चर्चा:मराठी विकिपीडिया
महाराष्ट्र दिन
[संपादन]रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ?तुम्ही म्हणता ते शक्य आहे , १ मे तारीख बरोबर आहे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तने ला आधारही असेल पण अद्दाप असा स्पष्ट संदर्भ माझ्या वाचनात अथवा ऐकण्यात नव्हता, तुम्ही ही माहिती कुठून मिळवलीत या बद्दल उत्सूकता आहे एवढेच माहितगार १९:३८, १७ जानेवारी २०११ (UTC)
- तुमचा मुद्दा रास्त आहे. 'महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने' असा उल्लेख साधार मांडायला सध्यातरी संदर्भ उपलब्ध नाही. त्यामुळे तूर्तास तसा उल्लेख वगळतो.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:२७, १८ जानेवारी २०११ (UTC)
इंग्रजी विकिपीडियावर मराठी विकिपीडीया बद्दल लेख
[संपादन]नमस्कार, सध्या इंग्रजी विकिपीडियावर हिंदी मल्याळम इत्यादी विकिपीडीयांबद्दल लेख आहेत पण मराठी विकिपीडीया बद्दल लेख उपलब्ध नाही, तो चालू करण्याच्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडियाच्या नियमास अनुसरून आपण तो Marathi Wikipediaया धूळपाटी सँडबॉक्सवर चालू करत आहोत. १ मे ह्या मराठी विकिपीडीया वाढदिवसापूर्वी त्याची निर्मिती पूर्ण होण्याच्या दृष्टीने योगदान करावे हि नम्र विनंती.माहितगार (चर्चा) २१:०१, १५ मार्च २०१२ (IST)
काही तरी चुकले आहे
[संपादन]जुलै, इ.स. २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाची लेखसंख्या ३५,००० आकड्यावर जाऊन पोचली.
हे वाक्य ४मे, २०१२ला कसे काय लिहिले गेले?.....J (चर्चा) ००:५२, ५ मे २०१२ (IST)