वाडा (इमारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सासवड जवळील जाधववाडी येथील एक वाडा

वाडा हा इमारतीचा एक प्रकार आहे.हे एक प्रकारचे छोटे गढीसदृश बांधकाम असते. आक्रमण किंवा चोरी/दरोडा यांपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षेसाठी या वास्तूसभोवतालच्या परिमितीवर बहुधा एक उंच भिंत बांधण्यात आलेली असते. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार लाकडाच्या जाड फळ्यांनी बनविलेले असते. हे दार बंद करण्यास, आतील बाजूस लोखंडी साखळकोंड्याची व्यवस्था असते. अनेक ठिकाणी यास अडसरही लावण्यात येतो. दारात खालच्या बाजूस एक छोटा दिंडी दरवाजा असतो. [ चित्र हवे ] या वास्तूच्या बांधकामात लाकडाचा, चुन्याचा, दगडांचा व मातीचा मुक्त वापर केलेला असतो. भिंतीत खुंट्या, कोनाडे आणि फडताळे असतात. भिंती खूप जाड असल्याने या वास्तूत नैसर्गिकरीत्या उन्हाळ्यात थंडावा व हिवाळ्यात उष्णता मिळते. वाड्याच्या दरवाज्यावर सुशोभीकरणासाठी कलाकुसरही असते. दरवाज्याच्या वरच्या लाकडी फळीत मध्यभागी एक लाकडी गणपती बसवलेला असतो. वाडा हा प्रकार मुख्यत्वे महाराष्ट्रात देशावर आढळतो. पुणे येथील काही वाडे प्रसिद्ध आहेत.

पुस्तक[संपादन]

  • महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे : भाग १ (लेखक - डॉ. सदाशिव शिवदे; स्नेहल प्रकाशन, पुणे)

हे सुद्धा पहा[संपादन]