Jump to content

हमरापूर (वाडा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हमरापूर या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?हमरापूर

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .७४८ चौ. किमी
जवळचे शहर वाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
९१३ (२०११)
• १,२२१/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

हमरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.गावाच्या उत्तरेला विक्रमगड तालुका, पूर्वेला शहापूर तालुका, पश्चिमेला पालघर तालुका आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागातर्फे आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत इसवी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ह्या गावाला तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे.या गावाच्या ग्रामपंचायतीला राज्य सरकारचे दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.[]

भौगोलिक स्थान

[संपादन]

वाडा बस स्थानकापासूनराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८९ कुटुंबे राहतात. एकूण ९१३ लोकसंख्येपैकी ४४९ पुरुष तर ४६४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.१४ आहे तर स्त्री साक्षरता ६४.६८ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १०७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ११.७२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

[संपादन]

पोशेरी, मांडे, वावेघर, कंचाड, वाघोटे, करंजपाडा, गुहीर, कुर्ले, गाळतरे, नाणे, शेळटे ही जवळपासची गावे आहेत.हमरापूर ग्रामपंचायतीमध्ये हमरापूर आणि करंजपाडा ही गावे येतात.

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार,६ ऑक्टोबर २०२५