"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →प्रस्तावना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखावर काम सुरु खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१४:५९, २ जानेवारी २०२० ची आवृत्ती
प्रस्तावना
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल१८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी मोहीम राबविली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते. भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, म्हणजे मराठीत "आदरणीय पिता".
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांची जीवन सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५०च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही एक उच्च बौद्ध उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
सुरुवातीचे जीवन
संदर्भ
- ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015