सदस्य चर्चा:Eaglespirit
स्वागत
[संपादन]स्वागत | Eaglespirit, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Eaglespirit, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७७४ लेख आहे व १५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
संतोष गोरे ( 💬 ) २१:००, ३० मार्च २०२३ (IST)
आपली संपादने
[संपादन]नमस्कार, आपण छत्रपती संभाजीनगर या लेखात बदल करत आहात. कृपया येथे त्याचे विश्लेषण कराल का?
कारण तुम्ही जो हा संदर्भ दिलाय त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने स्टे देण्या ऐवजी, स्टे मागणाऱ्या सदस्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने नामांतर रद्द केले असे होत नाही. आणि ही बातमी २४ मार्च २०२३ ची आहे.
ही बातमी २७ मार्च ची असून यानुसार नामांतराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे दिसते. कृपया यावर आपले मत काय आहे हे येथे स्पष्ट करावे आणि त्यानंतर बदल करावेत. -संतोष गोरे ( 💬 ) २१:०७, ३० मार्च २०२३ (IST)
- सौम्य स्मरण.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:३८, २२ एप्रिल २०२३ (IST)
सूचना
[संपादन]नमस्कार, आपल्याला चर्चा पानावर संदेश दिला तरी आपण संवाद साधत नाहीयेत. विविध पानांवर संपादने करत आहात. कृपया जुन्या लेखात काही मोठा बदल किंवा लेख नाव बदलायचे असेल तर त्या लेख पानावर किंवा एखाद्या विकिपीडिया जाणकारास संपर्क करावा. विशेष म्हणजे आपण लेख स्थानांतरित न करता मजकूर स्थानांतरित करत आहात. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपण नवीन आहात, किमान इतके तर दिसले असेल की एका लेखातील मजकूर दुसऱ्या पुनर्निर्देशित पानावर स्थानांतरित केला असता मराठी लेखवारून इतर भाषिक लेख पानावर जाणारा अंतरविकी दुवा बिघडत आहे. मराठीवरून इतर भाषिक पानावर जाता येत नाहीये. सबब मोठ्या लेखात किंवा कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी चर्चा करावी, तांत्रिक बाबी समजून घ्याव्यात किंवा जाणकारास मदत मागावी.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:५७, २९ एप्रिल २०२३ (IST)
- नमस्कार संतोष, पोहोचल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, बरीच मराठी विकिपीडिया पृष्ठे आहेत जिथे नावांची स्पेलिंग चूक किंवा लेखात चुकीचा मजकूर दिलेला आहे, पानांच्या स्थलांतरामुळे होरणारी अडचण थांबवणीसाठी कृपया पृष्ठाचे योग्य स्थलांतर कसे करावे हे स्पष्ट कराल का?
- जसे, मराठी पेज रकात हा एक नमाज मधील कार्यपद्धत आहे, त्या पानावरील मजकूर मध्ये वेगळी माहिती आहे, तर रकात हा पुनर्निर्देशित नमाज वर का करावा? Mh21production (चर्चा) ११:०५, २९ एप्रिल २०२३ (IST)
- कृपया विविध पानांवरील मजकूर स्थानांतरित करणे त्वरित थांबवावे. रकात पणासंबधित चर्चा ही संबंधित चर्चापानावर आहे.-संतोष गोरे ( 💬 ) १०:२३, १ मे २०२३ (IST)
छत्रपती संभाजीनगर तथा धाराशिव
[संपादन]नमस्कार, कृपया एक लक्षात घ्यावे की चर्चा पूर्ण न करता कोणतेही बदल करू नये, अशी विनंती आपणास आपल्या चर्चा पानावर, चर्चा:धाराशिव तसेच चर्चा:छत्रपती संभाजीनगर येथे देखील करण्यात आली होती. आपण ती पाळली नाही, सबब आपणास एक महिन्यासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. हा प्रतिबंध तत्पूर्वी देखील उठवता येऊ शकतो, तोपर्यंत आपण येथील चर्चेत भाग घेऊ शकता.
सर्वप्रथम लक्षात घ्यावे की या दोन्ही शहरांचे नाव बदलण्याचा निर्णय प्रथम महाविकास आघाडीने आणि त्यानंतर शिवसेना भाजप युतीने पूर्ण बहुमताने घेतला होता. कोणत्याही गावाचे, विभागाचे, जिल्ह्याचे किंवा अजून इतर कोणतेही नामांतर करणे हे चालूच असते. प्राथमिक स्तरावरील अधिकार हा राज्य सरकारला असतो, हे सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले त्याचा हा दुवा पहावा. या दोन शहराचे नामांतर झाले आहे. तालुका, जिल्हा, महसूल व इतर प्रशासकीय विभाग यांचे बाकी असून तेथेच स्टे आहे. हे समजण्यासाठी दोन दुवे पाहूया या दुव्यात माझ्या वरील विधानाची पुष्टी मिळते. ही एक किचकट प्रक्रिया आहे. हे कायद्याचे काम आहे, आपण सर्वसामान्य व्यक्ती यात फार खोलात जाऊ शकत नाहीत. शहराचे नाव बदलले असून इतर नावावर स्टे असल्याचे या दुव्यात तसेच या निकालात दिसून येते. आपल्याला हे नामांतर अर्धवट वाटते. परंतु यासाठी एक उदाहरण देतो, नांदेड शहर ते जिल्हा, सर्वत्र नांदेड हेच नाव अधिकृत असून केवळ रेल्वे स्टेशन, रेल्वे डिव्हिजन, रेल्वे कार्यालये येथे मात्र 'हुजुर साहिब नांदेड' असे नामांतर केल्या गेले आहे. तसेच नांदेड मनपाचे नाव 'नांदेड वाघाळा महानगरपालिका' असे करण्यात आले आहे. सबब विविध स्तरावर विविध नावे बदलत असतात. याचा अर्थ गाव, जिल्हा, तालुका यांचे पण नाव सोबत बदललेच पाहिजे असे होत नाही. अजून मुद्दे भरपूर आहेत पण लिखाण मोठे होईल म्हणून येथे थांबत आहे.
- cc @अभय नातू, @संदेश हिवाळे, @Khirid Harshad :--संतोष गोरे ( 💬 ) ०८:३८, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
- @संतोष गोरे: सर नमस्कार, आपण मुद्देसूद महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद जिल्हा यांमध्ये काही सदस्यांनी गल्लत केल्यामुळे अधून मधून संपादन युद्ध होताना आढळते. या सदस्यांनी लक्षात घ्यायला हवे की, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग ह्या लेखांच्या शीर्षकांमध्ये औरंगाबाद वगळून छत्रपती संभाजीनगर जोडण्यात आलेले नाही. केवळ औरंगाबाद शहर याचेच शीर्षक छत्रपती संभाजीनगर केले गेले आहे, जे अधिकृत नाव आहे. --संदेश हिवाळेचर्चा १२:०३, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
- होय, विकिपीडिया हे मुक्त ज्ञानकोश असल्या कारणाने अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. तसा यात जाणकार सदस्यांचा बराच वेळ देखील वाया जातो.- संतोष गोरे ( 💬 ) २२:०१, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
- @संतोष गोरे: सर नमस्कार, आपण मुद्देसूद महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे, त्याबद्दल धन्यवाद. औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद जिल्हा यांमध्ये काही सदस्यांनी गल्लत केल्यामुळे अधून मधून संपादन युद्ध होताना आढळते. या सदस्यांनी लक्षात घ्यायला हवे की, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग ह्या लेखांच्या शीर्षकांमध्ये औरंगाबाद वगळून छत्रपती संभाजीनगर जोडण्यात आलेले नाही. केवळ औरंगाबाद शहर याचेच शीर्षक छत्रपती संभाजीनगर केले गेले आहे, जे अधिकृत नाव आहे. --संदेश हिवाळेचर्चा १२:०३, २६ ऑगस्ट २०२३ (IST)
- ठीक आहे, तुम्ही वर नांदेड स्टेशन आणि नांदेड शहराची उदाहरणे दिली आहेत, त्यात औरंगाबादऐवजी संभाजीनगर वापरण्याचा संदर्भ आणि परवानगी कोठे आहे? दुसरे म्हणजे, जर तुम्ही नमूद केल्याप्रमाणे शहराचे नाव वापरण्याचा आदेश शासनाने दिला असेल तर त्याच लेखात तुम्ही सर्व लोक औरंगाबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद विभागाची नावे का बदलत आहात? याचा अर्थ काय आहे? तुम्ही कोणते उदाहरण मांडत आहात?
- @Khirid Harshad, @अभय नातु Eaglespirit (चर्चा) १६:३२, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
- तुम्ही लोक म्हणजे नक्की कोण? मी, Khirid Harshad, अभय नातू ? कोणी बदल केलाय? आणि कोणत्या लेखाचे नाव बदललेत ? औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग ? अगोदर एकदा या लेखावर जाऊन तर पहा हे लेख काय नावाने आहेत ते. महाशय पहिले तपासा आणि मग बोला. - संतोष गोरे ( 💬 ) २०:५२, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
- @संतोष गोरे तुम्ही लोकं म्हणजे जे कोणी मी केलेल्या बदल वर रोल बॅक करत आहे ते... संबंधीत लेखा मध्ये बरेच ठिकाणी औरंगाबाद जिल्हा असे उल्लेख करण्या ऐवजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा असे उल्लेख करत आहात, तसेच संदर्भ संबदंधित मी आपणास प्रश्न केला त्याबद्दल देखिल बोला. Eaglespirit (चर्चा) ००:३५, २८ ऑगस्ट २०२३ (IST)
- माझ्या मते शहराचे नावासंबंधित न्यायालयात याचिका दाखल आहे व संपूर्ण निकाल येणे अजून बाकी आहे तेव्हा पर्यंत आपण औरंगाबाद ह्या नावा चा वापर का नाही करू शकता? Eaglespirit (चर्चा) ००:३८, २८ ऑगस्ट २०२३ (IST)
- कृपया लक्षात घ्यावे की मराठी विकिपीडिया वर आजमितीस +९३,००० लेख असून नोंदणीकृत सदस्य +१,५५,००० असून अनोंदणीकृत त्यापेक्षा अनेक पटित आहेत. सर्व लेख आणि सर्व सदस्य हे १००% अचूक आहेत असे म्हणता येत नाही. त्यासाठी विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार हा लेख वाचणे. आपण जास्तीत जास्त लेख सुस्थितीत असावेत हा प्रयत्न करत असतोत. आता जर का औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग हे लेख नाव बदललेच नाहीत तर तुम्ही त्यावर का आक्षेप घेत आहात? दुसरा मुद्दा म्हणजे शहरांचे नामांतर - त्यासाठी मी वर दुवे दिले आहेत, जे असे सांगतात की शहराचे नाव बदलले असून जिल्हा, महसूल व इतर विभागांची नावे बदलणे बाकी आहेत. आता हे पण तुमच्या लक्षात आलेच आहे की शहराचे नाव बदलले असून औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग ही नावे बदलली नाहीत, तर मग तुम्ही शहराचे नाव पूर्ववत करा असे का म्हणता? आणि हो विकिपीडिया पेक्षा वर्तमान पत्रावर जास्त लक्ष द्यावे, ज्यांचे वाचक भरपूर आहेत, त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नाव बदलले असून ते आजही तीच नावे वापरत आहेत. केवळ एक उदाहरण म्हणून येथे पहावे. मला वाटते आपण विकिपीडिया ऐवजी अशा अनेक सामाजिक/गैर सामाजिक संस्था, प्रकाशन संस्था व इतर संस्था आहेत त्यावर लक्ष द्यावे. इथे केवळ उपयुक्त लेखन करावे.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:४७, २८ ऑगस्ट २०२३ (IST)
- माझ्या मते शहराचे नावासंबंधित न्यायालयात याचिका दाखल आहे व संपूर्ण निकाल येणे अजून बाकी आहे तेव्हा पर्यंत आपण औरंगाबाद ह्या नावा चा वापर का नाही करू शकता? Eaglespirit (चर्चा) ००:३८, २८ ऑगस्ट २०२३ (IST)
- @संतोष गोरे तुम्ही लोकं म्हणजे जे कोणी मी केलेल्या बदल वर रोल बॅक करत आहे ते... संबंधीत लेखा मध्ये बरेच ठिकाणी औरंगाबाद जिल्हा असे उल्लेख करण्या ऐवजी छत्रपती संभाजी नगर जिल्हा असे उल्लेख करत आहात, तसेच संदर्भ संबदंधित मी आपणास प्रश्न केला त्याबद्दल देखिल बोला. Eaglespirit (चर्चा) ००:३५, २८ ऑगस्ट २०२३ (IST)
- तुम्ही लोक म्हणजे नक्की कोण? मी, Khirid Harshad, अभय नातू ? कोणी बदल केलाय? आणि कोणत्या लेखाचे नाव बदललेत ? औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका व औरंगाबाद विभाग ? अगोदर एकदा या लेखावर जाऊन तर पहा हे लेख काय नावाने आहेत ते. महाशय पहिले तपासा आणि मग बोला. - संतोष गोरे ( 💬 ) २०:५२, २७ ऑगस्ट २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
फलस्तिन
[संपादन]नमस्कार, आपण पॅलेस्टाईन शब्दांशी संबंधित लेख फलस्तिन मध्ये स्थानांतरित केलेले दिसत आहे. कृपया कारण सांगाल का?- संतोष गोरे ( 💬 ) ०९:३५, ४ नोव्हेंबर २०२३ (IST)
- नमस्कार @संतोष गोरे, होय मी पॅलेस्टाईन शब्दांशी संबंधित लेख फलस्तिन मध्ये स्थानांतरित केले, कारण फलस्तिन हे मूळ नाव (अरबी भाषेत: فلسطين) चे मराठीत उच्चार व भाषांतर आहे. पॅलेस्टाईन शब्द इंग्रजी भाषिक लोक वापरतात कारण त्यांना फलस्तिन असे उच्चार करता येत नाही. Eaglespirit (चर्चा) १४:१५, ५ नोव्हेंबर २०२३ (IST)
- आपण काही अंशी बरोबर आहात. परंतु शीर्षक लेखन करताना त्या त्या भाषेतील प्रचलित नावाला प्राधान्य दिले जाते. जसे की Canada हे नाव मराठीत - कॅनडा, हिंदीत - कनाडा, पालित - केनडा तर नेपाळीत - क्यानडा असे लिहिले जाते. का? कारण त्या त्या भाषेत ते नाव प्रचलित आहे. असेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गाडगे बाबा ही नावे सर्व मान्य अशी प्रचलित नावे आहेत. सबब मराठीत प्रचलित पॅलेस्टाईन हाच शब्द अचूक आणि योग्य आहे. आपण मराठी संकेतस्थळे तसेच वर्तमान पत्रात पाहू शकता, जिथे पॅलेस्टाईन हेच नाव दिसून येईल. अपेक्षा आहे की आपल्या शंकेचे समाधान झाले आहे.- संतोष गोरे ( 💬 ) २३:२४, ५ नोव्हेंबर २०२३ (IST)
- होये समजले, आपण जो तर्क दिला आहे तो बरोबर आहे. Eaglespirit (चर्चा) १६:२२, ९ नोव्हेंबर २०२३ (IST)
- आपण काही अंशी बरोबर आहात. परंतु शीर्षक लेखन करताना त्या त्या भाषेतील प्रचलित नावाला प्राधान्य दिले जाते. जसे की Canada हे नाव मराठीत - कॅनडा, हिंदीत - कनाडा, पालित - केनडा तर नेपाळीत - क्यानडा असे लिहिले जाते. का? कारण त्या त्या भाषेत ते नाव प्रचलित आहे. असेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गाडगे बाबा ही नावे सर्व मान्य अशी प्रचलित नावे आहेत. सबब मराठीत प्रचलित पॅलेस्टाईन हाच शब्द अचूक आणि योग्य आहे. आपण मराठी संकेतस्थळे तसेच वर्तमान पत्रात पाहू शकता, जिथे पॅलेस्टाईन हेच नाव दिसून येईल. अपेक्षा आहे की आपल्या शंकेचे समाधान झाले आहे.- संतोष गोरे ( 💬 ) २३:२४, ५ नोव्हेंबर २०२३ (IST)