वाडा तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?वाडा तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील वाडा तालुका
पंचायत समिती वाडा तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• MH04

वाडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

(1)हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार गणला जातो. (2)तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे. (3)येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते. (4)येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इ. कडधान्य मोठ्या प्रमाणात घेतात. (5)वाडा तालुक्याच्या बाजूने तानसा, भातसा, मोडकसागर अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे यांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्वपूर्ण धरणं आहेत. (6)या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणांचं काम प्रगतीपथावर आहे. (7)महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सवाॅतमोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे. (8)तालुक्यातील कूडूस येथे 100वषाॅची परंपरा असणारा (ऊरूस) वाषाॅक बाजार दरवर्षी भरतो. (9)या तालुक्यात इ. स. 5 व 6 व्या शतकात 60 फूट - 27 फूट लांबीरूदीचे कोरीवकाम असलेले खंडेश्वर मंदीराचे पुरातन अवशेष होते. तसा असणारा शिलालेख मुंबईतील म्यूझीयम मध्ये आहे. (10)तालूक्यातील मांगरूळ गावी बिटीशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत. (11)'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. (12)कोलीम सरोवर या गावाजवळ डोंगरावर तलाव आहे. (13)'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना मिळतात. (14)तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदीर, परशुराम मंदीर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो. (15)तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पयॅटन स्थळे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड


वाडा शहर नगरपंचायत आहे.