वंश (मानव वर्गीकरण)
Appearance
वंश म्हणजे शारीरिक वैशिष्ट्ये, पूर्वज, जनुकशास्त्र, सामाजिक संबंध व या सर्व घटकांच्या परस्परसंबंधावर आधारित माणसांचे वर्गीकरण. इंग्रजीमध्ये याला रेस (race) म्हणतात. रेस या संज्ञेचा वापर सुरुवातील समान भाषा बोलणाऱ्या समूहाला उद्देशण्यासाठी होई, त्यानंतर राष्ट्रीय संलग्नता दर्शवण्यासाठी होई, व १७व्या शतकात शारीरिक (दृश्य रूपी / फीनोटिपिकल) वैशिष्ट्ये दर्शवण्यासाठी होई. १९व्या शतकापासून तिचा वापर जीववर्गीकरणशास्त्राच्या (बायॉलजिकल टॅक्सॉनमी) संदर्भात दृश्य रूपामुळे (फीनोटाईप) परिभाषित होणाऱ्या मानवी समूहांच्या जनुकीय निराळेपणाला दर्शवण्यासाठी होऊ लागला.