मराठी विकिपीडिया
मराठी विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | मराठी |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://mr.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | मे १, इ.स. २००३ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
मराठी विकिपीडिया हा विकिपीडिया या मुक्त ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्पातील मराठी भाषेतला ज्ञानकोश आहे. मे १, इ.स. २००३ रोजी मराठी विकिपीडियाची सुरुवात झाली. मराठी विकीपीडियावर सध्या ९८,७५४ लेख आहेत. "शिवाजी महाराज" व "बाबासाहेब आंबेडकर" हे मराठी विकिपीडियावरील आजवरचे सर्वाधिक वाचले जाणारे पहिले दोन लेख आहेत. "औदुंबर (कविता)" आणि "वसंत पंचमी" हे मराठी विकिपीडियावर लिहिले गेलेले अनुक्रमे पहिले व दुसरे लेख आहेत.
प्रगती[१]
मराठी विकिपीडियाची प्रगती खालीलप्रमाणे झालेली आहे.
- १ मे २००३ मध्ये सुरुवात
- २२ सप्टेंबर २००८ रोजी २०,००० लेख पूर्ण
- २ जुलै २०१० रोजी ३०,००० लेख पूर्ण
- २४ एप्रिल २०११ रोजी ३३,३३३ लेख पूर्ण
- २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ४०,००० लेख पूर्ण
- ११ सप्टेंबर २०१६ रोजी ४४,४४४ लेख पूर्ण
- २२ डिसेंबर २०१७ रोजी ५०,००० लेख पूर्ण
- २१ ऑगस्ट २०२० रोजी ६०,००० लेख पूर्ण
- २४ डिसेंबर २०२० रोजी ६६,६६६ लेख पूर्ण
- ३० जुलै २०२१ रोजी ७७,७७७ लेख पूर्ण
- २३ सप्टेंबर २०२१ रोजी ८०,००० लेख पूर्ण
- २९ डिसेंबर २०२२ रोजी ८८,८८८ लेख पूर्ण
- १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये ९०,००० लेख पूर्ण
सदस्य आणि संपादक
एकूण सदस्यखाते | एकूण लेख | एकूण संचिका/चित्रे | प्रचालक |
---|---|---|---|
१,६७,२७० | ९८,७५४ | ८,५६७ | १० |
टीका
'दैनिक प्रहार;चे पत्रकार अभिजित ताम्हणे यांनी १३ नोव्हेंबर २०११ च्या वार्तापत्रात "विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी!" या नावाने लेख लिहून आली ; मराठी विकिपीडिया आणि त्यातील नियमित सदस्यांची आत्ममग्नता, आपापसात सलगीकरून अनामिक अंकपत्त्यावरून संपादने करणाऱ्या व्यक्तींना परकेपणाची जाणीव होईल अशी वागणूक असते, 'ज्यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाद एखाद्या तिऱ्हाइतानं उपस्थित केले, तर त्याच्याशीच तुटकपणा दाखवला जातो' अशी सडेतोड टीका केली आहे. [२]
तथ्यशोधाचा मार्गच नाकारणे, फक्त भाषांतरित माहिती देणे, ही जी टोके इंटरनेटच्या प्रसाराआधीच (ऑफलाईन मराठीत) गाठली गेली होती, तीच ‘ऑनलाईन मराठी’ने गाठली. याचे कारण, इंटरनेटवरल्या लेखकांचा ‘नवा वर्ग’ तयार झाला. एका जातीच्या पोटशाखांचे लोकच, कंपू जमवून ‘हेच खरं’ म्हणणाऱ्यांची भारतीय पारंपरिक समाजरचनेतली मुळे सारख्याच जातीची आहेत, असे विकिपीडियातही दिसते.[२]
येथील स्वतःस मोठे म्हणून मिरवणाऱ्या सदस्यांना स्वतःची संपादन संख्या अधिक दाखवणे आणि दुसऱ्यांची संपादन संख्या कमी दाखवणे याचा मोठा मोह आहे. वतनदारी वाटावी तसे ‘अमुक इतकी संपादने पूर्ण केल्याबद्दल हा स्टार’ अशी गौरव-चिन्हे एकेका विकिपीडिया-सदस्याच्या सदस्यपानावर दिसतात. पण हे संपादनकार्य घाईगर्दीत केले जाते.[२]संपादन संख्येत रांगेने पुढे जाणाऱ्यांचे लोकांचे, पूर्ण संशोधन करून संदर्भासहित लेख लिहिण्याचे प्रमाण नगण्यच आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "Wikipedia Statistics - Tables - Marathi". 20 February 2023 रोजी पाहिले.
- ^ a b c विकितंत्राच्या जमान्यात इगोपीडित मराठी! Archived 2011-11-16 at the Wayback Machine., ह्या लेखाची दिलेल्या दुव्यावरील इंटरनेट आवृत्ती दिनांक ४ मे २०१२ , १ वाजून २२ मिनिटांनी पडताळली वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर १६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
बाह्य दुवे
- मराठी विकिपीडिया (मराठी मजकूर)
- मराठी विकिपीडिया "मोबाइल" (मराठी मजकूर)
- विकिमीडिया फाउंडेशनाचे संकेतस्थळ (इंग्लिश व बहुभाषी मजकूर)