"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे [[न.वि. गाडगीळ|काका गाडगिळांनी]] ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे. |
* आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे [[न.वि. गाडगीळ|काका गाडगिळांनी]] ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे. |
||
* चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर) |
* चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर) |
||
* चाणक्य विष्णुगुप्त (नाटक, [[गो.पु. देशपांडे]])) |
|||
* दूरचित्रवाणीवर 'चाणक्य' नावाची एक मालिका होती (८-९-१९९१ ते ९-८-१९९२); मालिकेवे लेखन, दिग्दर्शन आणि तिच्यातले चाणक्याचे काम [[चंद्रप्रकाश द्विवेदी]]ने केले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर इतकी बिंबली होती की अनेकांनी तिच्यानंतर हिंदी मालिका पाहणे बंद केले. |
|||
* अभिनेता [[मनोज जोशी]] हिंदी-मराठी नाटकांत काम करतात. त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेल्या चाणक्य ह्या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे. |
|||
* नीरज पाण्डेय यांचा 'चाणक्य' नावाचा हिंदी चित्रपट आहे, त्यात चाणक्याची भूमिका [[अजय देवगण]] यांनी केली आहे. |
|||
* दूरचित्रवाणीवर ११ मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१२ या काळात चंद्रगुप्त मौर्य नावाची हिंदी मालिका सुरू होती. तिच्यात चाणक्याचे काम मनीश वाधवा याने केले होते. |
|||
* चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली. |
|||
==जीवनावरील पुस्तके== |
==जीवनावरील पुस्तके== |
१५:४०, २५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
चाणक्य (इतर नावे: विष्णुगुप्त, कौटिल्य) (कालमान: अंदाजे इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्यांंचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृती व वात्सायनाने लिहिलेले कामसूत्र, हे ग्रंथ. पंचतंत्र या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.
प्रारंंभिक आयुष्य
चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्ताने तक्षशिलेला प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन सुरू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतले जाई. कैकेय देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते, त्यांत चंद्रगुप्त मौर्य हाही होता.त्याला चाणक्याने मगध देशाचा राजा बनविला.
अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण
अलेक्झांडर द ग्रेटचे भारतावरील आक्रमण चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या आक्रमणाचा सामना फक्त भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णुगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. परंतु सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. परंतु विविध राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. उलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून पोरसविरुद्ध लढण्यास मदत केली. अलेक्झांडरने पोरसचा झेलम नदीच्या किनारी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात मगध साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. परंतु चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोवर या अपमानाचा बदला घेणार नाही तोवर आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कहाण्या ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने मॅसेडोनियाला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.
ग्रीक सत्तेविरुद्ध युद्ध
तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांमार्फत जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर आक्रमणे करण्यास सुरुवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील फक्त ग्रीकांवर हल्ले करण्यात येत व भारतीयांना जीवदान देण्यात येत असे. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची द्विधा मानसिकता झाली तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांना सेवेतून डच्चू मिळाला व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे लक्ष्य बनवले त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. परंतु चाणक्याने पोरसला इंद्रदत्तामार्फत या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची हतबलता अजून वाढली. चाणक्याच्याच कुशल नीतीमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला त्यामुळे पोरसचा चाणक्यावर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या मदतीने मगधवर आक्रमण करण्याचे ठरवले.
मगधचे सत्तांतर
चाणक्याने त्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास मगध जिंकण्यास पाठवले होते.
आधुनिक भारतात
- चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या हस्तलिखिताचा इ.स. १९०५ साली शोध लागला व डॉ. शामाशास्त्री या जगद्विख्यात संस्कृत भाषातज्ज्ञाने त्याचा इ.स. १९१५ साली इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला. तो शामाशास्त्रींचा भाष्यासह उपलब्ध आहे. या विषयावरील राधाकृष्णन पिल्ले यांचे 'कॉरपोरेट चाणक्य' हेही पुस्तक प्रसिद्ध आहे.
- आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे काका गाडगिळांनी ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे.
- चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर)
- चाणक्य विष्णुगुप्त (नाटक, गो.पु. देशपांडे))
- दूरचित्रवाणीवर 'चाणक्य' नावाची एक मालिका होती (८-९-१९९१ ते ९-८-१९९२); मालिकेवे लेखन, दिग्दर्शन आणि तिच्यातले चाणक्याचे काम चंद्रप्रकाश द्विवेदीने केले होते. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर इतकी बिंबली होती की अनेकांनी तिच्यानंतर हिंदी मालिका पाहणे बंद केले.
- अभिनेता मनोज जोशी हिंदी-मराठी नाटकांत काम करतात. त्यांची प्रमुख भूमिका व दिग्दर्शन असलेल्या चाणक्य ह्या नाटकाने रंगभूमी गाजवली आहे.
- नीरज पाण्डेय यांचा 'चाणक्य' नावाचा हिंदी चित्रपट आहे, त्यात चाणक्याची भूमिका अजय देवगण यांनी केली आहे.
- दूरचित्रवाणीवर ११ मार्च २०११ ते ७ डिसेंबर २०१२ या काळात चंद्रगुप्त मौर्य नावाची हिंदी मालिका सुरू होती. तिच्यात चाणक्याचे काम मनीश वाधवा याने केले होते.
- चंद्रगुप्ताच्या आयुष्यावर विशाखादत्त याने लिहिलेले 'मुद्राराक्षस' नावाचे संस्कृत नाटक आहे. या नाटकावरून चाणक्य नावाची कोणी व्यक्ती होती असा पहिल्यांदा शोध लागला. चाणक्याची सर्व माहिती बहुधा 'मुद्राराक्षस'मधूनच मिळाली.
जीवनावरील पुस्तके
चाणक्याच्या जीवनावर आणि वाङ्मयावरील पुस्तके
- आर्य (कादंबरी, लेखक - डाॅ. वसंत पटवर्धन)
- आर्य ||चाणक्य|| (जनार्दन ओक)
- आर्य चाणक्य (राम प्रधान)
- आर्य चाणक्य (चरित्र, लेखिका - संध्या शिरवाडकर)
- आर्य चाणक्य (ह.अ. भावे)
- कथा चाणक्य (मूळ इंग्रजी, राधाकृष्णन पिल्लई; मराठी अनुवाद राजेश आजगांवकर)
- कॉर्पोरेट चाणक्य (अनिता एस.आर. वाझ, लुईस एस.आर. वाझ)
- कौटिलीय अर्थशास्त्र (डाॅ. वसंत पटवर्धन)
- ग्यानबाचे अर्थशास्त्र (लेखक काकासाहेब गाडगीळ)
- चाणक्य (कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
- चाणक्य (बालसाहित्य, लेखक - सुबोध मुजुमदार)
- चाणक्य चरित्र (ह.अ. भावे)
- चाणक्यनीति (वा.ल. मंजूळ)
- चाणक्य नीतिसार (डॉ. मधुसूदन घाणेकर)
- चाणक्य नीती (अश्विनी पराशर)
- ||चाणक्य नीती|| भाग १, २. (ह.अ. भावे)
- चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर)
- चाणक्य विष्णुगुप्त (नाटक, गो.पु. देशपांडे)
- चाणक्यांची जीवनसूत्रे (सुहास खांडेकर)
- चाणक्याची तीन पुस्तके (श्री सर्वोत्तम प्रकाशन)
- चाणक्याची सार्थ संस्कृत सुभाषिते (वृद्धचाणक्य) (संपादक - ह.अ. भावे)
- चाणाक्ष (बाबू गंजेवार)
- मुद्राराक्षस (संस्कृत नाटक, लेखक - विशाखदत्त; मराठी अनुवाद - अंजली पर्वते)
- राष्ट्रधर्माचे आचार्य आर्य चाणक्य (डॉ. प्रभाकर पाठक)
- सार्थ चाणक्यनीती (संजय नाईक)
- सूत्रे चाणक्याची सूत्रे गव्हर्नन्सची (डॉ. वसंत गोडसे)