"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. , |
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. , |
||
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref> |
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref> |
||
* पोटॅशियम सॉल्ट : |
* पोटॅशियम सॉल्ट : ज्यांना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते. |
||
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. |
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोक असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते. |
||
⚫ | |||
⚫ | |||
== इतिहास == |
== इतिहास == |
०८:०८, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
मीठ (शास्त्रीय नाव: सोडियम क्लोराइड ; इंग्लिश: Salt;) याचे सूत्र NaCl असे आहे. जगभरातील मानवी समाजांत स्वयंपाकासाठी व अन्नप्रक्रियांसाठी फार पुरातन काळापासून वापरला जाणारा आहारातील एक महत्त्वाचा घटक, क्षार आहे.[१] हे एक प्रकारचे लवण आहे. हा स्फटिक रूपात आढळतो.
प्रकार
- खडे मीठ - समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक सामुद्र मीठ. हे कुटले की साधे बारीक मीठ बनते.
- साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे समुद्रापासून मिळते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. यला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते.
- शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात, म्हणून याला रॉक सॉल्ट म्हणतात.
- पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचेही खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
- आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या थायरॉइड ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.[२]
- पोटॅशियम सॉल्ट : ज्यांना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
- टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोक असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते.
याशिवाय आयुर्वेदात आयुर्वेदात औद्भिद (जमीन उकरून मिळालेल्या खार्या पाण्यापासून मिळवलेले मीठ), बीड (बिडलोण), रोमक (जयपूरजवळच्या सांभर तलावातील पाण्यापासून बनलेले मीठ), पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात.
इतिहास
प्राचीन काळापासून् हे मानवाला ज्ञात आहे. सर्वात प्राचीन लिखित उल्लेख वेदात आढळून येतो.[३] छांदोग्य उपनिषद यात मिठाचा उल्लेख आहे.[४] ग्रीक साहित्यात होमर या कवीने याचा उल्लेख केलेला आढळतो.[५] गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करून इंग्लंडच्या सत्तेला आव्हान दिले होते.[६]
मानवी आरोग्यावर परिणाम
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच वनस्पतीजीवनास हानिकारक असते.[७] हा क्षार शरीराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरीरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरीरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटर्यांमध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, हाडे कमकुवत होतात, चेहर्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, मूत्रपिंडाचे कार्य वाढते हात, पाय, चेहरा व पोट यावर सूज येते. मिठाचे प्रमाण आहारात चवी पुरतेच असावे.
मिठाची शेती
समुद्रकिनारी वाफे तयार करून त्यात समुद्राचे पाणी साठवले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणार्या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात. भारतातील ओरिसा येथील मीठ उत्कृष्ट समजले जात असे.[८]
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ http://marathivishwakosh.in/khandas/khand13/index.php?option=com_content&view=article&id=10465
- ^ http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/
- ^ http://books.google.com.au/books?id=2TpMnMHqDWIC&pg=PT95&lpg=PT95&dq=salt+in+vedas&source=bl&ots=6H-BkXlhxL&sig=lECD5ClPbSCEX-1FEkCbK25DWew&hl=en&sa=X&ei=-JzyU_OGFcaiugSR-YHQBg&ved=0CEwQ6AEwBg#v=onepage&q=salt%20in%20vedas&f=false
- ^ http://www.thenagain.info/Classes/Sources/Upanishads.html
- ^ http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=Salt%3A%20A%20World%20History&f=false
- ^ http://www.saltworks.us/salt_info/si_HistoryOfSalt.asp
- ^ http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm
- ^ http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=India&f=false