सारशी
| ?सारशी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | .२४० चौ. किमी |
| जवळचे शहर | वाडा |
| जिल्हा | पालघर जिल्हा |
| लोकसंख्या • घनता |
७५५ (२०११) • ३,१४६/किमी२ |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | वारली |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२१३०३ • +०२५२६ • एमएच/४८ /०४ /०५ |
सारशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]वाडा बस स्थानकापासून शहापूर मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ८.३ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६९ कुटुंबे राहतात. एकूण ७५५ लोकसंख्येपैकी ३९० पुरुष तर ३६५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.३० आहे तर स्त्री साक्षरता ६३.८१ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १०५ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १३.९१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. येथे विविध गणपती कारखाने आहेत. त्यामध्ये दरवर्षी ५ ते ७ हजार गणेशमूर्ती साकारल्या जातात. अर्ध्या फुटापासून सात फुटापर्यंत गणेशमूर्ती साकारल्या जातात. ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातून येथील गणेशमूर्तीना मागणी असते.इसवी सन १९८५ मध्ये वासुदेव ठाकरे ह्यांनी ह्या गावात गणपती मूर्ती बनविण्याच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.[१]
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]सोनशिव, पेठरंजनी, विळकोसतर्फेकोणपटी, पिंपरोळी, तुसे, ऐनशेत, गंधारे,किरावळी, वारळे, विळकोसतर्फेवाडा, सारसओहळ ही जवळपासची गावे आहेत.सारशी ग्रामपंचायतीमध्ये मालोंदा आणि सारशी गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, शनिवार,२ ऑगस्ट २०२५