केस
केस हा त्वचेचा अविभाज्य घटक आहे. केस केवळ काही नॅनो मीटर जाडीचा असतो. केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात.
केस हा घटक विघटनक्षम आहे केसांमधे गंधक हा घटक असतो.केसांचा रंग काळा किंवा लाल आसू शकतो .
केस(Hair) स्तनधारी प्राण्यांच्या बाह्य चर्मचे उद्वर्ध (outer growth) आहे. कीटकामध्ये शरीरावर जे तंतुमय उद्वर्ध असते, त्यांना ही केस म्हणतात. केस मऊ ते कडक, (जसे की सूअर) आणि टोकदार सुद्धा(जसे की साही चे) असते. प्रकृति ने थंड आणि गरम प्रभाव वाले क्षेत्रांमद्धे राहणारे जीवांना केस दिले आहे., जे थंडीत थंडी पासून रक्षा करतात आणि गर्मीत जास्त ताप ने डोक्याची रक्षा करते. जेव्हा शरीरात असहनशील गर्मी पडते, तेव्हा शरीरातून घाम वाहून बाहेर पडतो.
स्थान
[संपादन]केसांचे स्थान मुलगा व मुलगी यांत वेगवेगळे असते.
मुलगा-मस्तक, गाल(दाढी),ओठांच्या वरील भाग (मिशी),छाती,काखा,हात, पाय,जांघा इ.
मुलगी-मस्तक, हात,पाय,काखा,जांघा इ.
केसांचे रंग
[संपादन]केसांचा रंग शरीरातील मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर ठरतो. केस लाल, काळ्या, सोनेरी व राखाडी रंगाचे असतात. त्यातील सोनेरी केस सर्वात जास्त जाडीचे असतात. काळे, राखाडी व लाल केस अनुक्रमे कमीकमी जाडीचे होत जातात.
गळती
[संपादन]कमी वयातच केस गळत असतील तर ते अनुवांशिक असते. याला अँड्रोजेनिक एलोपेसिया असेही म्हणतात. त्याच बरोबर चुकीचा आहार, पर्यावरण प्रदूषण, औषधे या मुले ही केस गळती होऊ शकते. यावर काही घरगुती उपाय १. जटामासी या वनस्पतीला नारळाच्या तेलामध्ये उकळा थंड झाल्यावर वापर करा.[ संदर्भ हवा ]
-
लांब केस
-
मानवी केस ४० पट मोठे केलेले
-
केसाचे मूळ
-
केसाला जोडणाऱ्या तैलग्रंथी
केसांची रचना: कातडीच्या बाहेर केसांचा जो अंश राहतो त्याला कांड (sheft) म्हणतात. कांडचे तीन भाग आहे. सर्वात बाहेर असणाऱ्या भागाला क्यूटिकल (cuticle) म्हणतात. क्यूटिकलच्या खाली एक कडक अस्तर असते, ज्याला वल्कुट (cortex) म्हणतात वल्कुटच्या खाली मध्य भागला मध्यांश (medulla) म्हणतात. कातडीच्या आत असणाऱ्या केसाच्या भागाला मूळ(root) म्हणतात. केस वाढल्या ने मूळ हळू हळू कांड मध्ये बदलते. भिन्न-भिन्न जंतू मध्ये केसांची वृद्धि भिन्न-भिन्न दर ने होते.
साधारणत: म्हणटले जाते की एका महिण्यात केसं अर्धा इंच, किंवा एका वर्षात पाच ते सहा इंच वाढतात. मूळ एका खड्डयात असते त्याला पुटक (follicle)म्हणतात. पुटक मधुनच केसं निघतात. एका पुटकातून एक केस, किंवा एकपेक्षा अधिक केसं निघुन शकतात. पुटक नासपातीच्या आकाराची पैपिला मध्ये बनलेला असतो. हे पैपिला चर्मचे बनलेले असते. पैपिला आणि पुटकच्या संगमावरच केस बनते. पैपिला रुधिरवाहिनी शी संबद्ध असते. या पासुनच मूळाला ते सर्व मिळते ज्या पासून केसांचे निर्माण होते व वाढ होते. जो पर्यंत पैपिला आणि पटक नष्ट नही होतात तो पर्यंत केसं वाढत राहतात. खोपड़ीचे केसं दोन ते सहा वर्षांपर्यंत जीवित राहतात. त्या नंतर ते गळतात आणि त्या जागी नवीन केसं येतात. हे क्रम वयस्क काळा पर्यंत चालू राहते. केस का गळतात वयस्कर मध्ये त्या जागी नवीन केस का नाही येत, याचे कारण अजून पर्यंत ठीक प्रकारे समझे नाही. काही जन खोपड़ीच्या रोगांमुळे गंजे होतात.
किरणन द्वारे ही काही लोकं बहुधा अस्थायी रूपेण गंजे होतात. अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावात कमी, वंशागत कारण आणि जीर्णन मुळे ही केस झड़तात. अपौष्टिक आहारा मुळे केस शुष्क आणि द्युतिहीन (dull) होऊन काही प्रमाणात झडू शकतात, परंतु सामान्य गंजेपनाचे हे कारण नाही.
केसांचे रंग: वर्णकांमुळे केस काळे, भूरकट, किंवा लाल होउ शकतात. ते वर्णक वल्कुटच्या कोशिकांमध्ये निक्षिप्त असते. केस का पांढरे होतात याचे कारण ज्ञात नाही. हे संभव आहे की वय वाढते, रुग्णता, चिंता, शोक, आघात किंवा काही विटामिनच्या कमतरतेमुळे असे होउ शकते. डाक्टरांचे मत आहे की पांढरे केस होने हे वंशागत असते.
बाल प्रधानत: खालील प्रमाणे चार प्रकारची असतात:
1. आदिवासी (ऑस्ट्रेलिया और भारत के आदिवासी अपवाद हैं) आणि हबाशींचे केस छोटे-छोटे, कुंचित आणि कुरूळकर असतात. यांना लोकरीचे केसवाले पण म्हणतात. या केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद दीर्घवृत्तीय, किंवा वृक्कनुमा आकार असते. या केसांचा रंग नेहमी काळा असतो. असे केस दोन प्रकारचे असतात. मेलानीशियाई आणि अधिकांश हबशींचे केस अपेक्षा लांब आणि त्यांचे घूँघर मोठे असतात. काही आदिवासी समाजातील लोकांचे हबशीचे केस छोटे आणि त्यांचे घूँघर छोटे असतात.
2. पीत जातीचे (चीनियों, मंगोलों) आणि अमरीकी इंडियनचे केस सरळ अकुंचित आणि रफ असतात यांच्या केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद गोलाकार असतात आणि या केसांचा रंग पण बिना अपवाद काळा असतो.
3. यूरोपवाल्यांचे केस लहरदार, कुरूळे, चिकणे आणि रेशमा सारखे मऊसूत असतात केसांचे अनुप्रस्थ परिच्छेद अंडाभ होते. यात मध्यांश नलाकार असतो. यांचा रंग काळा, भूरकट, लाल, किंवा सनच्या रेशे या सारखे असते. भारतीयांचे केस ही याच प्रकाराचे असतात.
केसांची निगा
[संपादन]- केस हलकेपणे कोरडे करणे
केस धुतल्यानंतर ते अतिशय हलक्या हाताने कोरडे करणे गरजेचे असते. जोर लावून केस पुसल्यास ते तुटण्याची शक्यता जास्त असते. पाणी शोषून घेईल असा अतिशय पातळ टॉवेल केस पुसण्यासाठी वापराल्यास केस तुटत नाहीत. अनेकींना केस जोरजोरात झटकण्याचीही सवय असते. हीहि सवय चुकीची आहे. त्यामुळे केस तुटू शकतात. तसेच ओले केस न विंचरता हातांनी हे केस तुम्ही सारखे केल्यास तुटण्याची शक्यता नसते.
- केसांची नियमित मसाज करणे
केस असो या शरीराचा अन्य अवयव, मसाज हा चांगलाच असतो. केसांच्या मुळांशी योग्य पद्धतीने केलेला मसाज फायदेशीर असतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. खोबरेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये स्वतःच्या हाताने, कुटुंबातील व्यक्तीकडून, मैत्रिणींकडून किंवा पार्लरमध्ये मसाज करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
- रोज केस धुणे टाळणे
केसांमध्ये नैसर्गिकरीत्या तेल तयार होत असते आणि हे तेल केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. अनेकांना विशेषतः मुलींना केस चांगले दिसावेत यासाठी रोज केस धुण्याची सवय असते. परंतु ही सवय धोकादायक आहे .अशामुळे केसात निर्माण होणारे नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केसांची गुणवत्ता खराब होते नैसर्गिक केस हेच उत्तम केस असतात.
- तेल आठवड्यातून दोनदा लावणे
शरीराच्या अवयवांप्रमाणेच केसांनाही योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय गरजेचे असते. केसांच्या मुळांना तेल लावल्याने केसांच्या वाढीसाठी आवश्यक ती पोषकद्रव्ये मिळतात. त्यामुळे केस लांब आणि मजबूत राहतात. केसांना कोमट तेल लावल्यानंतर केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करतात. तेल लावल्यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकून तो पिळून केसांना बांधतात. असे १० मिनिटांसाठी केल्यास केसांमध्ये तेल योग्य पद्धतीने मुरण्यास मदत होते. दोन तासांनी केस शाम्पूने धुऊन टाकणे. ह्या पद्धतीने तेल लावल्यामुळे रक्तप्रवाह चांगला होण्यासही मदत होते.
- प्रत्येकवेळी कंडिशनर वापरणे
केस चांगले ठेवायचे असतील तर कंडिशनर वापरणे अतिशय आवश्यक असते. शाम्पू रोज वापरायचा नाही, परंतु कंडिशनरमुळे केसांत आर्द्रता राहण्यास मदत होते; प्रदूषण आणि धूळ यांपासून केसांचे रक्षण होते. स्वतःच्या केसांची गुणवत्ता लक्षात घेऊन योग्य तो शाम्पू आणि कंडिशनर यांची निवड करणे हेही महत्त्वाचे आहे.