विकिपीडिया:नवीन माहिती/१ फेब्रुवारी २०१२
Appearance
- ...की, दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग शहरातील सिटी ओव्हल क्रिकेट मैदानावर धावांचे शतक करणाऱ्यास आणि एकाच डावात ५ बळी घेणाऱ्या खेळाडूंना मैदानावर एक झाड लावावे लागते?
- ...की, मराठी २६ जानेवारी, २०२० रोजी मराठी विकिपीडियावर एकूण ८,०२३ चरित्रलेख होते. यांपैकी २,३२६ म्हणजेच २८% लेख स्त्री चरित्रलेख तर उर्वरित पुरुष चरित्रलेख होते? इंग्लिश विकिपीडियावर हे प्रमाण १८% आहे.
- ...की, २८ जानेवारी, १९६८ ते ६ जुलै, १९६९ या दीड वर्षांत बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाच वेळा बदल झाले?
- ...की, बांगलादेश जगातले तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात?
- ...की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
- ...की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
- ...की दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा होता.
- ...की ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या वसईच्या तहाने दुसर्या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली.
- ...की अशोकाच्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगच्या युद्धातील प्रचंड जिवितहानी पाहिल्याने सम्राट अशोक याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
- ...की नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखीगडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
- ...की, मल्लिका शेरावत ही तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी होती.