सोनशिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?सोनशिव
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 19°40′10″N 73°11′15″E / 19.6693°N 73.1876°E / 19.6693; 73.1876
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .५५६ चौ. किमी
जवळचे शहर वाडा
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
७२३ (२०११)
• १,३००/किमी
भाषा मराठी
सरपंच -
बोलीभाषा वारली,कुणबी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२१३०३
• +०२५२६
• एमएच/४८ /०४ /०५

गुणक: 19°40′10″N 73°11′15″E / 19.6693°N 73.1876°E / 19.6693; 73.1876


सोनशिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

वाडा बस स्थानकापासून तिळसा मार्गाने गेल्यावर श्री दत्त मंदिर गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५.८ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७१ कुटुंबे राहतात. एकूण ७२३ लोकसंख्येपैकी ३५९ पुरुष तर ३६४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.६७ आहे तर स्त्री साक्षरता ५४.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुध्दा करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुध्दा वाड्यावरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

करंजे, काडिवळी, हारोसाळे, देसई, गाळे, पेठरंजनी, विळकोसतर्फेकोणपटी, पिंपरोळी, तुसे, सारशी, ऐनशेत ही जवळपासची गावे आहेत.सोनशिव ग्रामपंचायतीमध्ये गाळे आणि सोनशिव ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/