लील
लील Lille |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
प्रदेश | नोर-पा-द-कॅले | |
विभाग | नोर | |
क्षेत्रफळ | ३९.५१ चौ. किमी (१५.२५ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२००९) | ||
- शहर | २,२६,८२७ | |
- घनता | ६,५२१ /चौ. किमी (१६,८९० /चौ. मैल) | |
- महानगर | ११,५०,५३० | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.mairie-lille.fr/en |
लील (फ्रेंच: Lille) हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर व नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाची तसेच नोर ह्या विभागाची राजधानी आहे. लील हे फ्रान्समधील चौथे मोठे महानगर (पॅरिस, ल्यों व मार्सेल खालोखाल) आहे. लील शहर पॅरिसच्या ईशान्येस २२० किमी अंतरावर तर ब्रसेल्सच्या पश्चिमेस ११२ किमी अंतरावर स्थित आहे.
अनेक शतकांचा इतिहास असलेले व फ्रान्सच्या सांस्कृतिक पटलावर मानाचे स्थान असलेल्या लीलची २००४ साली युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड करण्यात आली होती.
वाहतूक
[संपादन]युरोपाच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला एका तर युरोस्टारद्वारे लंडनला १:२० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी लीलमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा लील ओ.एस.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध
[संपादन]जगातील खालील शहरांसोबत लीलचे सांस्कृतिक संबंध आहेत.
क्योल्न
एरफुर्ट
लक्झेंबर्ग
खार्कीव्ह
लीड्स
लीज
नाब्लुस
ऊज्दा
रॉटरडॅम
साफेद
व्रोत्सवाफ
सेंत-लुईस
शांघाय
तोरिनो
वायादोलिद
बफेलो
बाह्य दुवे
[संपादन]![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-10-12 at the Wayback Machine.
विकिव्हॉयेज वरील लील पर्यटन गाईड (इंग्रजी)