अनभुलेवाडी
?अनभुलेवाडी लक्ष्मीनगर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
राजधानी | मुंबई |
मुख्यालय | सातारा |
मोठे शहर | दहिवडी |
जवळचे शहर | दहिवडी |
प्रांत | सातारा |
विभाग | पुणे |
जिल्हा | सातारा |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | माढा |
विधानसभा मतदारसंघ | माण |
तहसील | माण (दहिवडी) |
मुंबई पासून अंतर | 260 किमी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 415508 • +०२१६५ • MH-11, MH-53 |
अनभुलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे. हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.
माण तालुका नकाशा
हवामान
येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
शाळा
जि.प प्राथमिक शाळा अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) तालुका-माण, जिल्हा-सातारा ४१५५०८
प्रेक्षणीय स्थळे
- श्री. महालक्ष्मी मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
- श्री. हनुमान मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
- श्री. वाजूबाई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
- श्री. भवानी आई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
- श्री. काळूबाई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
गावातील आडनावे
इंगळे - जगदाळे - निकम - कदम - लावंड - भोसले - किसवे - येळे - दडस - खुस्पे - शिंगाडे
जवळपासची गावे
बिजवडी, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर
फोटो संग्रह
Manage By
Pranay Kisan Ingale