सदस्य चर्चा:अभिजीत साठे
पाय केव्हा मोडू नये?
[संपादन]'जागतिक समन्वित वेळ’ या लेखात आपण जीएम्टी हा शब्द बदलून जीएमटी असा केलात. हरकत नाही, बदलेला शब्द दिसायला अधिक चांगला आहे. परंतु, मराठी शुद्धलेखनाच्या नियमांत फक्त शब्दाच्या शेवटी आलेली पायमोडकी अक्षरे पाय न मोडता लिहावीत असा आदेश आहे. (अपवाद : न्, आणि अन्} जीएम्टीमध्ये ’एम्’ शब्दाच्या आतल्या भागात होता, त्याचा पाय मोडकाच ठेवला तरी चालले असते. जीएम्टी आणि जी.एम.टी. दोन्ही बरोबर. आणखी उदाहरणे : एल्एल.बी; एम.एस्सी; परंतु पीएच.डी वगैरे.....J (चर्चा) १८:०४, २५ सप्टेंबर २०१२ (IST)
नैर्ऋत्य
[संपादन]मराठी/संस्कृतमध्ये असले चार-पाच शब्द आहेत. या प्रत्येक शब्दातील ’ऋ‘वर रफार आहे. पण दुर्दैवाने संगणकावरील ’मनोगत‘ सोडल्यास कुठल्याच संकेतस्थळावर याचे योग्य टंकलेखन करता येत नाही. (अशी अनेक अक्षरे आहेत, की जी माझ्या माहितीप्रमाणे, फक्त मनोगतावरच टाईप करता येतात)
- निर्ऋत नावाचे एक खेडेगाव. या गांवात वरुणाच्या अधर्म नावाच्या पुत्राचे भय, महाभय, व मृत्यू नावाचे तीन पुत्र रहात होते; नैर्ऋत्य दिशेची देवता.
- निर्ऋता : कश्यप आणि अप्सरा खशा(प्राचेतस दक्षप्रजापति आणि असिक्नी यांची कन्या) यांची कन्या.
- निर्ऋति : कश्यप(ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, कर्दमऋषी आणि मनूची कन्या देवहूती यांच्या मरीचि नावाचा पुत्र व त्याची पत्नी कला यांचा पुत्र आणि अग्नीचा शिष्य) व पत्नी सुरभि नावाची अप्सरा यांचा पुत्र.
- नैर्ऋत किंवा कपोत नैर्ऋत : ऋग्वेदांमधील काही ऋचा लिहिणारा एक ऋषी.
- नैर्ऋत्य : (निर्=ऋतु+य)ज्या दिशेकडून(निर्=कडून) भारतात (वर्षा)ऋतू येतो ती दिशा. निर्ऋत या देवतेचे स्थान असलेली दिशा.
त्यामुळे आपण ’इस्रायल’ पानावर दुरुस्त केलेला नैऋत्य शब्द मी परत नैर्ऋत्य करीत आहे....J (चर्चा) १७:३०, १० ऑक्टोबर २०१२ (IST)
Article requests
[संपादन]Hi! Do you do article requests in Marathi? Thanks WhisperToMe (चर्चा) ०७:०४, १६ ऑक्टोबर २०१२ (IST)
आपण केलेली चर्चा वाचली..
[संपादन]नमस्कार, आपण केलेली चर्चा वाचली.. मराठी विकिपीडिया ने चालु केलेल्या ’फ़ोटोथॉन २०१३’ ह्या उपक्रमाचा उद्देश कळु शकेल काय ? विकिपीडियावर जास्तित जास्त फ़ोटो अपलोड करण्यास आवाहन केले आहे त्यामागचे कारण काय मग ? सगळेच सभासद लेख तयार करु शकणार नाही मग फ़ोटो अपलोड का करायचे ? - सदस्य:बहिर्जी नाईक
अभिजीत, सांगकाम्या कसा सुरु/ ऑपरेट करायचा याची माहिती देउ शकत असाल तर बघा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:१७, १६ एप्रिल २०१३ (IST)
नाबोकोव्ह
[संपादन]नमस्कार. मी नाबोकोव्ह वरील लेख test/ assignment म्हणून लिहित आहे. वास्तविक हा लेख आधी धूळपट्टीवर तयार करायला हवा होता. पण वेळेअभावी थेट विकिपीडियावर लिहत आहे. Rohini (चर्चा) १८:०९, २३ मे २०१३ (IST)
You can remove this notice at any time by removing the {{Talkback}} or {{Tb}} template.
सांगकाम्या अभिजीत
[संपादन]नमस्कार,
तुमच्या सांगकाम्यास सांगकाम्या असल्याचा फ्लॅग दिलेला आहे.
अभय नातू (चर्चा) ०४:२४, ९ जुलै २०१३ (IST)
स्थानांतर
[संपादन]माझ्या कल्पनेप्रमाणे पानाचे स्थानांतर केले की फक्त त्याचे शीर्षक बदलते, बाकी काहीही बदलत नाही. असे होत नसेल तर उदाहरणांसकट स्पष्टीकरण दिल्यास आभारी होईन.....J (चर्चा) २०:५८, १८ ऑक्टोबर २०१३ (IST)
Wikimedia Consultation in Bangalore
[संपादन]Dear fellow Wikipedian,
I write to you because you're one of the most active Marathi Wikipedians.
The Wikimedia Foundation (the non-profit operating Wikipedia sites) is holding an important community consultation in Bangalore on October 4th-5th about the future of Wikimedia work in India.
All the information is here.
So far, none of the most active Marathi Wikipedians have been nominated to represent the Marathi Wikipedia community, and I think it would be a pity not to have you with us to share your perspective on how we can best support you and promote your work.
Please consider having a discussion on-wiki and coming up with delegates to nominate on the talk page here.
Looking forward to meeting some of you soon!
- Asaf Bartov
- Wikimedia Foundation
- Ijon (चर्चा) ०६:४१, १४ सप्टेंबर २०१४ (IST)
जिन्नाह ?
[संपादन]- इंग्रजी शब्दांत आकारान्त उच्चाराचे शब्द फारसे नाहीत. Gala, Para, Era, Anna, India या शब्दांचे उच्चार अनुक्रमे गाऽलं, पाऽरं, इअरं, अॅनं, इन्डियं/इन्डिअं असे आहेत. त्यामुळे अल्ला, जिन्ना, सारा अशा आकारान्त उच्चारांच्या शब्दांचे स्पेलिंग करताना शेवटच्या a नंतर एक h लिहावा लागतो. त्यामुळे Allah, Jinnah, Sarah, Mullah, Maharajah, Ayatollah, Madrassah (मदरसा), almirah (आलमारी) वगैरे.
- इंग्रजी शब्दांत जेव्हा एखाद्या व्यंजनाचे द्वित्त होते, म्हणजे ते व्यंजन एकामागे एक असे चिकटून येते, तेव्हा त्याचा उच्चार मराठी द्वित्तासारखा जोडाक्षरी होत नाही. उदा० Running = रनिंग, रन्निंग नाही ! Committee = कमिटी, कम्मिट्टी नाही. तेव्हा Jinnahचा उच्चार जिना (फारतर जीना) आणि त्यामुळे मराठी लेखन जिना, जिन्नाह नाही ! हा दुवा उघडून पहावा :
.....J (चर्चा) २२:००, २० डिसेंबर २०१४ (IST)
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
[संपादन]नमस्कार,
मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
धन्यवाद.
--Abhinavgarule (चर्चा) १९:४५, ९ एप्रिल २०१५ (IST)
देवनागरी विकिपीडिया
[संपादन]देवनागरीत एखाद्या शहराचे नाव काय लिहितात हे पाहण्याचे कारण नाही, कारण हा देवनागरी विकिपीडिया नाही. मराठीत ’मीरत असेच वर्षानुवर्षे लिहीत आलेले आहेत त्यासाठी हे पहा : दुवा .... ज (चर्चा) १४:१३, २१ मे २०१५ (IST)
विकिपेडियामधील अवॉर्ड्स बदद्ल
[संपादन]नमस्कार, मला विकिपेडिया मधील अवॉर्ड्स बद्दल जाणून घ्यायचे आहे. अश्विनी सुर्वे
सांगकाम्या अभिजीत
[संपादन]तमिळनाडूतील लोकसभा मतदारसंघांच्या पानात 'तमिळनाडूतील लोकसभा मतदारसंघ' हा साचा सांगकाम्याकरवी दोनदा लावण्याचे प्रयोजन कळाले नाही. काही प्रयोजन नसेल तर एक साचा वगळावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:२८, ३१ जुलै २०१५ (IST)
- दोन वेळा साचा कसा काय लागला हे माहीत नाही. AWB मध्ये यादी बहुधा दोनदा लोड झाली असे वाटते आहे. दुरुस्त करतो. - अभिजीत साठे (चर्चा) ०९:३४, १ ऑगस्ट २०१५ (IST)
Participate in the Ibero-American Culture Challenge!
[संपादन]Hi!
Iberocoop has launched a translating contest to improve the content in other Wikipedia related to Ibero-American Culture.
We would love to have you on board :)
Please find the contest here: https://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Translating_Ibero_-_America/Participants_2016
Hugs!--Anna Torres (WMAR) (चर्चा) १९:०७, १० मे २०१६ (IST)
संपादक क्रमवारी
[संपादन]नमस्कार,
येथे असलेल्या मराठी विकिपीडियावरील संपादक/संपादन सांख्यिकीनुसार तुमचा क्रमांक आता तिसरा आहे. सप्टेंबरअखेर तुम्ही लेखांमध्ये (इतर नामविश्वे वगळून) २१,६०३ संपादने केलीत. मराठी विकिपीडियावरील तुमच्या या योगदानाबद्दल समस्त मराठीभाषकांच्या वतीने मी आपणास धन्यवाद देतो.
अभिनंदन!
अभय नातू (चर्चा) २२:२३, ११ ऑक्टोबर २०१६ (IST)
- माझ्यातर्फेही हार्दिक अभिनंदन कृपया स्विकारावे.
--वि. नरसीकर (चर्चा) १०:३३, १२ ऑक्टोबर २०१६ (IST)
Vote in masik sadar
[संपादन]Sorry for typing in English i have added an article for vote in masik sadar do express your views here टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२५, १९ डिसेंबर २०१६ (IST)
विनंती
[संपादन]विकिपीडियावर तुम्ही काही चित्र चढवली आहे ज्यावर टॅग नाही आहे.काही पानांवर मी साचा:कॉपीराइट माहिती अनुपस्थित लावला आहे वह काही चित्रांवर नाही माझी विनंती आहे की तुम्ही विकिपीडियाची गरिमा ठेवावी वह त्यावर उचित टॅग लावावे या त्याला कडून टाकावे अशी विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२३, ४ फेब्रुवारी २०१७ (IST)
मराठी भाषा गौरव दिन
[संपादन]वि. नरसीकर (चर्चा) १७:४३, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)
संपर्क विनंती
[संपादन]नमस्कार, मला आपल्याशी महत्वाची चर्चा करायची आहे. मला subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवून संपर्क करावा हि नम्र विनंती.
सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२४, ६ मार्च २०१७ (IST)
हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया
[संपादन]मराठी विकिपीडिया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला मराठी विकिपीडियाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. २००३ साली या दिवशी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाले. वसंतपंचमी हा आपला पहिला लेख होता.
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०१, १ मे २०१७ (IST)
मार्च २०१७ बाबत शुभेच्छा
[संपादन]नमस्कार अभिजीत साठे,
विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे तिसरे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.
|
---|
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४२, ३ मे २०१७ (IST)
भारतीय भाषा विकिपीडिया सहकार्य प्रकल्प
[संपादन]नमस्कार,
सदर प्रकल्पाचे निवेदन पूर्वी विकिपीडिया:चावडी/प्रगती वर इथे प्रकाशित केले आहे. भारतीय भाषांमधील विकिपीडियामध्ये उत्तम ज्ञाननिर्मिती होण्यासाठी विकिमिडिया प्रतिष्ठान व गुगल यांनी CIS-A2K, Wikimedia India Chapter आणि विकिपीडिया सदस्य गट यांच्या सहकार्याने हा पथदर्शी प्रकल्प आखला आहे. यामध्ये सक्रीय संपादकांना संगणक,इंटरनेट इ. साहित्य सुविधा पुरविणे तसेच लेखन स्पर्धा आयोजित करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. सध्या असणाऱ्या अडचणी व गरजा यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण प्रश्नावली तयार केली आहे. आपण पुढील दुव्यावर क्लिक करून ही प्रश्नावली अवश्य भरावी व इतरांना प्रवृत्त करावे ही विनंती.
- अधिक माहितीसाठी - भारतीय भाषा विकिपीडिया सहकार्य प्रकल्प
- सर्वेक्षण प्रश्नावली
विनीत, सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:०४, २० डिसेंबर २०१७ (IST)
परत तपास व्हावा
[संपादन]नमस्कार अभिजीत.. मला वाटते आपण एकदा एक रजाई तीन लुगाई या चित्रपटाचे संदर्भ परत तपासून पाहावे. कारण हा चित्रपट यशस्विरीत्या प्रदर्शित झाला होता. उल्लेखनीय रद्दीकरण हा ट्याग मला समजेल का. (Rachit143 (चर्चा) १६:१४, ३ एप्रिल २०१९ (IST))
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.