Jump to content

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
1773 Düzenleme Yasası (tr); ریگولیٹنگ ایکٹ1773ء (ur); റെഗുലേറ്റിങ് ആക്റ്റ് 1773 (ml); ১৭৭৩-রেগুলেটিং অ্যাক্ট (bn); रेग्युलेटिंग अ ॅक्ट १७७३ (mr); חוק חברת הודו המזרחית 1773 (he); Regulating Act of 1773 (kn); Регулирующий акт (ru); regulating act of 1773 (hi); రెగ్యులేటింగ్ చట్టం, 1773 (te); ਰੈਗੂਲੇਟਿੰਗ ਐਕਟ 1773 (pa); Regulating Act of 1773 (en); ریگولیٹنگ ایکٹ ،1773 (pnb); 1773年制式法案 (zh); ஒழுங்குமுறை சட்டம், 1773 (ta) United Kingdom legislation (en); యునైటెడ్ కింగ్‌డమ్ చట్టం (te); ਯੂਨਾਈਟਿਡ ਕਿੰਗਡਮ ਕਾਨੂੰਨ (pa); United Kingdom legislation (en); нормативний акт Великої Британії (uk) Билль Норта (ru); रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ (mr)
रेग्युलेटिंग अ ॅक्ट १७७३ 
United Kingdom legislation
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारAct of the Parliament of Great Britain
प्रकाशन तारीख
  • इ.स. १७७३
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नियमन कायदा, १७७३ किंवा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट, १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली. लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला. इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ असे म्हणतात.[१] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. मद्रासमुंबईचे राज्यपाल त्यांच्या अमलाखाली आले. कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली. कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत. हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णतः समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात आल्या.

संदर्भ[संपादन]

  1. ^ श्रीधर व्यंकटेश केतकर. "हिंदुस्थानची राज्यव्यवस्था". २१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)