विकिपीडिया:धूळपाटी२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान विकिक्वोट वर संपादन करण्यासाठी मदतीचा लेख / q:विकिक्वोट धोरण ठरवता यावे म्हणून तयार करण्यात येत आहे. आपणही यात सहभागी व्हावे. आवश्यक बदल थेट या पानावर करावे किंवा या पानाच्या चर्चा पानावर त्या विषयी आपले मत मांडावे. कालांतराने या पानावरील माहिती योग्य ठिकाणी हलविण्यात येईलच.

वर्गीकरण[संपादन]

सध्या विकिक्वोट वर q:वर्ग:विकिक्वोट हा सर्वोच्च वर्ग केला आहे. या वर्गात वर्ग व्यक्ती, साचे, विषयानुसार अवतरणे, म्हणी, सुविचार, उखाणे, अशा विकिक्वोट मध्ये असलेल्या / होऊ घातलेल्या विषयांचा समावेष करता येईल.

सर्वोच्च वर्गातील वर्ग व्यक्ती मध्ये पेशानुसार व्यक्ती, देशानुसार व्यक्ती वगैरे उपवर्ग आहेत / करता येऊ शकतील. त्या खाली क्रमाने वर्ग लेखक, कवी, शास्त्रज्ञ असे आहेत / होत जातील.

वर्ग साचे मध्ये सर्व साचे ठेवता येतील, तसेच म्हणी, उखाणे हेही याच मुख्य वर्गात असतील.

वर्ग व्यक्ती या वर्गात (क्रमाने) संबंधित लेखात त्या व्यक्तीचे नाव मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत धोरणानुसार / पद्धतीनुसार असावे. लेखाचे नाव आडनाव पहिले मग उर्वरीत नाव असे असावे. शक्य तेथे इ.स. प्रमाणे आधी जन्म-मृत्यू आणि मग लेखक, कवी असे योग्य वर्गीकरण करावे. लेखात मराठी विकिपीडियात तो लेख असल्यास त्याचा दुवा {{विकिपीडिया}} हा साचा लावून आणि इतर भाषेतील फक्त विकिक्वोटचा दुवा देण्यात यावा. लेखात त्या व्यक्तीचे चित्र असावे. तसेच विकिक्वोट तयार करण्यात आलेल्या लेखाचा दुवा मराठी विकिपीडियात {{विकिक्वोटविहार}} हा साचा लावून जोडण्यात यावा.

वर्ग विषयानुसार अवतरणे मध्ये (सध्या अस्तीत्वात नाही) जीवन, निसर्ग, ईश्वर, इतिहास, शिक्षण, विज्ञान, भावना असे लेख करता येऊ शकतील. या लेखात अनेकांचे पण एकाच विषयाचे विचार / अवतरणे एकत्रीत देता येतील. समोर त्या व्यक्तीचे नाव देता येईल आणि त्याचा दुवा संबंधीत पानाशी जोडता येईल.