त[संपादन]

नमस्कार प्रसन्नकुमार,

आपण माझ्या लिखाणाची दखल घेतलित त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपले सदस्य पान पाहिले, आपल्या चौकस लिखाणावरुन आपण वाचता आणि आपल्याकडे अनेक संदर्भ आहेत असे दिसते. आपण दलित साहित्याविषयी विचारलेत आणि आपणास याविषयाची आवड आहे हे बघुन मला आनंद झाला. कारण मी बहुतेक लेख हे दलित साहित्याच्या अनुषंगानेच लिहिले आहेत. आपणास माहिति हवी होती ती अशी की दलित कविता, कादंबर्या व दलित साहित्याच्या लेखकांची व लेखनाची सूची आहे का ? अशी काही सूची आहे या विषयी मला माहित नाही, परंतु मराठी लेखकांची व लेखनाची माहिती असलेले कोश उपलब्ध आहेत. त्यापैकी "संक्षिप्त वाङमयकोश" असा एक कोश मला माहित असून वसंत डहाके आणि इतर लेखक यांनी त्या ग्रंथाचे संपादन केले आहे. आपण जरुर ते पहावे. धन्यवाद ! सदस्य:अधांतर ११:११, १० जुलै २०१० (UTC)


  • हे पहा : Poisoned bread: translations from modern Marathi Dalit literature By Arjuna Ḍāṅgaḷe. अधांतर ०८:४९, १५ जुलै २०१० (UTC)

एकत्रित नाव[संपादन]

प्रसन्नकुमार,

४,००० संपादनांबद्दल अभिनंदन. अजून १,००० संपादने झाली की तुम्ही पाच हजारी सरदार होणार...:-)

एकत्रित खात्याबद्दल म्हणजे तुमचे कोणतेही खाते असेल त्या नावाने तुम्ही सगळ्या प्रकल्पांवर काम करू शकता. उदा. माझे इंग्लिश विकिपीडिया व मीडियाविकिवर asnatu_wiki या नावाचे खाते होते पण हल्ली मी अभय नातू या नावानेच सगळीकडे वावरतो. त्यासाठी मी asnatu_wiki हे खाते सोडूनच दिले आहे. जर तुम्हाला दोन प्रकल्पांवरील दोन वेगळी नावे एकत्रित करावयचायी असतील तर त्यासाठी तेथील bureaucrat किंवा stewardला विनंती करावी लागेल. ते किंवा त्यांपेक्षा जास्त अधिकार असलेले अधिकारी हे काम करू शकतील असा माझा अंदाज आहे.

अभय नातू ०३:४७, ११ जुलै २०१० (UTC)

प्रचालक, प्रशासक[संपादन]

१)ह्यातील नक्की कोणता शब्दप्रयोग आपण करतो?कारण संबंधीत पृष्ठावरील माहिती गोंधळ उडविणारी आहे असे मला वाटते निदान शब्द त्यांचे इंग्रजी अर्थ आणि २ वाक्यात माहिती अशी सूची असती तर चटकन कल्पना आली असती

प्रचालक व प्रबंधक हे सहसा एकाच पदाला संबोधून वापरले जातात. इंग्लिशमधील admin किंवा sysop या अर्थाने हे योजले जातात. हा अधिकार असलेले सदस्य पाने वगळू शकतात, सदस्यांवर बंदी घालू/काढू शकतात व इतरही अनेक साफसफाई साठी उपयुक्त असलेली कामे करू शकतात.
प्रशासक हे इंग्लिशमधील bureaucratला साजेसा शब्द वापरला जातो. इतर सदस्यांना प्रचालक करणे, सदस्याच्या कामगिरीचा मागोवा घेणे (आयपी ट्रेसिंग व इतर प्रकारे) इ वाढीव अधिकार या पदाला असतात.
एक लक्षात घ्या की हे दोन्ही अधिकार अधिकार नसून मोठ्या जबाबदार्‍या आहेत. यात मान कमी आणि अपमान जास्त हाच माझा अनुभव आहे.

२) ह्या पदासाठी मी पात्र आहे का?

यासाठी मी तुम्हाला थेट सांगू शकत नाही. याचे निकष फारसे लिहूनही ठेवलेले आठवत नाही पण सहसा पात्रतेच्या निकषांत
  • मराठी विकिपीडियावर बराच काळ (वर्षभर किंवा जास्त) कार्यरत असणे
  • एकंदर विकिपीडिया व मीडियाविकिवरील नियम व कार्यपद्धतीची माहिती असणे
  • क्लिष्ट साचे, वर्गवारी व तत्सम गोष्टींची माहिती असणे व ही माहिती इतरांना देणे
  • तेथील नेहमीच्या सदस्यांशी मेळ घालून अनेक छोटे उपप्रकल्प पार पाडणे
  • येथील लिखित व अलिखित नियमांची जाण असणे व ते लागू करण्यात पक्षपात किंवा भीड/लाज/भीती न बाळगणे
  • स्वतःवर करण्यात आलेली टीका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे
  • कितीही उद्धट, उर्मट व अविवेकी संदेशांना शांतपणे नियमांनुसार उत्तरे देणे
  • मराठी विकिपीडिया हा मराठीभाषकांची संपत्ती असून त्यांचा निर्णय अंतिम असतो याची जाण असणे
ही प्रचालकाची काही लक्षणे आहेत.

३) अर्ज विनंती कुठे आणि कशी करावी? ती इतरांना कशी समजेल?

अर्ज विनंती तुम्ही चावडीवर करू शकता. त्याचबरोबर विकिपीडिया कौलपानावर कौल घेतला पाहिजे. त्यावर इतर सदस्य पाठिंबा, विरोध किंवा हातचे राखून पाठिंबा (conditional support) देऊ शकतात. काही काळ असा कौल घेतल्यावर जर सकारात्मक कौल आल्यास मीडियाविकिवरील steward किंवा मराठी विकिपीडियावरील bureaucrat तुम्हाला प्रचालकपद देतील.
यावर मी विसरत असलेली माहिती इतर सदस्यही तुम्हाला देतील.

४)त्याद्वारे इतर काय जबाबदारी येऊन पडते?ह्या विषयी मार्गदर्शन करावे.

यासाठी वरील विवरण वाचावे.

मी आजच http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Emijrp/List_of_Wikipedians_by_number_of_edits हा दूवा पाहिला ज्यात सर्व संपादकांची क्रमवारी दिली आहे ज्यात संपादनांनुसार आपला क्रम आणि एकुण संख्या कळते,असेच दूवे तुम्ही मागे मला दिले होते परंतु ते आता काम करत नाही,कृपया ह्याविषयी अधिक माहिती असणार्‍या दूव्यांची माहिती द्यावी.म्हणजे माझे सविस्तर वर्गीकृत संपादन इतिहास,नविन लेख,जूने,चित्र संचिका इ.

आत्ता लगेच आठवत नाही पण सापडला की कळवतो.
अभय नातू ०४:०६, ११ जुलै २०१० (UTC)

येथे नजर टाका -

कौल द्या

अभय नातू ०४:२२, ११ जुलै २०१० (UTC)

आपली प्रचालकपद विनंती[संपादन]

आपण प्रचालकपदासाठी उत्सुक आहात हि चांगलीच गोष्ट आहे.मी आपले सर्व नामविश्वातील योगदान अभ्यासले सर्वसाधारण पणे विकिपिडिया संकेतांना आपण पारंगत होत चालला आहत असे म्हणता येईल. पण प्रचालक कार्य संदर्भाने दोन गोष्टीत सुधारणेत वाव आहे असे वाटते.
पहिले आणि महत्वाचे आपण चढवलेल्या चित्रसंचीकात त्यांच्या प्रताधिकारमुक्तते विषयी टिपण्ण्यांचा अभाव आहे, आणि याबाबतीत आम्ही (आपले सहविकिपीडियन) आपल्याला सजग करण्यात कुठेतरी कमी पडलो असे वाटते आहे. या संदर्भाने विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा आणि विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प ह्या पानांवरील माहिती अभ्यासावीत.
आपल्या इतर सदस्यांशी चर्चा झाल्या आहेत पण त्यांचे स्वरूप आता पर्यंत सहसा मार्गदर्शन प्राप्त करणारे आहे,नवीन सदस्यांना मार्गदर्शन देणे सुरू केलेत तर प्रत्यक्षात येणार्‍या अडचणी आणि सोल्यूशन्सशी अधीक जवळून परिचय होण्यास प्रारंभ होईल.या अनुषंगाने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू सवडीनुसार अभ्यासावे असे वाटते.
विकिपीडिया:प्रचालक/कामे या संदर्भाने विकिपीडिया:नामविश्व, विकिपीडिया:निर्वाह, विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन ; विकिपीडिया:कारण ; विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी, विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ; विकिपीडिया:पहारा आणि गस्त या गोष्टींशी परिचीत आहात याची खात्री करून घेतलीत तर भावी प्रचालकांचा प्रवास अधीक सुकर होईल असे वाटते.
आपल्या भावी विकिपीडिया वाटचाली करिता मन:पूर्वक शुभेच्छा !
माहितगार ०६:३६, १२ जुलै २०१० (UTC)

काही गोष्टींबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची विनंती[संपादन]

नमस्कार!

आपण प्रचालकप्रदासाठी अर्ज केल्याचे वाचून आनंद वाटला. आपण आजवर करीत आलेल्या संपादनांवरून माझी काही निरीक्षणे मांडतो... ज्यावर प्रचालकपदाच्या कौलाचा निर्णय ठरण्याआधी आपण अधिक चांगले काम करू शकलात किंवा त्यांबद्दल जागरूकपणा/माहिती कमवू शकलात तर बरे होईल.

  1. वर्गीकरण - आपण केलेल्या संपादनांमध्ये अजून योग्य वर्गीकरणाचा दर्जा येणे अपेक्षित आहे; जेणेकरून व्यवस्थापनासाठी, नवीन सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, दुरुस्त्या करण्यासाठी/ सुचवण्यासाठी उपयोग होईल. येथून स्रुरुवात करून वर्गवृक्षाची आणि उपलब्ध वर्गांची जमेल तशी पाहणी करावी; त्यांवरून उपलब्ध वर्गीकरणाचे पर्याय साधारणत: जाणून घ्यावे आणि संपादनांमध्ये त्यांचा अवलंब करावा.
  2. विकिकरण : काही बाबींचे यथायोग्य विकिकरण करणे - उदा.: (अ) इसवी सनांसाठी मराठी विकिपीडियावर [[इ.स. २०१०|२०१०]] असे लिहिल्यावर २०१० असे दिसते; त्यानुसार इसवी सनांचे योग्य विकिकरण करणे. (आ) व्यक्तिवाचक/ स्थलविषयक परकीय नावे असलेल्या लेखांमध्ये मूळ परभाषेतील नाव लिहिताना योग्य विकिकरण करणे - यासाठी चौ एन्लाय हा लेख उदाहरणादाखल पाहावा. त्यात 'पारंपरिक चिनी लिपी' व 'पिन्यिन' यांसाठी मराठी विकिदुवे नोंदवले आहेत. तमन्ना भाटिया व तत्सम लेखांमध्ये त्यानुसार विकिकरण अपेक्षित आहे. (इ) वर्गीकरणात नेमकेपणा असावा. उदा.: तमन्ना भाटिया या लेखाचे वर्गीकरण वर्ग:अभिनेत्री या वर्गात करणे फारच ढोबळ झाले. ते वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री, वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री या वर्गांपुरतेच त्या लेखाचे वर्गीकरण ठेवणे अधिक नेमके होईल. याचे कारण असे, की तमन्ना भाटिया हिला 'सजीव', 'मानव', 'व्यक्ती' अशा वर्गांमध्येही गणता येईल; परंतु माहिती व्यवस्थापनाच्या दृष्टीने लेखाचे नेमके वर्गीकरण करणे हितावह ठरते.
  3. इंग्लिश भाषा/ रोमन लिपी गॄहित धरू नये - तमन्ना भाटिया या लेखात सुरुवातीला 'Thamannah Bhatia' असे कंसात लिहिले आहे. ते रोमन लिपीतील/इंग्लिश भाषेतील लेखन असल्याने, तिथे तसे स्पष्ट नोंदवावे. मराठी विकिपीडियावर गृहित भाषा 'मराठी' असून गृहित लिपी 'देवनागरी' असल्याचे कायम ध्यानात ठेवावे. अन्य लिप्यांमधील / भाषांमधील शब्द / लघुरूपे (शॉर्टफॉर्म) लिहिताना त्या-त्या भाषेचे किंवा लिपीचे नाव व मराठी विकिदुवा नोंदवावा. हीच बाब इंग्लिश किंवा अन्य भाषक संकेतस्थळांचे 'बाह्य दुवे' लेखाच्या तळाशी जोडताना लक्षात ठेवावी व '(अमुक तमुक भाषेतील मजकूर)' असे त्या दुव्यात नोंदवावे. उदा.: मुहम्मद अली झीणा या लेखातील बाह्य दुवा पाहावा, त्यात '(इंग्लिश मजकूर)' असे अखेरीस नोंदवले आहे. या पद्धतीचा अवलंब करण्याचे कारण असे, की मराठी भाषक वाचकांना शक्यतो मराठीतले दुवे मिळणे गृहित असणार, अन्य भाषेतील दुवे लेखात नोंदवावयाचे असल्यास, त्याची वाचकांना पूर्वकल्पना देणे इष्ट.
  4. विकिसिंटॅक्स (विकिकरणाचे विविध सिंटॅक्स) एकंदरीत जाणून घ्यावे. नवीन सदस्यांना मदत करताना, दुरुस्त्या करताना ते कायम उपयोगी पडतात. सहाय्य:संपादन येथे संक्षिप्त सूची आहे, ती या बाबत उपयोगी पडू शकेल. खेरीज, जुन्या निर्वाचित मासिक सदरउदयोन्मुख सदर लेखांवरून दर्जेदार लेखनशैलीची सूत्रे अवलोकन करून आपली आपण पडताळावीत व त्यांतील शक्य तितकी आपल्या संपादनांमध्ये अमलात आणावयाचा प्रयत्न करावा.
  5. मराठी शुद्धलेखनाचे नियम अभ्यासत रहावे व आपले व इतरांचे मराठी विकिपीडियावरील लेखन अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी झटावे.

वरील टिप्पण्या व तमन्ना भाटिया लेखाचे उदाहरण केवळ वानगीदाखल आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपली प्रचालकपदाची उमेदवारी समर्थनीय सिद्ध करता यावी, या दृष्टीने हे मुद्दे आपल्या नजरेस आणून देण्याचा हा खटाटोप आहे. यामागे मराठी विकिपीडियाच्या दर्जात वृद्धि होणे, हा हेतू आहे. ही व्यक्तिगत टीका समजू नये, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२५, १२ जुलै २०१० (UTC)

कौल निकाल[संपादन]

  • येथील कौलाचा निकाल मला साधारणपणे कधी कळू शकेल आणि कुठे?
विकिपीडिया:कौल/प्रचालक येथेच कौलाचा निकाल दिला जाणे अभिप्रेत आहे.ज्या अर्थी कुणी विरोध नोंदवला नाही त्या अर्थी अगदीच विरोध नोंदवण्यासारखे काही कारण ना मला दिसले ना इतर कुणाला दिसले असावे.इतरांची मते माझ्या मतामुळे पुर्वग्रह दुषीत होऊ नयेत तसेच चर्चेचा भाग जास्त असल्यामुळेही म्हणून मी माझे म्हणणे कौल पानावर लिहिण्या एवजी आपल्या चर्चा पानावर नोंदवले.अधीक प्रचालकांची मराठी विकिप्रकल्पांना आवश्यकता आहे यातही वाद नाही.

प्रचालकपदाची विनंती करणार्‍या व प्रचालक पद मिळालेल्या व्यक्तींना मागेही त्यांच्या चर्चापानावरून विवीध अपेक्षा आणि प्रश्न केले गेले आणि काही काळा नंतर सदस्यांचे समर्थन मिळत गेले आहे.आणि बर्‍यापैकी लांब कालावधी लागल्याची उदाहरणे आहेत. काही वेळा माझ्या प्रमाणे प्रचालक विनंतीच उशीरा म्हणजे चिक्कार संपादनांनंतर आणि ४-५ वर्षांनतर केल्यामुळे आधीच सर्व सदस्यांना माझे कार्य माहित असल्यामुळे समर्थन लवकर प्राप्त झाले.ततपूर्वीचा सर्व काळ मी माझ्या सगळ्या प्रचालकीय विनंत्या विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन येथे नोंदवल्या आणि इतर आधीच्या प्रचालकांनी त्या पूर्णही केल्या.आपणास स्वतःला जेव्हा हे अधिकार प्राप्त होतील तेव्हा प्रत्यक्शात त्यांची निकड सामान्यतः खूप नसते हे आढळून येईल. चिक्कार संपादने झालेलेल्या मैही डॉन सारख्या संपादकांनीपण अजून पर्यंत प्रचालक पदाकरिता विंनती केलेली नाही. अर्थात आपणतशीती करण्यात वावगेही काही नाही.

मराठी विकिपीडियाच्या विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट सहप्रकल्पातून पुरेसे प्रचालक पातळीचे सहाय्यलवकर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्याबद्दल केलेल्या प्रचालक विनंत्याना सदस्यांनी वेगाने समर्थन केल्याचे आढळून येते.

मला वाटते सध्यातरी धीर ठेवावा व संपादनाचे कार्य चालू ठेवावे. प्रचालकीय सहाय्याचे काम असेल तर विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन येथे नोंदवावे.

माहितगार १२:०६, १५ जुलै २०१० (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

सादर निमंत्रण[संपादन]

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


आलुपोहा[संपादन]

पोहे #५ इतर माहिती हे बघा म्हणजे कळेल.

वि. नरसीकर (चर्चा)

कृपया आलु लेख बघावा.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:४५, २३ जुलै २०१० (UTC)

अशुद्धलेखन[संपादन]

  • मी संपादिलेल्या अनेक लेखात (बहुतेक ९०%) अशुद्धलेखन आहे. मी आपणास कळकळीची विनंती करतो की ते तपासुन त्यात आवश्यक ते बदल करण्यास हातभार लावावा. मी आपला सदैव आभारी राहील.किमानपक्षी,ते तपासुन, अशुद्ध असेल तर त्यात {{अशुद्धलेखन}}हा साचा लावावा.संकल्प,माहितगार,अभय या मंडळींचा भार तेव्हढाच हलका होईल.
  • दुसरे असे की, आपणास कदाचित कल्पना नसावी म्हणुन सांगतो,भाषा ही प्रत्येक बारा कोसावर बदलते. पुणे ते विदर्भ/नागपूर हे सुमारे ८३० किमी हे अंतर आहे(रेल्वेने) व रस्त्याने सुमारे ७५५ किमी. त्यायोगे भाषेत बराच बदल असु शकतो.तरीपण त्या भाषेस मराठीच म्हणतात.आपणास काही शब्द कदाचित नविन असतील पण ते येथे प्रचलित आहेत.जमेल तर वर्‍हाडी भाषेचे एखादे पुस्तक मिळाले तर वाचुन बघावे म्हणजे आपणास कल्पना येईल.इतक्या दूर भाषेत बरीच सरमिसळ होउ शकते.जसे अमेरीकन इंग्लिश व ब्रिटनचे इंग्लिश.
  • विकिवरील ईतर मंडळी -एका वर्षापेक्षा जास्त काळ झाला,-मला सहन करीत आहेत.आपणही त्यातील एक बनावे ही नम्र विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०४:४८, २३ जुलै २०१० (UTC)

आपण चढवलेली चित्रे[संपादन]

प्रसन्नकुमारजी लेखनसंकेत चर्चेत रंग भरल्यामुळे बटाटे/आलु पोह्यास खमंग चव आली आपली भूमिका हिरहिरीने मांडण्याचे स्वागतच करतो.
क्षमा असावी,या लेखन प्रपंचाचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे आपण चढवलेली चित्रे होत.सहसा एखादी व्यक्ती बरीच संपादने करू लागल्या नंतर प्रत्येक संपादन तपासून मार्गदर्शन केले जातेच असे नाही.सहसा कल चूका करणार्‍या नवागतांना मार्गदर्शन करण्याकडे रहातो.यापूर्वी म्हटल्या प्रमाणे आपण चढवलेल्या चित्रांकडे आपण प्रचालक अधिकार विनंती करे पर्यंत मुळीच लक्ष गेले नाही आपण विनंती केल्या नंतर मी आपली प्रत्येक नामविश्वातील योगदाने पाहिली आणि प्रताधिकार सजगतेची बाब आपल्या वेळीच लक्षात आणून देण्यात विलंब घडला.तो पर्यंत unfortunately[मराठी शब्द सुचवा] मराठी विकिपीडियावर आपली बरीच चित्रे चढवून झाली आहेत. आपण प्रताधिकार विषयावर लवकरात लवकर कल्पना द्यावी.प्रताधिकार कारणाने प्रथम दर्शनी तरी आपली बरीच चित्रे वगळावी लागतील असे दिसते.
हि सर्व चित्रे वगळण्याकरिता आपली सहमती सुनिश्चित करून घेऊ इच्छितो.
आपला सहविकिपीडिया योगदानकर्ता माहितगार १४:०५, २३ जुलै २०१० (UTC)

म्हणजे काय>[संपादन]

>>मी चढविलेली चित्रे आंतरजालातून घेतलेली आहेत.आता त्यावर प्रताधिकार असण्याचे काहीच कारण नसावे.
या विधानास काही कायदेशीर पुष्टी नाही. आंतरजालावरील चित्रे वगैरे सर्व गोष्टी प्रताधिकारमुक्त असल्याचा अर्थ वरील विधानातून निघतो; आणि तो बरोबर नाही.
इथे (इंग्लिश मजकूर)इथे (इंग्लिश मजकूर) यासंबंधी अधिक माहिती मिळेल.
धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०१, २४ जुलै २०१० (UTC)
सर्व सामान्यांमध्ये भारतीयां मध्ये प्रताधिकार् कॉपीराईट विषयाबद्दल अनास्था असली तरी गेल्या काही वर्षात भारतीय कायदे सुद्धा प्रताधिकारा संदर्भाने खूप कडक झालेले आहेत हि वस्तुस्थिती आहे.मला कायद्याची माहिती नाही या गोष्टीला कायदा माफ करत नाही हे लक्षात घेणे जरूरी आहे.सोबतच इतरांनी कायदा मोडला तर तो माझा कायदा मोडण्याचा परवाना ठरत नाही.हि गोष्ट केवळ तत्वाचा भाग म्हणून बघून सोडू नये बर्‍याच भारतीय प्रकाशन संस्था याला अनभिज्ञ लोकांक्डून पैसे मिळवण्याचा उद्योगही करू लागल्याथेत. खाया पिया कुछ नही , विकिपीडियामे समाज सेवा की और घरका गिलास फोडा बाराणे का ? त्या भारतीय कायद्यांच्या परिपेक्षात दृष्टीने विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा आणि विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प ह्या पानांवरील माहिती अभ्यासावीत.
>>मी चढविलेली चित्रे आंतरजालातून घेतलेली आहेत.आता त्यावर प्रताधिकार असण्याचे काहीच कारण नसावे.
माझ्या मते या बद्दल भारतीय कायदा बर्‍यापैकी स्पष्ट आहे. जीथे प्रताधिकार मुक्ती स्पष्ट नमुद केलेले नसेल ते सर्व (लेखक छायाचित्रकाराच्या मृत्यूनंतर ६१ वर्षे मोजून घ्यावीत तो पर्यंत) प्रताधिकारीतच असते त्या लेखक छायाचित्रकाराची ती आपोआप बौद्धीक संपत्ती होते,पुन्हा एकदा नमुद करतो की प्रताधिकार विषय काही नमुद केले नसले तरी ते प्रताधिकारीतच असते रावसाहेब.
त्या मुळे ज्या छायाचित्रांवर स्पष्ट पणे स्वतःची आहेत आणि प्रताधिकारमुक्त करत आहे असे न लिहिलेल्या संचिका वगळण्याचे काम प्रचालक मंडळी करत असतात. माझा हात कालच तुमची छायाचित्रे वगळण्यानकडे वळलेला होता. एखादे आपले स्वतःचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आपल्याशी संवाद कमी पडल्यामुळे वगळले जाऊ नये आणि शक्यतो वगळण्याची क्रिया करण्यापूर्व संबधीत सदस्यास कल्पना देणे

उचीत ठरते म्हणून हा आपल्याशी संवाद साधणे चालू आहे.सहकार्याची नम्र विनंती

माहितगार ०५:२२, २४ जुलै २०१० (UTC)

साचा:Marathihelp[संपादन]

साचा:Marathihelp या साचाचा उद्देश साचा मजकुर वाचल्या नंतर आपल्या लक्षात येईलच. साचात सुयोग्य सुधारणा कराव्यात हि नम्र विनंती.माहितगार १३:५२, २४ जुलै २०१० (UTC)
आपल्याला साचाचा उद्देश लक्षात आला आहे तेव्हा आपण त्यात सुयोग्य वबदल घडवु शकता म्हणजे दाखवा लपवा दुव्यातील सुद्धा काही प्रॉब्लेम नाही.सहाय्याकरिता धन्यवाद.माहितगार ०६:२६, २६ जुलै २०१० (UTC)

तुमचे संदेश[संपादन]

नमस्कार,

तुमचे संदेश मिळाले. गेले काही दिवस येथे फारसे लक्ष देता आले नाही तरी त्यांचा मागोवा काढून काही वेळाने उत्तर देतो.

अभय नातू १७:४८, २५ जुलै २०१० (UTC)

बार्नस्टार[संपादन]

आपण इतर सदस्यांना केव्हाही बार्नस्टार कितीही वेळा देऊ शकता, इतर सदस्यांची सहमती/परवानगी वगैरे लागत नाही. मला खालील साचात बार्न स्टार जोडण्यात सहाय्य (केवळ माझा वेळ वाचवण्याकरिता ) विनंती करतो आहे.

बार्नस्टारसुद्धा समाविष्टकरता सहाय्य हवे[संपादन]

सदस्यांना सुचना आणि मार्गदर्शनाचे विवीध स्तर आता उपलब्ध होत आहेत. एकदम सर्व सूचनांची यादी हातात ठेवल्यास पूर्ण वाचन समजेल अथवा अवलंब होईलच असे नाही. त्यामुळे सदस्यांना संपादनसंख्येचा टप्प्यांनुसार सदस्य मार्गदर्शन करता आले तर सदस्यांनाही फायदा होईल व दर्जाही सुधारण्यास हातभार लागेल असे वाटते. त्या दृष्टीने काही साचे तयार आहेत/प्रस्तावित आहेत. त्यात हजार, पाच हजार आणि दहाहजार या टप्प्य्यांवरील अभिनंदन-सहाय्य सदेशातच बार्नस्टारसुद्धा समाविष्टकरता यावेत या दृष्टीने सुयोग्य बदल करण्यात आपल्या सवडीनुसार सहाय्य हवे आहे.माहितगार