सदस्य चर्चा:विक्रम रमेश साळुंखे.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत विक्रम रमेश साळुंखे., मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन विक्रम रमेश साळुंखे., नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८७,१७२ लेख आहे व २०७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

 • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

Svikram69 ०६:४३, ६ ऑगस्ट २०१० (UTC)

तुम्ही मराठी विकिपीडियावर प्रबंधक कधीपासून झालात?[संपादन]

नमस्कार! तुम्ही मराठी विकिपीडियावर प्रबंधक कधीपासून झालात? मराठी विकिपीडियावर सदस्यांचा कौल आजमावून प्रबंधक निवडले जातात. आपण कधी कौलास सामोरे गेलात? आणि आपली निवड कौलात कशी केली गेली?

पुराव्याविना मराठी विकिपीडियावर प्रबंधक असल्याची बतावणी करू नये.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४२, ८ ऑगस्ट २०१० (UTC)

स्तुत्य उद्देश्य, माहित नसलेले मार्ग[संपादन]

मला वाटते कि आपले मुळ उद्देश्य चांगले आहेत. उद्देश चांगला हवाच पण तेवढेच पुरेसे आहे असेही नाही,मराठी विकिपीडिया एक विश्वकोश ज्ञानकोश आहे. या विश्वकोशाचा स्वतःचा असा एक परिघ आहे.मर्यादा आहेत संकेत आहेत. आपण इथे संपादन चालू करताना सर्वच वाटा आणि संकेत आपल्याला परिचयाचे असतील असे नव्हे. आम्ही सुद्धा कधीतरी येथील पाऊलवाट चुकतमाकतच शिकत पुढे आलो आहोत.अपणास सहाय्य देण्यास सदैव तत्पर आहोत.अपाणही येथे केव्हा रूळला हे आपले आपल्याला समजणार नाही असा विश्वास आहे.
आपण एखादे आदर्श सदस्य पान निवडून कॉपी पेस्ट केलेले दिसत आहे. आणि येत्या काळात आपण त्यास निश्चित सुधारणा करणार असा विश्वास आहे.विकिपीडीया प्रबंधक पानावर नमुद केल्या प्रमाणे वस्तुतः विकिपीडियात प्रबंधक अशी संकल्पनाच नाही त्यामुळे मी शक्यतो प्रबंधक हा शब्द टाळतो प्रचालक हा शब्द वापरतो.विकिपीडिया म्हणजे अशा नावेची कल्पना करा कि ज्यातील प्रवासी स्वतःच वल्हवत आहेत आणि सारी कार्ये करत आहेत.त्यामुळे आपणही या नावेच्या प्रचालनात(प्रबंधनात) सहभागी झाला तर स्वागत आहे. पण प्रत्यक्षात प्रचालक होण्याचा मार्ग कदाचित लांबचा असु शकतो.
आपण स्वतःस प्रबंधक म्हणवण्यात वस्तुतः प्रथमदर्श्नी नुकसान असे नाही, परंतु आपल्या सारखेच इतर नवागत आपणास प्रबंधक समजुन काही सहाय्य मागण्यास पोहोचतील आपण ते देण्यात अक्षम ठरल्यास येथे प्रचालकांना काही माहित नाही अथवा अपेक्षीत सहाय्य मिळत नाही असे वाटण्याचा धोका आहे. मला वाटते आपण हि बाब लक्षात घेऊन सुयोग्य बदल करू शकता.
जसे इश्वराला मंदिर बांधणारा भक्त इतर भक्तापेक्षा मोठा नसतो तो इतर भक्तातीलच एक भक्त असतो, तसे या ज्ञानाच्या मदिरात आम्ही प्रचालक मडळी कोणी मोठी आहोत असे मुळीच नाही.आपणास पुढील विकिपीडिया संपादन प्रवासास शुभेच्छा!
धन्यवाद माहितगार ०५:३१, ९ ऑगस्ट २०१० (UTC)

माहिती विश्वकोशीय स्वरूपात लिहावी[संपादन]

नमस्कार!

आपण काही लेखांमध्ये ह्या पद्धतीची लेखनशैली वापरली आहे, त्या अनुषंगाने :

 1. जंगली महाराज या लेखात खालील स्वरूपाची वाक्यरचना आहे :

>> पूर्ण शहानिशा करुन जे चरित्र लिहिलं ते पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनान प्रकाशित कले असून इ. स. २००४ साली त्याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. या चरित्राच्या आधारेच जंगली महाराजांविषयीचा हा लेख लिहिला आहे. <<

विश्वकोशातील लेखात तुम्ही वाचकांशी लेखक म्हणून संवाद साधण्यासारखी भाषा वापरू नये, असा संकेत असतो. त्यामुळे '(मी) अमुक तमुक आधारे जंगली महाराजांचा लेख लिहिला आहे' वगैरे वाक्यरचना टाळावी. संदर्भाच्या पुस्तकांची माहिती लिहायची असल्यास, त्या लेखाच्या शेवटी 'संदर्भ' असा उपविभाग काढून त्यात ती पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, प्रकाशन आवृत्ती वगैरे तपशील नोंदवावेत.

 1. महाराष्ट्र दिन या लेखात खालील स्वरूपाची वाक्यरचना आहे :

>> अरे, गीतोपदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभिषेक करणार्‍या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृतालाही पैजेवर जिंकू, अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल? <<
> इतक्या थोरांनी गौरविलेली भाषा मृत होणार असे आपण कसे म्हणे शकू ? मराठी भिकारीण झाली, तरीही कुशीचा तिच्या तीस केवि त्यजी या शब्दांत मराठीचे पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत, अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवाणी माधव ज्यूलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तविली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल, अशी अपेक्षा <<

ही वाक्यरचना प्रचारकी ढंगाची असल्यामुळे विश्वकोशात अपेक्षित नाही. विश्वकोशात तुम्ही वस्तुनिष्ठ (इंग्लिश : factual ) माहिती भरणे अपेक्षित आहे. कुठल्यातरी मताचा आग्रही पुरस्कार करणारी, वाचकांना भावनिक आवाहन करणारे प्रश्न विचारून काळजाला हात घालू पाहणारी भाषा अपेक्षित नाही.


लेखनशैलीचा अंदाज येण्यासाठी इंग्लिश विकिपीडियावरील लेख वाचावेत. त्यावरून दर्जेदार लेखन कसे करावे, याचा आपल्याला अदमास येईल. शक्य झाल्यास मराठी विश्वकोशाचे खंडही एकवार चाळून लेखनशैलीचा अभ्यास करावा. त्याबरहुकूम येथे लेखन करावी, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३६, १० ऑगस्ट २०१० (UTC)

Image of Annabhau Sathe[संपादन]

Dear Vikaram, Can you please upload the image of Annabhau Sathe to Wikimedia Commons so that it can be used in the article about him on English Wikipedia? If you have free images, please consider them uploading on Commons rather than uploading them on specific language wikipedia. Images from Commons can be used for in all Wikimedia projects without a need to upload them individually on each project. Thanks. (Sorry for not writing in Marathi, I am having some technical problems with Marathi unicode). गणेश धामोडकर ०४:५२, १० ऑगस्ट २०१० (UTC)

 1. Go to http://commons.wikimedia.org
 2. Look for Upload file in left-hand side bar. Click on it.
 3. You will come to a form. Select "Own work" there if it is your own work, or select as appropriate.
 4. Upload image as you upload it on Marathi Wikipedia.
 5. Give a proper name to the image. (This name should be descriptive of the subject of the image, e.g. Fort Shivneri).
 6. Provide some description of what is the image about.
 7. Select liscence (You can use public domain or Creative Commons Share alike from the list).
 8. Add categories just as you add them on Wikipedia.
 9. Preview. Save. Make any changes if needed.

गणेश धामोडकर ०९:२९, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

अभिनंदन[संपादन]

नमस्कार विक्रम रमेश साळुंखे.,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने


विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

विनंती[संपादन]

माझे किंवा ईतर कोणाचे सदस्य चर्चापानावरील आपण टाकलेल्या मजकूराव्यतिरीक्त ईतर मजकूर कृपया उडवू नये अशी मी आपणास अत्यंत नम्रतापूर्वक व आदरपूर्वक विनंती करतो. वि. नरसीकर (चर्चा) ०३:४७, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

चित्र चढविणे[संपादन]

नमस्कार, तुम्ही विकि कॉमन्सवर चित्र चढविण्यासाठी माहिती मागितल्याचे पाहिले म्हणून कळवित आहे. कोणतेही चित्र चढविण्या आधी एकदा कॉमन्सचा थोडा अभ्यास करावा. तेथेही विविध वर्ग (Category) आहेत आणि आपण चढविलेले चित्र इतरांनाही सुलभपणे शोधता आले पाहिजे यासाठी वर्गीकरण माहित असले तर चित्र योग्य ठिकाणी जाते.

 • येथे क्लिक करा
 • पान उघडल्यावर अगदी डावीकडे वर Upload file वर क्लिक करा.
 • संबंधीत चित्र तुमचे स्वतःचे कार्य असेल तर It is entirely my own work क्लिक करा किंवा तुमच्या संचिकेप्रमाणे योग्य ठिकाणी क्लिक करा.
 • It is entirely my own work मधून पुढे गेल्यावर थोडे खाली Choose File क्लिक करा. त्याने तुमच्या संगणकावरील फाईल जेथे असेल तेथे जाता येईल.
 • त्यानंतर फाईलचे नाव, चित्राची तारीख, वर्णन पार करत चित्राचे प्रताधिकार कडे जाऊन त्याच्या License बद्दल योग्य पर्याय निवडा आणि चित्राचे वर्गीकरण करा.
 • वरीलप्रमाणे चित्र चढवून झाल्यावर एकदा त्याची झलक Preview पहा. तुम्ही वर प्रमाणे केलेली प्रत्येक माहिती योग्य असल्याची खात्री पटली तर Upload File द्वारे चित्र जतन करा.

याप्रमाणे चित्र चढविण्याची प्रक्रिया आहे. एकदा चित्र चढविल्यानंतरही त्यात काही राहिले, सुटले, चुकले असे वाटत असेल तर नंतर पुन्हा ते एडिट करता येते, काळजी नसावी. मीही चुकत चुकत आणि अनेकांची मदत घेऊन शिकलो आहे. तुम्हाला काही अडचण असल्यास केव्हाही चर्चा पानावर किंवा चावडीवर लिहा. विकिवरील सगळेच मित्र मदत करतील याची मला खात्री आहे. तुमच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा. Gypsypkd ०४:४७, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

विश्वकोशिय लेखन शैलीच्या दिशेने[संपादन]नमस्कार, मी विकिपीडियावर बरीच वर्षेपासून सहाय्य देत असल्यामुळे, नवागतांकडून होणार्‍या चूकांचे खोलात जाऊन अभ्यास करून मग सुचना कळवण्याकडे माझा कल असतो. आपल्या संपादनातील काही लेखन प्रताधिकार मुक्त स्रोतातून घेत आहात हे उमगले. तसे ते घेण्यात वावगे नाही पण विश्वकोशाच्या दृष्टीने ३ गोष्टी लक्षात घ्याव्यात, आपण संदर्भ कसा द्यावा ते शिकला असाल तर बरेच नाही तर ते समजावून घ्यावे आणि संदर्भ अगत्याने द्यावेत. दुसरे तर कोशिय लेखनाच्या बाहेर होणार्‍या बहुतेक लेखनात ललीत रंजनानुवर्ती कथनात्मक वर्णनात्मकता आढळते, बर्‍याचदा वार्तांकनता आढळते आणि शेवटचे नाही पण अजुन एक महत्वाचे माहितीच्या माडंणीचा sequence[मराठी शब्द सुचवा] विश्वकोशिय लेखनाच्या माडणीच्या दृष्टीने ओबड धोबड ठरतो.या तिन्हीही गोष्टी कोशिय लेखनास मानवत नाहीत, असे का याचे उत्तर मी सवडी नुसार लिहिनच.

तुर्तास येथे टिचकी मारून या पानावरील सहाय्य आवर्जून वाचावे हि नम्र विनंती माहितगार १४:३५, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

काम फत्ते...........[संपादन]

आपण महिती भरताना कृपया संबंधित दुवे द्यावेत .अधिक समजण्यासाठी आपणवसंतगड हा लेख पहावा.

विनोद रकटे १७:३३, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिकरण[संपादन]

नमस्कार ! आपण किल्ल्यावरील लेख लिहित आहात त्याबद्दल आपले अभिनंदन व पुढील लेखनास शुभेच्छा.यात एक थोडा सुधार सुचवितो. आपण लिहिलेला किल्ले कुंजरगड हा लेख कृपया बघावा.त्यात मी काही दुवे दिलेले आहेत.त्याप्रमाणे सर्व किल्ले लेखांत आवश्यक ते बदल करावेत ही नम्र विनंती.तसेच, विकिवर विशेषणांचा वापर करीत नाही. जसे अजिंक्य पारगड.तद्वतच लेख मजकूरातही विशेषणे नकोत.याची कृपया दखल घ्यावी ही पण विनंती. धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०४:०५, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

चुका नव्हेत त्रुटी[संपादन]

आपण केलेल्या त्या चुका नव्हेत.त्या त्रुटी आहेत.आम्हीही कधीतरी विकिवर नविनच होतो.आमच्याही प्रथमतः अनेक त्रुटी होत्या. बघुन बघुन व पाहुन पाहुन शिकलो.त्यात वैष्यम्य वाटण्याचे कारण नाही.येथील 'माहितगार' यांनी सदैव योग्य ते मार्गदर्शन केले.त्यांचे बोट धरुनच पुढे वाटचाल केली.येथे एकच ध्यानात ठेवा.मोकळे रहा.काही प्रश्न पडला तर कोणालाही तो मोकळेपणाने विचारा.त्यात कमीपणा कसला?आपल्याला वर्गात शिकतांना एखादी difficulty आली तर आपण शिक्षकांना/प्रोफेसरांना विचारतोच ना? त्यांना माहित आहे म्हणुन. चला तर. पुन्हा एकदा लेखनाकरीता शुभेच्छा.आपली विकिवरील वाटचाल सदैव सुकर राहो या सदिच्छेसह.

वि. नरसीकर (चर्चा) १३:२६, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

चुका नव्हेत त्रुटी नरसिकरांशी पूर्णपणे सहमत, मी वर एका ठिकाणी चूका हा श्ब्द वाप्रला आहे त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. आपल्या पुढील लेखना करिता मःपूर्वक शुभेच्छा !माहितगार १४:०६, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

चर्चा:महाराष्ट्र[संपादन]

आपण महाराष्ट्र लेखात भर घातली आहे, मी केवळ आपण केलेल्या बदलांचाच अभ्यासकरून चर्चा:महाराष्ट्र#समसमिक्षा २ येथे सुधारणा सुचवल्या आहेत.कोशिय लेखनात केवळ स्वतःचीच नव्हे तर स्वतःची सहानुभूती असलेले विषय शोधून त्यातील आत्म-स्तुती/अभिनिवेश इत्यादी टाळावेत . (आत्म म्हणजे सहानुभूतीचे विषय या अर्थाने) हे प्रत्येकाच्या लेखनात होतेच त्याक्करिताच विकिपीडीयात समसमीक्षणाची प्रथा आहेत. महाराष्ट्र लेखाचा दर्जा प्राधान्याने जपण्याची गरज असल्यामुळे या लेखातील सुधारणांचा विचार प्राधान्याने करावा हि नम्र विनंती माहितगार ०७:०९, १३ ऑगस्ट २०१० (UTC)

विटा/विटे[संपादन]

नमस्कार!

आपण नुकतेच विटे या गावाचे स्थानांतरण विटा याकडे केले.माझे धुळे जिल्ह्यातील भ्रमंतीदरम्यान मलाही हाच प्रश्न पडला होता. तेथे अनेक गावांची दोन नावे आहेत.ससाणा-ससाणे ,खैरणा-खैरणे अश्या प्रकारे. मला वाटते अश्या प्रकारची नावे लिखित भाषा तसेच बोली भाषेतील फरकामुळे उद्-भवली असावित. परंतु, त्यास सबळ असा पुरावा माझे वाचनात वा बघण्यात नाही.हा फक्त माझा अंदाज आहे.

यावरुन मला असे वाटते कि शासन दप्तरी ज्या नावाची अधिकृत नोंद आहे तेच नाव विकिवर घ्यावे म्हणजे काहीच प्रश्न उपस्थित होणार नाहीत. आपण विटेचे विटा केले त्याबद्दल असा काही पुरावा मिळु शकत असल्यास बघावे म्हणजे यापुढील अश्या प्रकारच्या दुहेरी नावांच्या गावांचे बाबतीत एक policy तयार करता येउ शकेल.त्यास एक पायवा/आधार तयार होईल.माझे या लिखाणाचा जरुर विचार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मी आपणास विनंती करतो.

वि. नरसीकर (चर्चा) ११:१५, २० ऑगस्ट २०१० (UTC)

धन्यवाद ! वि. नरसीकर (चर्चा) १७:३९, २० ऑगस्ट २०१० (UTC)

लोहगड व ईतर किल्ले[संपादन]

नमस्कार!

 • कृपया लोहगड या लेखात मी केलेले बदल बघावेत. त्यात मी दुवे टाकलेले आहेत. असे दुवे टाकण्याने लेखाची शोभा वाढते व त्या निळ्या दुव्यांवर टिचकी मारल्यास वाचक त्या त्या पानावर पोचुन अधिक माहिती मिळवु शकतो.आपणास विनंती आहे की आपण लिहिलेल्या सर्व लेखात अश्या प्रकारचे दुवे टाकावे.लेखात जे लाल दुवे आहेत त्यावर टिचकी मारल्यास तो लेख लिहिण्यासाठी नविन पान उघडते.त्यात आपण माहिती टाकु शकता. अर्थात, हे सर्व आपणास माहित असेलच.जसा वेळ मिळेल तसे हे काम जरुर करावे.मी फक्त आठवण करुन देत आहो.
 • आपण किल्ल्यासंबंधी काही संचिका नुकत्याच चढविल्या आहेत.त्यात प्रताधिकाराविषयी माहिती भरलेली नाही. त्यासाठी कृपया विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा हे पान बघावे व वाचावे. या पानात विविध सदस्यांशी, संचिका चढविण्याबद्दल झालेल्या चर्चांचे एकत्रिकरण केले आहे.त्यानुसार आपण चढविलेल्या संचिकेत आवश्यक ती माहिती भरावी ही पण विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:१६, २१ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

तुम्ही संपादन करीत असलेले काही लेख पाहिले, त्यात काही बदल सुचवीत आहे.

 • विकिपीडियावर कोणताही नवा लेख लिहिण्यापूर्वी त्या नावाचा लेख आधीच आहे की नाही हे पहावे. उदा. तुम्ही आज नवा लेख लोणावळा-खंडाळा लिहिला पण विकिवर लोणावळा, खंडाळा या नावाचे दोन पूर्ण वेगळे लेख आहेत, निदान पान तयार आहे. तुमच्या लेखातील माहिती योग्यपणे त्या त्या लेखात भरावी.
 • लेख लिहित असतांनाच तो कोणत्या वर्गातील आहे ते पाहून त्याचे वर्गीकरण तेव्हाच करावे तसेच इतर विकिवर तो लेख आहे का हे पहावे आणि त्याचे दुवे जोडावे, किमान इंग्रजी विकिवर तरी त्या नावाचा लेख आहे की नाही हे पहावे, लेखात आवश्यक साचे लावावे.
 • लेखातील भाषा विकिला अपेक्षीत अशीच असावी, आपण वाचकांशी गप्पा मारतो आहोत अशी भाषा नसावी. उदा. निशाणी डावा अंगठा (चित्रपट) हा लेख पहावा. त्यातील मंडळी, खूप दिवसात . . . असा चित्रपट पाहिला नाही वगैरे लेखात नसावे. विकिपीडियावर ब्लॉग सारखे लिखाण नसावे. आपण वाचकांशी गप्पा मारत नसतो तर जे वास्तव आहे ते लिहितो. त्यातही बातम्यांसारखे लिखाण नसावे. विकिची एक वेगळी भाशा शैली आहे. काही दर्जेदार लेख पाहून त्यातून तुम्हाला लक्षात येईल.

तुमचे लिखाण चांगलेच आहे, असेच काम सुरू ठेवा. तुमच्या पुढील योगदानासाठी शुभेच्छा. तुम्हाला काही मदत हवी असेल तर अवश्य कोणाचीही मदत घ्या. विकिवरील सगळेच मित्र मदतीस तत्पर असतात हे माझ्या अनुभवांवरून सांगतो. Gypsypkd ११:४४, २१ ऑगस्ट २०१० (UTC)

जिप्सीपीकेडी यांच्या सूचनांना अनुमोदन[संपादन]

नमस्कार विक्रम! आपण उत्साहाने गेल्या काही दिवसांमध्ये संपादने करत आहात; त्याबद्दल आपले सादर कौतुक आहे. मात्र आपल्या संपादनांमध्ये अधिक सकसपणा, नेमकेपणा आणि विश्वकोशीयता दिसावी, म्हणून जिप्सीपीकेडी यांनी मांडलेल्या सूचना जरूर आचराव्यात. विकिपीडियावरील विश्वकोशीय लेखनशैली आत्मसात करण्यासाठी त्यांनी वर नोंदवलेल्या पद्धतींचा वापर येथील बहुसंखय सदस्यांनी केला आहे व त्याचा त्यांना व मराठी विकिपीडियाला उपयोग झाला आहे.

सुरुवातीस या सर्व गोष्टींमध्ये रुळण्यासाठी आपण या काही गोष्टी करू शकता :

 • इंग्लिश विकिपीडिया, जो आजघडीला सर्व भाषक विकिपीडियांमध्ये समृद्ध आणि व्यापक विकिपीडिया आहे, त्यावरील 'टूडेज फीचर्ड आर्टिकल' म्हणून निवडलेले दर्जेदार सदर (दर दिवशी एक या दराने) अभ्यासावे. त्यातील भाषाशइली, मुद्दे मांडण्यातील तटस्थपणा, सम्यक दृष्टिकोन आणि वस्तुनिष्ठता या गोष्टी तपासणे विश्वकोशीय लेखनशैली आत्मसात करण्यासाठी उपयोगी पडू शकेल.
 • नवीन लेख बनवण्याआधी मराठी विकिपीडियावर डावीकडे शोधपेटीत ते शब्द टाकून संबंधित लेख आहेत किंवा कसे, हे चाचपून बघावे.
 • विकिपीडियावरील भाषक दर्जा सांभाळण्यासाठी प्रमाण मराठीनुसार शुद्धलेखन व व्याकरण अंगीकारावे. शुद्धलेखनाचे नियम येथे त्या संबंधाने अधिक माहिती मिळेल.

आपला उतासह बघून आपल्याकडून माझ्या अपेक्षा वाढल्या असल्याने, विश्वासाने या सूचना आपल्या निदर्शनास आणून देत आहे. यामागे वैयक्तिक बढाईखोरपणा करण्याचा अजिबात आव नाही.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०८, २१ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रचारकी भाषा नको[संपादन]

नमस्कार विक्रम! आपण भाऊराव पाटील यांच्यावरील लेखात खालील वाक्य लिहिलेले आढळले :

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

या स्तुतिसुमनांना पात्र काम भाऊरावांनी केले असले, तरी विश्वकोशात अशी भाषा अपेक्षित नाही. आपण भाऊरावांचे गुणगान गाणारा लेखक लिहीत नसून तटस्थपणे वास्तविक माहिती लिहीत आहोत, ही जबाबदारी कायम ध्यानात असू द्यावी. तूर्तास, मी ते वाक्य काढले आहे.

आपल्या उत्साही सहभागाबद्दल आपुलकी आहेच!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१७, २६ ऑगस्ट २०१० (UTC)

फड+नवीस=फडनवीस[संपादन]

 • फड+नवीस दोन फार्सी शब्दांचा समास आहे (संदर्भ पहावा) ; फडणवीस ते फडणीस हे मराठी अपभ्रंश आहेत. पहिला संकेत नाना (संबधीत व्यक्ती ) स्वतःच्या नावाचे स्वतः कसे लेखन करत असे ते उपलब्ध असल्यास त्याचा स्विकार करावा उपलब्ध नसल्यास नाना फडनवीस असेच लेखन करून बाकीच्या पद्दहतीच्या लेखनाचे लेख केवळ पुर्ननिर्देशन करून नाना फडनवीस कडे वळवावेत.(नानांनी अथवा पेशव्यांनी फडनवीस मधील न चा ण केल्याचे नेमके माहित असल्यासच मुख्य लेख नाना फडणवीस नावावर ठेवावा.

माहितगार १५:०३, २६ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रताधिकार उल्लंघने वगळा टाळा[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपले मराठी विकिपीडियावरील योगदानाचा प्रयत्नाचे हार्दीक स्वागत आहे.आपल्या लेखनाचे भाऊराव पाटील लेखातील योगदानाचे प्राथमीक आवलोकनावरून आपण घेतलेले अलिकडील लेखन मनसे.ऑर्ग या प्रताधिकारीत संस्थळावरून आले ते नजरेस येताच तातडीने वगळण्याची क्रिया केली परंतु इतर सदस्यांना सर्व संपादने तपासणे होतेच असे नाही. खासकरून एखादा सदस्य जुना झाल्यानंतर संपादनांवरील लक्ष कमी होते.

आपण पूर्वी महान्यूज या शासकीय संस्थळावरून मजकुर उतरवताना पाहिले ते संस्थळ स्पष्टपणे प्रताधिकारमुक्त आहे त्या मुळे त्या बद्दल प्रॉब्लेम नाही पण इतर संस्थळे प्रताधिकारीत असतात.मराठी विकिपीडियाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, आपण असा मजुक्रर इतर ज्या कोणत्या लेखात घेतला असेल तो प्राधान्याने वगळावा हि नम्र विनंती आहे.

शिवाय अशात (आपण विकिपीडियात) आल्या नंतरच्याच काळात प्रताधिकारविषयक सजगता सुचना अगदी मराठी विकिपीडिया संकेतस्थळाच्या सेंट्रल नोटीसमधूनही दिल्या आहेत. त्या शिवाय संपादन खिडकीच्या खाली स्पष्ट सुचना आपण लिहिलेली असते. या सुचनांचा प्रभाव व्यवस्थीत पडावा म्हणून नेमके काय करावयास हवे याची सुचना देण्यात आणि माझ्या प्रमाणे इतर सदस्यांनाही प्रताधिकार उल्लंघनापासुन परावृत्त करण्यासाठी सहाय्य करावे हि नम्र विनंती

आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.
आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादीत स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते.

साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते महाराष्ट्र साहीत्य परिषद टिळकरोड पुणे येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकार बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती इतरत्र स्थानांतरीत करू शकता.आपली स्वतःची खात्री होई पर्यंत {{साचा:स्थानांतरीत१}} हा साचा तेथे लावावा.प्रताधिकार विषयक आपली खात्रि झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून ती आपण पुन्हा वापस मिळवू शकता.

आपले प्रताधिकार विषया संदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडीयेथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.


आपले विनीत, माहितगार ०५:०९, २८ ऑगस्ट २०१० (UTC) साहाय्य चमू

नमस्कार[संपादन]

आता आपणच बघा ! दुवे देण्याने लेख किती सुंदर दिसत आहे ते.There is no substitute for hard work हे सुत्र ध्यानात ठेउन काम करा.हळुहळु यशोशिखर गाठालच.आपल्या सारख्या लोकांची विकिपीडियास गरज आहे. पुन्हा शुभेच्छा.पुढील वाटचालीस.

वि. नरसीकर (चर्चा) ०४:१०, ३ सप्टेंबर २०१० (UTC)

अनुरोध[संपादन]

नमस्ते जी मैं मराठी तो नहीं जानता पर आपसे वार्तालाप करना चाहता हूँ ।

मैं हिन्दी विकिपीडिया पर कार्य कर रहा हूँ । अतः आपसे अनुरोध यह है कि मैं एकबार आपसे मिलना चाहता हूँ । वैसे में राजस्थान के जोधपुर ज़िले से हूँ और यहां पर फर्नीचर का कार्य कर रहा हूँ । आप चाहे तो मुझसे कभी भी मिल सकते है । पता :- द कराड जनता सहकारी बैंक ।राजु सुथार (चर्चा) २२:५९, १९ डिसेंबर २०१५ (IST)Reply[reply]