विकिपीडिया:माध्यमांमध्ये संदर्भस्रोत म्हणून विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या पानावर मराठी किंवा अन्य भाषेतील प्रसारमाध्यमांमध्ये मराठी विकिपीडियाचे संदर्भस्रोत म्हणून आलेले उल्लेख नोंदवले आहेत. मराठी विकिपीडिया सोडून अन्य भाषेतील विकिपीडियांचा संदर्भस्रोत म्हणून उल्लेख असलेल्या नोंदी त्या-त्या विकिपीडियांवर लिहाव्यात.

या पानावर नव्या नोंदी कश्या लिहाव्यात[संपादन]

विकिपीडिया:माध्यमांमध्ये संदर्भस्रोत म्हणून विकिपीडिया हे वर्तमान नोंदींचे पान आहे.

प्रसारमाध्यमांत संदर्भस्रोत म्हणून आलेल्या मराठी विकिपीडियाच्या उल्लेखाची नोंद लिहिताना त्या उल्लेखाचे वृत्त / वार्तांकन शीर्षक, प्रकाशनाचा दिनांक, पूरक दुवा (उदा.: ऑनलाइन संस्थळावरील दुवा उपलब्ध असल्यास) व उल्लेखातील महत्त्वाची अवतरणे/ सारांशात वर्णन, अश्या बाबी नोंदवणे अपेक्षित आहे.

या पानावर नवी नोंद लिहिताना साचा:स्रोत बातमी हा साचा वापरून पानातील वाचनीय मजकुराच्या शेवटास माहिती भरावी. सर्वसाधारणतः वापरले जाणारे पॅरामीटर असलेला खालील रकाना पुष्कळदा उपयुक्त ठरेल :

  • {{स्रोत बातमी | भाषा = | पहिलेनाव = | आडनाव = | लेखकदुवा = | सहलेखक = | शीर्षक = | दुवा = | कृती = | प्रकाशक = | दिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांक =२५-०१-२०२० }}
    "प्रातिनिधिक अवतरणे अशी उद्धृत करावीत."

इ.स. २००९[संपादन]

नोव्हेंबर, इ.स. २००९[संपादन]

  • मोरे, प्रशांत (६ नोव्हेंबर, इ.स. २००९). "पु. ल. प्रेमी नेटकरांतर्फे ऑनलाइन लेखन स्पर्धा" (मराठी मजकूर). लोकसत्ता. १६-०३-२०११ रोजी पाहिले. [मृत दुवा]
    'पु.ल. देशपांडे.नेट' संकेतस्थळाने आयोजलेल्या लेखनस्पर्धेविषयी माहिती देणार्‍या या वृतात मराठी विकिपीडियावरील माहितीचा उल्लेख पुढील अवतरणात लिहिल्याप्रमाणे नोंदवला आहे - "ठाण्यातील स्मिता मनोहर या व्यवसायाने वेब डिझायनर तरुणीने २००१ मध्ये हे संकेतस्थळ सुरू केले. जगभरातील पु. ल. प्रेमींसाठी इंटरनेट विश्वात संवादाचे एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. अल्पावधीतच हे संकेतस्थळ लोकप्रिय झाले. गेली आठ वर्षे हे संकेतस्थळ वेळोवेळी अद्ययावत होत आले आहे. विकिपीडिया (Wikipedia) या ऑनलाइन विश्वकोषात मराठी संकेतस्थळांच्या इतिहासाची माहिती आहे. त्यात मराठीतील सर्वात जुन्या संकेतस्थळांपैकी एक अशी या संकेतस्थळाची ओळख करून देण्यात आली आहे."

इ.स. २०१२[संपादन]

जुलै, इ.स. २०१२[संपादन]

हेही पाहा[संपादन]