तमन्ना भाटिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तमन्ना भाटिया
तमन्ना
जन्म तमन्ना भाटिया
२१ डिसेंबर, १९८९ (1989-12-21) (वय: ३३)
मुंबई ,महाराष्ट्र ,भारत.
इतर नावे तमन्ना
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ सन २००५-पासुन
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री.
वडील श्री.संतोष भाटिया.
आई सौ.रजनी भाटिया.

तमन्ना भाटिया (रोमन लिपी:Thamannah Bhatia ; तमिळ: தமன்னா ; तेलुगू: తమన్న) (डिसेंबर २१, १९८९,मुंबई,महाराष्ट्र - हयात) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तमन्ना ह्या एकेरी नावाने ओळखली जाणारी ही दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे,तेलुगू आणि तमिळ भाषेतील चित्रपट हे तिचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.चित्रपटांतील अभिनयाव्यतिरीक्त तमन्ना तमिळ व तेलुगू भाषेतील स्थानिक जाहिरातीतून देखील काम करते.अभिनय कारकिर्दीची सुरुवात तमन्नाने वयाच्या १५ व्या वर्षी "चांदसा रोशन चेहरा" ह्या एकमेव हिंदी भाषा चित्रपटाद्वारे केली. चित्रपटातील प्रवेशापूर्वी वयाच्या १३ व्या वर्षी अभिजीत सावंत ह्या प्रसिद्ध गायकाच्या संग्रहातून एका गाण्यातून पाहूणी कलाकार म्हणून दिसली आहे (गाण्याचे बोलः लफ़्जो मैं...).

पार्श्वभूमी[संपादन]

मूळची मुंबईकर असलेली तमन्ना एक सिंधी कुटुंबात जन्मली असून संतोष भाटिया आणि रजनी भाटिया ह्या दांपत्याची ती धाकटी मुलगी आहे. तमन्नाचे शिक्षण मुंबैतील जुहू भागातील माणेकजी कूपर शाळेत झाले आहे. लहान वयात तमन्नाने अल्पावधीत आपल्या अभिनय कौशल्याने दक्षिणेत आपले पाय पक्के रोवले आहेत.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा भाषा नोंदी
2006 केडि प्रियंका तमिळ
2007 व्यापारी सावित्री सूर्यप्रकाश तमिळ
हॅप्पी डेज (२००७ चित्रपट) मधु तेलुगू
कल्लुरी शोभना तमिळ नामांकन, [[फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार उत्कॄष्ट नायिका(तमिळ)]]
2008 कालीदास अर्चना तेलुगू
रेडी स्वप्ना तेलुगू पाहूणी कलाकार
नेट्र इन्ड्र नाळै स्वप्ना तमिळ पाहूणी कलाकार
2009 पडिक्कादवन गायत्री रेड्डी तमिळ उत्तम प्रतिसाद
कोन्चम इष्टम कोन्चम कष्टम गीता सुब्रह्मण्यम तेलुगू
अयन यमुना तमिळ नामांकन, विजय पुरस्कार,सर्वोत्कॄष्ट नायिका ,सुपरहिट
आनन्द तान्डवम मधुमिता तमिळ सर्वसाधारण प्रतिसाद
कंडेन कादलै अंजली तमिळ उत्तम प्रतिसाद
2010 पैया चारुलता तमिळ उत्तम प्रतिसाद
सुरा पूर्णिमा तमिळ सर्वसाधारण प्रतिसाद
तिल्लालंगडी [[तमिळ]] निर्मिती प्रक्रियेत
2011 सिरुदै तमिळ चित्रीकरण
बद्रिनाद तेलुगू चित्रीकरण
शिर्षकरहित सुकुमार प्रकल्प तेलुगू पूर्व-निर्मितीत
अरुवा तमिळ पूर्व-निर्मितीत