Jump to content

"सूरज एंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''डॉ. सूरज मिलिंद येंगडे''' (जन्म: इ.स. १९८८) हे एक भारतीय [[संशोधक]], [[वकील]], व [[लेखक]] आहेत. ते मूळचे [[नांदेड|नांदेडचे]] असून अमेरिकेतील [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] संशोधन करत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://scholar.harvard.edu/surajyengde/about|title=About|website=scholar.harvard.edu}}</ref> येंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि [[जात|जातीचे]] प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर '[[कास्ट मॅटर्स]]'चे लेखक आणि '[[द रॅडिकल इन आंबेडकर]]'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-49673283|title=आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-49659040|title='वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'|via=www.bbc.com}}</ref> ते संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतात.
'''डॉ. सूरज मिलिंद येंगडे''' (जन्म: इ.स. १९८८) हे एक भारतीय [[संशोधक]], [[वकील]], व [[लेखक]] आहेत. ते मूळचे [[नांदेड|नांदेडचे]] असून अमेरिकेतील [[हार्वर्ड विद्यापीठ|हार्वर्ड विद्यापीठात]] संशोधन करत आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://scholar.harvard.edu/surajyengde/about|title=About|website=scholar.harvard.edu}}</ref> येंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि [[जात|जातीचे]] प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर '[[कास्ट मॅटर्स]]'चे लेखक आणि '[[द रॅडिकल इन आंबेडकर]]'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.<ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-49673283|title=आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/india-49659040|title='वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'|via=www.bbc.com}}</ref> ते [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] उपक्रमात काम करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/athour-mapia-news/dialogue-with-book-caste-matters-author-suraj-yengde-zws-70-1952091/|title=रॉकस्टार’ स्कॉलर!|date=2019-08-17|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-02-13}}</ref>


== बालपण व प्राथमिक शिक्षण ==
== बालपण व प्राथमिक शिक्षण ==

१५:३६, १३ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

सूरज येंगडे
जन्म इ.स. १९८८
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका
जोहान्सबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिका
पेशा संशोधन, लेखन, व सामाजिक कार्य

डॉ. सूरज मिलिंद येंगडे (जन्म: इ.स. १९८८) हे एक भारतीय संशोधक, वकील, व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे असून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत.[] येंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि जातीचे प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर 'कास्ट मॅटर्स'चे लेखक आणि 'द रॅडिकल इन आंबेडकर'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.[][] ते संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतात.[]

बालपण व प्राथमिक शिक्षण

सूरज येंगडे नांदेडच्या भीमनगरमधील दलित, बौद्ध वस्तीत वाढले. त्यांचे वडील मिलिंद येंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच दलित पँथरशी जोडलेले होते. ते राजा ढालेंचे जवळचे सहकारी असल्यामुळे सुरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर बामसेफ-बसपाचेही कार्यकर्ते झाले होते. 'वस्तुनिष्ठ विचार' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. त्यांच्या आग्रहामुळेच सुरजने कांशिराम यांचे 'चमचायुग' हे पुस्तक वाचले होते. त्यात आंबेडकरी चळवळीतील 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशिराम यांनी सांगितले आहेत. दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. नांदेडच्या विधि महाविद्यालयात सरंजामी वातावरणातही ‘जीएस’ पदाची निवडणूक त्यांनी लढवली आणि ती जिंकलीही. त्यानंतर काही दिवस मुंबईमध्ये शिक्षण घेऊन ते शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षणासाठी रवाना झाले.[] ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते संयुक्त राष्ट्रांच्या एका उपक्रमात काम करत आहेत.

उच्च शिक्षण व संशोधन

येंगडे यांनी आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते दलित आणि कृष्णवर्णीय अभ्यासाचा एक सिद्धांत विकसित करण्यात सामील आहे.[][]

आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली आहे.[][]

इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना "दलित" म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर बीबीसी मराठीसोबत त्यांनी परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावे लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असे येंगडे यांनी सांगितले आहे.[][][]

लेखन

त्यांनी 'कास्ट मॅटर्स' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक त्याच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर एका आठवड्यात पुन्हा छापण्यासाठी गेले. अलीकडेच द हिंदूने प्रतिष्ठित "बेस्ट नॉनफिक्शन बुक्स ऑफ द दशक" च्या यादीमध्ये ते वैशिष्ट्यीकृत केले होते.[][]

'द रॅडिकल इन आंबेडकर' हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत संपादित केले आहे. दलित, ब्लॅक, रोमा, इराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.[]

पुरस्कार व सन्मान

  • सूरज यांचे भारताच्या सर्वोच्च साहित्य पुरस्कार "साहित्य अकादमी"साठी नामांकन करण्यात आले.[]
  • ते "डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार" (कॅनडा, २०१९) प्राप्तकर्ता[]
  • "रोहित वेमुला मेमोरियल स्कॉलर अवॉर्ड" (२०१८) प्राप्तकर्ता[]
  • १४ नोव्हेंबर २०२० रोजी ते साधना या मराठी साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते.

संदर्भ

  1. ^ a b c d e f g "About". scholar.harvard.edu.
  2. ^ a b c d e f g "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज येंगडे" – www.bbc.com द्वारे.
  3. ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.
  4. ^ "रॉकस्टार' स्कॉलर!". Loksatta. 2019-08-17. 2021-02-13 रोजी पाहिले.
  5. ^ "'परदेशी जाऊन बाबासाहेबांसारख्या पदव्या घेणार असं वाटलं पण जातीने तिथेही पिच्छा सोडला नाही'" – www.bbc.com द्वारे.
  6. ^ "'देश छोड़ने पर भी जाति ने पीछा नहीं छोड़ा'" – www.bbc.com द्वारे.

बाह्य दुवे