"मराठी विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''मराठी विकिपीडिया''' हा [[विकिपीडिया]] या मुक्त ऑनलाईन [[ज्ञानकोश]] प्रकल्पातील [[मराठी भाषा|मराठी भाषेतला]] ज्ञानकोश आहे. [[मे १]], [[इ.स. २००३]] रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, [[इ.स. २०१६]] मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. [[डिसेंबर]] [[इ.स. २०१७|२०१७]] मध्ये मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत. |
'''मराठी विकिपीडिया''' हा [[विकिपीडिया]] या मुक्त ऑनलाईन [[ज्ञानकोश]] प्रकल्पातील [[मराठी भाषा|मराठी भाषेतला]] ज्ञानकोश आहे. [[मे १]], [[इ.स. २००३]] रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, [[इ.स. २०१६]] मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. [[डिसेंबर]] [[इ.स. २०१७|२०१७]] मध्ये मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत. ''[[शिवाजी महाराज]]'' व ''[[बाबासाहेब आंबेडकर]]'' हे मराठी विकिपीडियावरील [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावर सर्वाधिक वाचकसंख्या असलेली पृष्ठे|सर्वाधिक वाचकसंख्या असलेले लेख]] आहेत. |
||
विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल. |
विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल. |
२०:०८, २५ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
मराठी विकिपीडियाचा लोगो | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://mr.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | मे १, इ.स. २००३ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. जुलै, इ.स. २०१६ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ४२,००० च्यावर जाऊन पोचली. डिसेंबर २०१७ मध्ये मराठी विकिपीडियावर ५०,००० लेख पूर्ण झाले आहेत. शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर हे मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचकसंख्या असलेले लेख आहेत.
विकिपीडियाचे प्रशासक, प्रचालक यांचे मतानुसार विकिपीडियावर लेख लिहिताना त्यातील माहिती अचूकच पाहिजे असा हट्टाग्रह करुन उपयोग नाही. परिणामत: येथील मजकूर अचूकच असेल याची कोणतीही खात्री देता येऊ शकत नाही. तरी येथील माहितीचा वापर करताना त्या माहितीची अन्य काही ठिकाणांहून पडताळणी केलेली निश्चितच उपयोगी ठरेल.
आरंभ
औदुंबर (कविता) आणि वसंत पंचमी या लेखांची १ मे, २००३ रोजी झालेली पहिली, मराठी विकिपीडियावरील सर्वांत जुनी ज्ञात संपादने आहेत.
सदस्य आणि संपादक
एकूण सदस्यखाते | एकूण लेख | एकूण संचिका/चित्रे | प्रचालक |
---|---|---|---|
१,६७,४६८ | ९८,८८३ | ८,४६८ | १० |
मराठी विकिपीडियावरील टीका
'दैनिक प्रहार;चे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून आली ; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे. [१]
तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणे, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच , कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, अस विकिपीडियातही दिसते.[१]
येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.[१]संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे आहे.
संदर्भ दर्शवा
- ^ a b c विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी![मृत दुवा], ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनिटांनी पडताळली वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर १६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- मराठी विकिपीडिया (मराठी मजकूर)
- मराठी विकिपीडिया "मोबाइल" (मराठी मजकूर)
- विकिमीडिया फाउंडेशनाचे संकेतस्थळ (इंग्लिश व बहुभाषी मजकूर)