विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/जुनी चर्चा १
साचा:विवाद संबधीत चर्चा
- विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण
- विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी
- विकिपीडिया:उल्लेखनीयता/प्रगल्भता
- विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण
- हा महत्वपूर्ण विषय मराठी आणि महाराष्ट्रीय परिपेक्षात विचारात घेणे गरजेचे आहे. पाश्चात्य परिपेक्षात कोणत्याही छोट्यात छोट्या गोष्टीची दखल आणि नोंद घेणारी खूप सारी माध्यमांची उपलब्धता मागच्या खूप काळापासून चालत आली आहे.त्यामुळे एखाद्या लेख/मजकुर विषयाची दखल/नोंद इतर माध्यमांनी पूर्वी घेतली असणे पडताळण्याजोग्या संदर्भ स्रोतांची मुबलकता आणि तशी संस्कृतीसुद्धा त्यांच्याकडे आहे तर भारतीय जीवनाच्या परिपेक्षात वस्तुनिष्ठ नोंदी/दखल घेण्याच्या प्रथांचा सांस्कृतीक आणि माध्यमस्त्रांवर बर्याचदा अभाव जाणवतो.
- खासकरून आपण जसजसे ग्रामीण जीवनाचा गोष्टींचा विचार करावयास लागतो तशा या गोष्टी जाणवावयास लागतात. खरोखरच विश्वकोशिय दखल घेण्याजोग्या व्यक्ती इतर माध्यमांच्या नजरेतून सुटलेल्या असू शकतात त्या शिवाय बर्याच व्यक्तींना प्रसिद्धी/माध्यम परांङमूख असण्याची परंपरा आहे किंवा त्यांच्या बद्दल फारच थोडे लिहिलेगेले पण व्यक्तीचे त्याच्या विवक्षीत क्षेत्रात योगदान मोठे होते.अशा व्यक्तींना ओळखणारी काही मंडळी प्रथमच अशा व्यक्तींबद्दल लिहिती होत असतील आणि त्यांनाही केवळ मराठी विकिपीडिया हेच संकेत स्थळ परिचयाचे असणेही शक्य आहे.
- त्या शिवाय एखाद्या खेडे गावात होणारी वार्षिक जत्रे सारखी परंपरा किंवा नेमकी घेतली जाणारी पिके इत्यादी तत्सम माहिती करिता पडताळण्या जोगे संदर्भ उपलब्ध होतातच असे नाही.
- ह्या लेखाचा विषय एखाद्या लेख विषयाची विश्वकोशियता निकषावर स्विकार्हता एवढीच मर्यादित असली तरी येथील चर्चा करताना संदर्भ उपलब्ध नसलेले काही मजकुर विषयाचीसुद्धा या निमीत्ताने चर्चा व्हावी आणि कालांतराने आपण इतरत्र ती हलवावी असे वाटते.
- अजून एक महत्त्वाचा मुद्दा शिर्षक मराठी असेल , विश्वकोशिय स्विकार्हता/उल्लेखनियता/दखाल पात्रते बद्द्ल साशंकता असेल तर सध्या असे काही लेख सरळ वगळलेही हजात असावेत पण प्रत्यक्षात लेख विषयाची स्विकार्हता सहमतीने नाकारली गेल्या नंतरच असे लेख वगळावयास हवेत आणि अशा वगळण्याजोग्या पानांच्या चर्चेकरीता वेगळे पान ठेवणे खरे तर गरजेचे आहे .आणि या संदर्भाने माझे पान का वगळले ?किंवा का वगळू नये एवढा साधा प्रश्नसुद्धा मराठी मडळी विकिपीडियावर पुरेशा प्रमाणावर विचारत नाहीत हेही एक गुढच आहे. माहितगार ०७:४८, २२ जुलै २०१० (UTC)
भक्तांचे बद्दल विश्वकोशिय उल्लेखनीयता
[संपादन]- देवता आणि संत महात्मे इत्यादी लेख चरित्रे करिता
- देवता विषयक लेखात विभाग कोणकोणते असावेत. या ब्द्दलसुद्धा चर्चा करा
- कोणत्याही लेखाकरिता किमान चार एक पपरिच्छेद लिहिण्या एवढ्या मजकुराची आवश्यकता भासते.हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्या भक्तगणांची संख्य अगनीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो.हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे. पण हनुमानाच्या मंदीरांची शृंखला बांधवून घेणार्या समर्थ रामदास इत्यादी भक्तगणाकरिता स्वतंत्र लेख होऊ शकतील एवढा मज्कुर असतो.पण अशा देवतांच्या भक्तांबद्दल केवळ एखादीच विश्व कोशिय ओळ लिहिणे शक्य असेल तर .... देवतेचे चमत्मकार आणि .... देवतेचे भक्त असे स्वतंत्र लेख बनवून सर्व (विश्वकोशीय दखल घेण्याजोग्या) चमत्कारांची यादी एका स्वतंत्र लेखात, (विश्वकोशीय दखल घेण्याजोग्या) सर्व भक्तांची यादी एका स्वतंत्र लेखात असे स्वरूप असावे असा प्रस्ताव ठेवत आहे.माहितगार ०६:२२, १० ऑगस्ट २०१० (UTC)
चर्चा:रूप पाहतां लोचनीं
[संपादन]अभंग हा प्रकार कुठे असावा या संदर्भात, माहिती वर्गीकरण तसेच तत्सम दुवे देऊ शकाल काय?
- ज्यानांकल्पना नाही त्यांना या सीमारेषा पुसट वाटतात.अभंग या विषयावर एक ज्ञानकोशीय लेखही होऊ शकतो पण त्यात अभंग/कविता कसा लिहावा हे विकिबुक्स या सहप्रकल्पात जावयास हवे आणि एखादा विशिष्ट अभंग/कविता लेखन मूळ लेखन असल्यास विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे.
इथे हे लक्षात घ्यावयास हवे कि एखाद्दा अभंगाचे/कवितेचे विवीध समिक्षकांनी रसग्रहण/समिक्षण कसे केले त्या विशीष्ट कवितेची निर्मिती प्रक्रीया या गोष्टी विश्वकोशिय परिघात येतात पण प्रत्यक्षात कविता अभंग नाटक हे ललित साहित्य विश्वकोशिय परिघात येत नाही. अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा सी मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे हि कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेची शेकड्याने अर्थ लावले गेले रसग्रहणे झाली आणि तेवढीच पिएचडी प्रबंधही एका कवितेवर झाले.[१]त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे ते नेमका अर्थ काय या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशिय लेखन संकेतास पाळून विकिपीडियात घेता येईल.आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कविते संदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे
"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले विवीध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कशा लावल्या याची संदभासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे कि ते तुमचे व्यक्तिगत रसग्रहण असूनये. माझे आवडलेल्या हिन्दीचित्रपटगिताचे माझे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही पण मनोगतावर अभय नातू किंवा उपक्रम मायबोलीवर संकल्प द्रवीडांनी केलेल्या ( अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहित पण मी मात्र त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्र्पट गीत या बद्द्ल विश्वकोशिय मर्यादेत बसणारा इतर लेखन संकेतांचे पालन करित एखादा लेख लिहू शकेन.
अभंग, कविता कोणतेही मूळ लेखन जसेच्या तसे लिहावयाचे झाल्यास विकिस्त्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे. "एखादी गोष्ट कशीकरावी' अथवा गणिता सारख्या एखाद्या विषयास विहिलेले सबंध पुस्तक लिहिण्याकरिता विकिबुक्स हा सहप्रकल्प आहे.
विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते उद्दा मी ज्ञानेशवरांच्या ओळी बदलून माझ्या टाकेन तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेतास चुकीचे नाही:) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची गरज आहे कि जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूप टिकवले जाईल. स्वतंत्र मराठी विकिस्रोत प्रकल्पासाठी [येथे मेटावर विनंती केली आहे.
माहितगार ११:४५, ३० जानेवारी २०११ (UTC)
- कट्यारे, विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे हा लेख, व त्यातील विकिपीडिया म्हणजे चित्रे, माध्यम संचिका, दुवे अथवा स्रोत मजकुराच्या साठवणुकीचे संकेतस्थळ नव्हे हा मुद्दा पाहावा.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:५३, ३० जानेवारी २०११ (UTC)
संदर्भ
[संपादन]- ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=27172:2009-11-27-12-58-45&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 [मृत दुवा]
धन्यवाद
[संपादन]माहितगार,
विस्तृत विवेचनाबद्दल धन्यवाद! पिपात मेले उंदीर चे उदाहरण दिल्याने मुद्दा बराचसा कळला! :) विकिमध्ये काय येऊ शकते या विषयी खरोखरच अज्ञान आहे याची अचानक मला जाणीव यामुळे झाली. खरे तर तुम्ही इतके लिहिलेच आहे. अजून थोडे विवेचन आणि संपादन करून हा लेख इतरत्र (उपक्रम, मिसळपाव, मनोगत, मायबोली वगैरे) प्रसिद्ध केला तर चालेल काय?व
- हो अगदी; .साधारणतः एक नवीन व्यक्ती विकिपीडियावर संपादन स्विकारल जाताना मराठी टंकलेखन,विकिवर संपादन करताना वापरल्या जाणार्या चिन्हांची ओळख, विश्वकोश संकल्पनेची,लेखन संकेत (खासकरून विशेषणे टाळावीत,ललित लेखन करू नये) आणि विकिपीडियाच्या आणि सहप्रकल्पांच्या परिघाची ओळख,लेखात स्वतःची मते आणि स्वतः बद्दल लिहू नये, प्रताधिकार उल्लंघन करू नये या किमान पायर्या चढत जाते.
- नंतर वर्गीकरण,माहिती चौकटसाचे आणि मार्गक्रमण साचे, बॉट्स, शुद्धलेखन, विकिपीडिया प्रकल्प , विषयवार दालने यांची ओळख होते, त्यानंतर मेटा, विकिमीडिया फाऊंडेशन, मिडिया विकि सॉफ्ट्वेअर आणि त्याचे मराठीकरण,मराठी विकिपीडियापुरत्या तांत्रीक सुधारणा, आणि मिडिया विकि सॉफ्ट्वेअर मध्ये सुधारणा, विकिमीडिया इंडिया चॅप्टरची ओळख , आणि सरते शेवटी विकिभेटी असे मार्गक्रमण होते.
- सूचनांची एक यादी हातात देऊन अशी काम होत नाहीत यातील काही पायर्यांचा परिचय विकिपीडियावर येण्यापूर्वीच झाला तर नवागतांना अनपेक्षीत वाटणारे धक्के कदाचित सुसह्य होतील.कुणी कोणती पायरी आधी ओलांडली ते सांगणे कठीण त्यामूळे आधी चुकूदे आणि मग सुधरेल अशी सध्याची स्थिती आहे पण यात बर्याचदा अनावश्यक कालापव्यय होतो हे खरे या दृष्टीने यातील वेवेगवेगळ्या गोष्टींची ओळख वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचती करता आल्यास विकिपीडियातील कामे सुसह्य होतील या दृष्टीने इतरत्र लिहू शकाल तर स्वागतच आहे,लोकप्रभा किंवा साप्ताहीक सकाळ सारख्या माध्यमातूनही काही लेखन कारता आले तर हवे आहे हे हे खरे माझ विकिपीडियावरील कोणतही विवेचन मोकळेपणाने इतरत्र वापरा माझ्या दृष्टीने या पेक्षा अधीक आनंदाची गोष्ट नाही.
- माहितगार ०५:३३, ३१ जानेवारी २०११ (UTC)
विकीबुक्स आणि विकिस्त्रोत यांचे सदस्यत्व घेतले आहेच. तेथेही काम सुरुच राहील.
संकल्प, दुव्याबद्दल आभार! आवांतरः मराठी विकीस्त्रोत वर विकिसोर्सची लिंक इंग्रजी विकीस्त्रोत कडे नेते. ती बदलून मराठी करता येईल काय?
याद्या च याद्या
[संपादन]माहितीगार नमस्कार, विपिवर आपली अनुपस्थिती/तुरळक उपस्थिती जाणवते आहे, आपल्या सुट्टी संपण्याची मी वाट पाहतो आहे. तरी थोडा त्रास देतो. इतक्यात विपीवर मोठ्या प्रमाणात याद्या स्वरूपाचे लेख बनवल्या जात असल्याचे पाहण्यात येत आहेत. त्यावर संबंधित चर्चा पानावर विखुरलेल्या अवस्थेत काही चर्चा होते आहे. बर्याच जुन्या मंडळींनी त्यावर ताशेरे मारले आहेत तर काहींनी समर्थन पण केले आहे. काय ह्यावर काही धोरण असावे/ठरवावे का ? तसे असल्यास मग सदर विषयावर चर्चा चावडी ध्येय आणि धोरणे वर सुरु करता येईल आणि त्यास झालेल्या चर्चेचे संधर्भ हि जोडता येतील. आपण ह्या बाबत मार्गदर्शन करावे असे वाटते. राहुल देशमुख १२:५७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
परत याद्या
[संपादन]ही सूची नाशिक या लेखातून हलवून स्वतंत्र लेख बनवण्याचे प्रयोजन विवाद्य वाटते. अश्याने 'पुणे परिसरातील नाट्यगृहे', 'पुणे परिसरातील चित्रपटगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील नाट्यगृहे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील चित्रपटगृहे', 'इंदापूर परिसरातील हंगामी व कायमस्वरूपी चित्रपटगृहे' (महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या गावागणीक एक आणि मुंबई वगैरेंसारख्या शहराबाबत तर प्रत्येक उपनगरागणीक बनवायचा पायंडा पडेल.) असे लेखही बनायचे पायंडे पडतील. कृपया या लेखातील माहिती नाशिक या मुख्य लेखात संक्षेपाने लिहावी. ऐतिहासिक/सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाच्या असलेल्या आणि त्यामुळे बर्यापैकी विश्वकोशीय उल्लेखनीयता सापडण्याजोग्या मोजक्या नाट्यगॄहांबद्दल/चित्रपटगॄहांबद्दल माहिती नोंदवायची असल्यास या लेखाचा पुनर्विचार करण्यात हशील वाटते. कारण काही वर्षांमध्ये नवीन ठिकाणांची या सूचीत भर टाकण्याचे व "कै." झालेली केंद्रे उडवण्याचे तुलनेने कमी महत्त्वाचे काम करण्याचे कष्ट कायम घेतले जायची व त्यायोगे पान कायम अद्ययावत राहायची शक्यता फार कमी! ही माहिती शिळी झाल्यावर, आधीच फारश्या महत्त्वाचा नसलेल्या माहितीवर एवढे का झिजावे, हा प्रश्न मनात उमटल्यास नवल वाटू नये.
तस्मात, आताच अश्या जंत्रीपर लेखांच्या निर्मितीआधी साधक-बाधक विचार करावा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:३५, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
- मी यासाठी इंग्रजी विपी चा आधार घेतला आहे. तेथे अशाच प्रकारचे लेख आणि उपलेख आहेत. हे पाहूनच मी उपलेख सुचवले. जर सगळ्यांनाच ते मान्य नसेल तर माझे काही म्हणणे नाही. अभय आणि माहितगार यांचे यावर असेच मत आहे का?.....मंदार कुलकर्णी १७:५६, १७ सप्टेंबर २०११ (UTC)
एक स्थान अनेक नावे
[संपादन]एक स्थान अनेक नावे या लेखात जरी बर्यापैकी माहिती असली, तरी या प्रकारचा लेख "विश्वकोशात" नसावा, किंबहुना "रिडायरेक्टस्" अधिक उचित आहेत असे मला वाटते. Kaajawa १९:५८, ८ सप्टेंबर २०११ (UTC)
- अनुमोदन ! सध्याचे स्वरूप विश्वकोशीय लेखनापेक्षा नियतकालिकांत आढळणार्या (माहिती + मनोरंजन) फॉर्म्युला अनुसरणार्या सदरांना अधिक अनुकूल वाटते.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:५९, ९ सप्टेंबर २०११ (UTC)
लेख वगळण्याबद्दल नामांकन आपली मते मांडा
[संपादन]- माझे मत वगळावा सोबतच शिर्षक एकवर्षे पर्यंत पुर्ननिर्मिती पासून सुरक्षीत करावे कारण लेखाचा उद्देश जाहीरातीचा जाणवतो संदर्भांचा अभाव आहे शिवाय अमराठी सध्या आपल्याकडे भाषांतर मनुष्यबळाचा तसाच तुटवडा आहे आणि जे काही आहेत त्यांचा वेळ एखाद्या विशिष्ट संस्थेच्या प्रमोशनपर लेखाचे भाषांतरात वाया जावा असे वाटत नाही .
- शीर्षक सुरक्षीत करण्याचे कारण ह्या लेखाच्या चर्चा पानावर मागच्यावेळी सविस्तर आक्षेप नोंदवला होता तो असा ":ह्या लेखा संबधाने आक्षेपांची संख्या बरीच आहे, शहरी भागातील संस्था आहे त्यामुळे ग्रामीण भागातील संस्थांबद्दल आपण संदर्भा साठी आग्रह धरण्यात तोळा मासा तडजोड करू शकतो पण शहरी भागातील संस्थाबद्दल करण्याचे जरूरी आहे असे वाटत नाही. दुसरे लेखाचा उद्देश अप्रत्यक्षरित्या जाहीरात आणि सभासद संख्या वाढवणे असे लक्श्ःआत येते .संस्थेतील कार्यरत व्यक्तीने लिहिल्या सारखे वाटते आणि औचित्याचा मुद्दा उपस्थित होतो , विश्वकोशीय लेखनशैलीचा अभाव आहे शिवाय भाषा हिंदी आहे माझे मत लेख वगळावा असे आहे माहितगार ०९:१७, २५ जून २०११ (UTC)" तरी सुद्धा पानाची पुर्ननिर्मिती झाली आहे. माहितगार १४:५१, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
- माझेही मत लेख वगळावा असेच राहील. कदाचित मर्यादित मुदतीसाठी हा लेख पानाकाढा साचा लावून ठेवता येईल व संबंधित सदस्यास त्यात काही विश्वकोशीय व जाहिरातसदृश नसलेली माहिती मराठीतून भरायचे आवाहन करता येऊ शकते. तसे न झाल्यास लेख वगळावा.
- तूर्तास मी तेथील अमराठी मजकूर हलवून चर्चापानावर {{cquotes|}} साच्यात ठेवला आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५८, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
- य़ा विषयाच्या उल्लेखनीयेतेबद्दल मला शंका आहे. त्यामुळे हा लेख विकिपीडियावर नसावा असे मला वाटते. विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे दिलेली सर्व साधारण विश्वकोशीय दखलपात्रता मार्गदर्शक तत्त्वे पाहा.
- त्यानुसार "If a topic has received significant coverage in reliable sources that are independent of the subject, it is presumed to satisfy the inclusion criteria for a stand-alone article."
- "significant coverage": याविषयावर फक्त त्यांचा स्वतःचा ब्लॉग हा एकटाच जे काही कव्हरेज करायचे ते करतो आहे. अनिता पाटील यांच्याबद्दल "मुख्यस्रोत (mainstream)" वर्तमानपत्रे, "मुख्यस्रोत (mainstream)" नियकालिके किंवा "मुख्यस्रोत (mainstream)" peer reviewed शोधपुस्तिका इत्यादी स्रोतांमध्ये काहीच माहिती दिसत नाही.
- "reliable source independent of the subject": अनिता पाटील यांच्या संबंधित स्वतंत्र माहिती स्रोत अस्तित्वात नाहीत.
- "secondary sources" विकिपीडियावरील लेखांसाठी त्या विषयावर दूय्यम स्रोत असणे आवश्यक असते. असे स्रोत प्राथमिक स्रोतातील माहितीची शहानिशा आणि विश्लेषन करतात. या विषयाबाबत तसे काहीच दिसून येत नाही आहे.
- या लेखात योगदान दिलेल्या लोकांनी कृपया "reliable sources that are independent of the subject" येथे नोंदवावेत.
- आता लेखात असलेले संदर्भ पाहता हा लेख मराठी विकिपीडियावरील उल्लेखनीयतेचे निकष पार पाडत नाही. त्यामुळे जर विकिपीडिया:उल्लेखनीयता वरील निकष पार पाडणारे संदर्भ मिळाले नाहीत तर हे पान काढून टाकण्यात यावे.
चर्चा: द्रौपदी-सत्यभामा-संवाद
[संपादन]कृपया द्रौपदी-सत्यभामा-संवाद हे पान वगळू नये. अविश्वकोशीय मजकूर व विशेषणे काढून टाकून मजकूर अद्ययावत केला आहे.
- - Kuku
चर्चा: महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
[संपादन]कृपया महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ हे पान वगळू नये. अविश्वकोशीय मजकूर व विशेषणे काढून टाकून शेवटपर्यंत हे बदल अजून सुरुच आहे.. Nmisal (चर्चा) २०:१०, २५ मार्च २०१३ (IST)
- नमस्कार, सदस्य:Nmisal कदाचित आपला काही शुद्धलेखन विषक बाबींमुळे गैरसमज होत आहे असे वाटते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ पानावर पानकाढा साचा नाही , पानकाढा साचा णु अक्षराचे अशुद्धलेखन असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ पानावर लावला गेला आहे असे आढळून आले. लेख शोधताना महाराष्ट्र विधानसभा शब्दा पासूनच शोधला जाणार असल्यामुळे अशुद्ध लेखन असलेले पान वगळले गेल्यास, आपणास प्रत्यक्षात काही अडचण येईल असे वाटत नाही.
*ओह , ओके अशुद्ध लेखनाचे वगळावयाचे पान २५० पेक्षा अधीक लेखात दुवा दिलेले दिसते आहे .त्यामुळे त्या सर्व दुव्यात सुधारणा करे पर्यंत पान वगळले जाऊ नये.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२९, २५ मार्च २०१३ (IST)
उल्लेखनीयता निर्णया बद्दलच्या मराठी विकिपीडियाच्या स्वातंत्र्याची गरज
[संपादन]केदार जोशी नावाच्या लेखाच्या उल्लेखनीयतेची चर्चा चर्चा:केदार जोशी इथे चालू आहे आणि उल्लेखनीयतेच्या प्रश्नावरून हा लेख वगळला जाणार हे निश्चित आहे.परंतु सदर चर्चेत भावनेच्या आवेशात अनवधानाने काही अयोग्य पायंडे स्विकारण्याचा आग्रह तर होत नाही आहे ? काही गल्लत तर होत नाही आहे ? हे मराठी विकिपीडिया सदस्यांनी तपासणे गरजेचे आहे किंवा कसे.
- इथून खालील चर्चेत मी कुठेही केदार जोशी लेखाच्या उल्लेखनीयतेचे समर्थन करतो आहे असा अर्थ मुळीच लावला जाऊ नये ही सर्वांना सादर नम्र विनंती.
- >>"पण हा लेख एक मराठी माणसावर आहे आणि इंग्रजी विकिपीडिया मराठी लोकांब्बदल विष पसरवते ही सबब मला मान्य नाही."<<-सदस्य:Dharmadhyaksha
- इंग्रजी विकिपीडिया मराठी लोकांब्बदल विष पसरवते अशी मराठी विकिपिडियावर सबब या पुर्वी कधी कुणी दिल्याच माझ्या वाचण्यात नाही.सदस्य धर्माध्यक्षांना काही वेगळ मांडायच असेल इंग्रजी विकिपीडियावर किंवा मेटावर एखाद्या लेखाची उल्लेखनीयता नाकारली गेली तर ती मराठी विकिपीडियावर स्वयमेव आपोआप नाकारली जावी असा पायंडा नियम आम्हाला तत्वत: स्विकारायचा आहे का ?
- राम गबाले हे मराठी चित्रपट दिग्दर्शक यांच्या बद्दलचा लेख संदर्भांच्या दर्जाचे कारण देऊन इंग्रजी विकिपीडियातन वगळला गेला. एवढच नाही तर en:User:Shreyeah/Ram Gabale येथील सदस्य नामविश्वातल्या धूळपाटीतन पण इंग्रजी विकिपीडियाने तो वगळला. इंग्रजी विकिपीडियाने en:Ram Gabale लेख वगळला म्हणून मराठी विकिपीडियाने राम गबाले वगळावा हा असा संकेत मराठी विकिपीडियाने स्विकारावा का ?
- en:Anand Rishiji Maharaj नावाच्या लेखाच्या लेखाच इंग्रजी विकिपीडियावरच वगळल जाण जवळपास निश्चित होत,आनंद ऋषीजी महाराज नावाची महाराष्ट्रीय जैन धार्मीक गृहस्थ आहेत आणि त्यांची विश्वकोशीय उल्लेखनीयता असू शकते याची मला सुद्धा इंग्रजी विकिपीडियावरील [[:en:Wikipedia:Articles for deletion/Anand Rishiji Maharaj|संबंधीत चर्चेच्या द्र्ष्टीने शोध घेइ पर्यंत पुसटशीही कल्पना नव्ह्ती.संबंधीत चर्चेत मराठी वृत्तपत्रातील परिच्छेदांचे मी इंग्रजी अनुवाद करून दिल्या नंतरच तो लेख वाचला.
- एखादी गोष्ट सर्वसामान्य परिचीत नसली तर ज्ञानकोशीय उल्लेखनियता असलेला विषयाची सुद्धा वगळण्या करता नामांकन होऊ शकते. मराठी विकिपीडियावरच उदाहरण घ्यायच झाल तर रससिद्धान्त लेख "या लेखाचे विश्वकोशीय मूल्य / प्रयोजन काय आहे? काहीही माहिती उपलब्ध नसेल, तर हे पान काढून टाकावे." अस मत संकल्प द्रविडांनी खुद्द् मराठी विकिपिडियावर मराठी व्यक्ती असून सुद्धा व्यक्त केले.नरसिकरांनी हा नेमका कोणता सिद्धान्त असा प्रश्न चर्चा:रससिद्धान्त येथे विचारला का तर कल्पना नव्हती म्हणून . या विषयावर इंग्रजी विकिपीडियावर लेख नसला आणि मराठी लोकांनाही कल्पना नसली तर उल्लेखनीयतेची चर्चा न करताच लेख वगळावयाचा का ?
- हनुमान मातेचा मराठी लोकांचा उच्चार अंजनी असा होतो anjani या इंग्रजी विकिपीडिया वरील लेखनाव हनुमान मातेला उपलब्ध न करता हट्टाने Anjani Thomas या सिंगर करता वापरल मराठी विकिपीडियावरील अंजनी लेखात त्या अमेरीकन सिंगर देवीचे फोटो आणून भरले जात होते.इंग्रजी विकिपीडियावरील Anjani Thomas सिंगर देवीचे 'फ्यान' म्हणतात म्हणून मराठी विकिपीडियावरील अंजनी लेखशीर्षक आमेरीकी Anjani Thomas सिंगर राणीला उपलब्ध करून द्यायचे का ?
- en:Wikipedia:Articles for deletion/Anjana चर्चा वाचावी हनुमान माते बद्दलचा लेख इंग्रजी विकिपीडियाने वगळला होता म्हणून आपण पण वगळावयास होता किंवा कसे ?
- एखादा लेख इतर सर्व भाषी विकिपीडियांनी नाकारला तर इंग्रजी विकिपीडिया नाकारणार आहे का ?
- >>सोयीचा मार्ग म्हणून Meta वर ह्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू झाल्यास मी तसं इथे नक्की कळवेल<<
- आपण आज लेखाच्या उल्लेखनीयतेचे प्रश्न मेटाच्या अधिकारात देऊ इच्छितो,त्या सोबतच लेख मजकुरातील उल्लेखनीयता सुद्धा मेटाने त्यांच्या अधिकारात मागितली तर नेमके काय काय परिणाम होऊ शकतात याचा आम्ही विचार केला आहे काय ? उद्या महंमद अली जिना आणि भोपाळ वायू दुर्घटनेच्या काळातील वॉरन ॲंडरसन या व्यक्ती हिरो आहेत असच मराठी विकिपीडियावर लिहा अस मेटाने सांगितल तर तुम्हाला ते स्विकार्य असेल काय ?
- आवेशाच्या भरात तात्कालीक कारणाने मेटाच्या हातात लगाम देण्यापुर्वी आपण झाडाच्या फांदीवर उलटे बसून फांदी कापत नाही ना? आपण ज्या तलवारीचा वापर करू इच्छिता ती दुधारी नसून आपल्यावर उलटणार नाही ना याची व्यवस्थित खात्री करत आहोत का ?
- माझ्या व्यक्तिगत मता नुसार, मराठी विकिपीडियाने सुयोग्य पद्धतीने चर्चा केली. आणि उल्लेखनीयता नाही हे पाहून मगच लेख वगळला या मुद्याने आपल्या इतर भाषी असो अथवा मेटा असो आपल्या म्हणण्यास अधिक वजन प्राप्त होते म्हणून लेखांबद्दल उल्लेखनियता चर्चा होणे चांगले असते.आणि मराठी विकिपीडियाच्या स्वतंत्र अस्मितेचे रक्षण करणे चांगले.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३३, ११ जून २०१३ (IST)
- इंग्रजी विकीपेडिया वर असे कोणते लेख वगळले गेले असल्यास त्वरित सांगावे. उल्लेखनीय असेल तर तो लेख पुन्हा लिहिण्याचा मी प्रयत्न करेन. जसा राम गबाले लेखा बाबत मी करीत आहे. मी तो लेख पुन्हा तेथे लिहिला आहे. आता इंग्रजी विकीपेडियाच्या community ची काय प्रतिक्रिया होते ते मला बघायचे आहे. धन्यवाद. आभिजीत १८:५३, ११ जून २०१३ (IST)
- नवीन तयार झालेला लेख आपण येथे बघू शकता - http://en.wikipedia.org/wiki/Ram_Gabaleआभिजीत १८:५६, ११ जून २०१३ (IST)
- इंग्रजी विकीपेडिया वर असे कोणते लेख वगळले गेले असल्यास त्वरित सांगावे. उल्लेखनीय असेल तर तो लेख पुन्हा लिहिण्याचा मी प्रयत्न करेन. जसा राम गबाले लेखा बाबत मी करीत आहे. मी तो लेख पुन्हा तेथे लिहिला आहे. आता इंग्रजी विकीपेडियाच्या community ची काय प्रतिक्रिया होते ते मला बघायचे आहे. धन्यवाद. आभिजीत १८:५३, ११ जून २०१३ (IST)
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३३, ११ जून २०१३ (IST)
- अभिजीत तुमच्या उपक्रमाचे स्वागत आणि शुभेच्छा. भारतात en:Religious violence in India आहे त्या बद्दल लेख असणे ठिक पण भारतात en:User:Mahitgar/Religious harmony in India पण आहे आणि ती मात्र इंग्रजी विकिपीडियावर en:Wikipedia:Articles for deletion/Religious harmony in India इथे पडीक आहे कारण काही जणांना भारतातली एकच Religious violence in India बाजूच दाखवायची आहे Religious harmony in India दिसू द्यावयाची नाही. इंग्रजी विकिपिडियावर Religious harmony in India लेखाची उल्लेखनीयता नाकारली म्हणून मराठी विकिपिडियावर सुद्धा नाकारली जावी असे अभिप्रेत असेल का ?
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:००, ११ जून २०१३ (IST)
- पुढील थोड्याच वेळात आपण तो लेख मुख्य नामविश्वात आणू. फक्त तो पूर्ण येणार नाही. थोड्या प्रमाणत तयार होईल. नंतर तो हळू हळू चर्चा करत करत वाढवावा लागेल. विषय अतिशय योग्य असल्याने मला जमेल तसा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्व लिखाण चर्चा पानांवर करावे आणि इतरांना ते मुख्य लेखात टाकू द्यावे. एकदा लेख stable झाला की मग तो वाढवता येईल. धन्यवाद. आभिजीत २२:३१, ११ जून २०१३ (IST)
- http://en.wikipedia.org/wiki/Religious_harmony_in_India हा लेख तयार झाला आहे. पुढील २ - ३ दिवसात त्यावरील प्रतिक्रिया बघून आपण तो वाढवू शकतो. धन्यवाद. आभिजीत २२:४९, ११ जून २०१३ (IST)
- प्रिय माहितगार आपली हा लेख तयार करण्याची कल्पनाच मला खूप आवडली. बाबा आमटे यांनी 'भारत जोडो' यासारखे आंदोलन केले होते. अधून मधून होत राहणाऱ्या घटना बघता हा लेख खूप चांगली भूमिका बजावेल यात शंका नाही. हा लेख तयार करण्याची कल्पना सुचाल्याबद्दल तुम्हाला सलाम. आभिजीत २२:५९, ११ जून २०१३ (IST)
- http://en.wikipedia.org/wiki/Religious_harmony_in_India हा लेख तयार झाला आहे. पुढील २ - ३ दिवसात त्यावरील प्रतिक्रिया बघून आपण तो वाढवू शकतो. धन्यवाद. आभिजीत २२:४९, ११ जून २०१३ (IST)
- पुढील थोड्याच वेळात आपण तो लेख मुख्य नामविश्वात आणू. फक्त तो पूर्ण येणार नाही. थोड्या प्रमाणत तयार होईल. नंतर तो हळू हळू चर्चा करत करत वाढवावा लागेल. विषय अतिशय योग्य असल्याने मला जमेल तसा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत सर्व लिखाण चर्चा पानांवर करावे आणि इतरांना ते मुख्य लेखात टाकू द्यावे. एकदा लेख stable झाला की मग तो वाढवता येईल. धन्यवाद. आभिजीत २२:३१, ११ जून २०१३ (IST)
विशीष्ट छायाचित्रांची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता
[संपादन]सदस्य:Praj0148 त्यांच्या सदस्य पानावर एका राजकीय नेत्या विषयी लेख विकसित करत आहेत.मला वाटते त्यांचे लेखन पूर्ण झाल्या नंतर ते मुख्य नामविश्वात आणतील.लेख शीर्षकाच्या उल्लेखनीयते बद्दल फारसा प्रश्न नाही.
त्या लेखात वापरली गेलेली (शेजारी नमुद) दोन छायाचित्रे वैशिष्ट्य पूर्ण आहेत.छायाचित्रांचा उद्देश लेखात पहाताना अंशत: प्रचार अथवा जाहीरात समकक्ष (इमेज बिल्डींग) वाटतो,पण अशा प्रकारच्या छायाचित्रांना काही प्रसंगी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असू सुद्धा शकते. या दोन गोष्टीत फरक कसा करावा ? अशा प्रकारच्या छायाचित्रांची ज्ञानकोशीय स्विकार्यता कशी ठरवावी
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:४३, ७ डिसेंबर २०१३ (IST)
- सदस्य:डिगांबर बोराडे मंठा या सदस्य पानावर हे चित्र आढळले या चित्राची आणि वापराची उल्लेखनीयता सुद्धा निश्चितपणे सांगता येत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५८, १५ डिसेंबर २०१३ (IST)