आफ्रिकन अमेरिकन
Jump to navigation
Jump to search
आफ्रिकन अमेरिकन (इंग्लिश: African Americans ;) किंवा कृष्णवर्णीय अमेरिकन ह्या विशेषणाने ओळखले जाणारे लोक हे अमेरिकेचे असे नागरीक अथवा रहिवासी आहेत ज्यांची मुळे आफ्रिकेतील कृष्णवर्णीय वंशाशी निगडीत आहेत. ह्यांतील पुष्कळसे लोक अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात आफ्रिकेतुन बंदी बनवून आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत, तर इतर लोक आफ्रिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागांतुन स्वेच्छेन अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांचे वंशज आहेत. अमेरिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या १२.३८% लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी परराष्ट्रसचिव काँडोलिझ्झा राईस, प्रख्यात समाजसुधारक मार्टिन लुथर किंग, जुनियर, बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन ह्या काही उल्लेखनीय आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या व्यक्ती आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- कृष्णवर्णीय अमेरिकनांच्या इतिहासाविषयी कागदपत्रे व चित्रे (इंग्लिश मजकूर)