"रिडल्स आंदोलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
[[वर्ग:दलित इतिहास]] |
|||
[[वर्ग:दलित चळवळ]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रातील_आंदोलने]] |
|||
[[वर्ग:हिंदू धर्म]] |
|||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
१६:०२, २९ मे २०२० ची आवृत्ती
रिडल्स आंदोलन किंवा रिडल्स इन हिंदुइझम आंदोलन हे १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात झालेले एक बौद्ध व दलित आंदोलन होते. रिडल्स इन हिंदुइझम या आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथ पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता.[१][२]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथातील मजकूरांवरुन १९८७-८८ च्या दरम्यान वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. रामायण आणि महाभारत या दोन लोकप्रिय आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे 'हिंदूधर्मातील ती कोडी' म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी काही महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने सुरु झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. मा.गो. वैद्य व दुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथावर बंदी घालण्याचे समर्थन केले. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येथे रिडल्स समर्थन परिषद झाली, त्यामध्ये दादासाहेब गवई, सविता आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रूपा कुळकर्णी-बोधी व अनेक रिपब्लिकन नेते सहभागी होते.[३][४] 'रिडल्स इन हिंदुइझम' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येण्यापूर्वीच लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी या ग्रंथात राम व कृष्ण यांचा अवमानकारक करणारा मजकूर असल्याचा लेख लोकसत्तातील आपल्या साप्ताहिक सदरात लिहिला. त्यानंतर या ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. दुर्गा भागवत यांनीही लोकसत्तात लेख लिहून ग्रंथावर टीका केली. ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अरुण कांबळे, राजा ढाले, रूपा कुलकर्णी-बोधी, नामदेव ढसाळ, कुमार सप्तर्षी आदी विचारवंत पुढे आले. राजा ढाले यांनी तर्कशुद्ध मांडणी करीत दुर्गा भागवतांचे लिखाण कसे बाबासाहेबांविषयी पूर्वग्रह दूषित आहे, हे सप्रमाण मांडण्याचा प्रयत्न 'धम्मलिपी' या साप्ताहिकात व अन्य साप्ताहिकांत लेख, मुलाखतीतून केला. हा वाद सुरुच राहिला. अखेर महाराष्ट्र सरकारने या ग्रंथातील राम-कृष्ण यांच्याबाबतचे परिशिष्ट मागे घ्यावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा शिवसेनेकडून मागणी झाल्यानंतर बौद्ध व दलितांच्या विविध संघटना एकवटल्या व त्यांनी मुंबईत बोरिबंदरपासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवले. त्यानुसार सगळे कार्यकर्ते बोरिबंदर परिसरात जमले व मोर्चाला सुरुवात झाली. २३ नोव्हेंबर १९८७ रोजी सीएसटी (तेव्हाची बोरिबंदर) स्थानकापासून मंत्रालयापर्यंत रिडल्सचा मोर्चा निघाला होता. यात दहा लाख अनुसूचित जातीचे लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण जनता या मोर्चासाठी रस्त्यावर उतरली होती. मजलदरमजल करीत हा मोर्चा लाखोंच्या संख्येने सरकारच्या नावाने घोषणा देत हुतात्मा चौकापर्यंत धडकल्यानंतर काळाघोडा परिसरात हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईचे शिवसेनेचे महापौर असणाऱ्या छगन भुजबळ यांनी गोमूत्राने हुतात्मा चौक परिसर धुवून काढला.[५] 'रिडल्स इन हिंदुइझम'वर बंदी घालण्याची मागणी झाल्यानंतर प्रतिकारार्थ आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आंबेडकरी विचारवंतांनी वैचारिक परामर्ष घेतला. त्या ऐतिहासिक लढ्याचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.[६]
अखेर सर्व आंबेडकरी नेते, बाळ ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.[२]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २९८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "'रिडल्स इन हिंदुइझम'चा मराठी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर". 2 जाने, 2015.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "चळवळीने दिलेलं सर्वांत मोठं भान". Maharashtra Times.
- ^ "संघाला आंबेडकरांचा उमाळा". Dainik Bhaskar. 7 ऑक्टो, 2015.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Gaikwad, Priyanka. "रिडल्स मोर्चा : ३० वर्षापूर्वी |".
- ^ "एक 'राजा' बंडखोर!". 17 जुलै, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)