रूपा गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रूपा गांगुली

विद्यमान
पदग्रहण
४ ऑक्टोबर २०१६
नेमले प्रणव मुखर्जी[१] (कला क्षेत्रातून)
मागील नवज्योतसिंग सिद्धू

भाजप महिला मोर्चा अध्यक्षा,
पश्चिम बंगाल
कार्यकाळ
२०१५ – २०१७
मागील ज्योत्स्ना बॅनर्जी
पुढील लॉकेट चॅटर्जी

जन्म २५ नोव्हेंबर, १९६६ (1966-11-25) (वय: ५७)

[२][३]
कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
आई जुथिका गांगुली[३]
वडील समरेंद्र लाल गांगुली[३]
पती
ध्रुव मुखर्जी
(ल. १९९२; घट. २००७)
[४]
अपत्ये
व्यवसाय राजकारण, अभिनय
कार्यरत १९८६ · आजतागायत[५]
पुरस्कार

रूपा गांगुली (बंगाली:রূপা গাঙ্গুলী) या एक भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायिका आणि राजकारणी आहेत.[६] गांगुलीचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ रोजी समरेंद्र लाल गांगुली आणि जुथिका गांगुली यांच्या पोटी एका संयुक्त कुटुंबात झाला.[७][३]

बीआर चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेतील द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.[८] आपल्या अष्टपैलु अभिनय आणि उच्चारण रूपांतरामुळे बॉलीवूडच्या शबाना आझमीला टॉलीवूडचे उत्तर म्हणून अनेकदा त्या ओळखल्या जातात.[९][१०][११] त्यांनी मृणाल सेन, अपर्णा सेन, गौतम घोष आणि रितुपर्णो घोष या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. गायनातील रवींद्र संगीत प्रकारात त्यांनी गायिका म्हणून तसेच शास्त्रीय नृत्यांगना म्हणून प्रशिक्षण घेतले आहे.[१२] गांगुली यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दोन 'बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार' यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.[१३] [१४] त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे.[१५] त्यांनी 'पश्चिम बंगाल मोशन पिक्चर आर्टिस्ट फोरम' या सिने कलाकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या सरचिटणीस आणि उपाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.[१६][१७][१८] ऑक्टोबर २०१६ मध्ये, भारताच्या राष्ट्रपतींनी गांगुली यांचे राज्य सभेतील खासदार म्हणून नामांकन केले आहे.[१२]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "BJP's Roopa Ganguly nominated for Sidhu's post in Rajya Sabha". The Economic Times. 4 October 2016. 13 December 2019 रोजी पाहिले.
 2. ^ "রূপার রৌপ্য জয়ন্তী". anandabazar.com. 15 September 2012. 29 December 2019 रोजी पाहिले.
 3. ^ a b c d "Actress Roopa Ganguly on Modern Bangla Film" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2022-01-27. 21 May 2021 रोजी पाहिले – YouTube द्वारे.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
 4. ^ "I attempted suicide thrice". The Times of India. 29 September 2009. Archived from the original on 27 June 2013. 5 November 2012 रोजी पाहिले.
 5. ^ "What troubles me most is how unsafe Bengal has become for women under Trinamul". The Telegraph (India) (इंग्रजी भाषेत). 16 October 2016. 1 May 2020 रोजी पाहिले.
 6. ^ "Roopa Ganguly movies, filmography, biography and songs". Cinestaan. Archived from the original on 2018-08-18. 18 August 2018 रोजी पाहिले.
 7. ^ "Roopa Ganguly". india.gov.in. 7 November 2019 रोजी पाहिले.
 8. ^ "Netizens applaud Mahabharat's Roopa Ganguly and Nitish Bharadwaj after watching Draupadi's 'cheer-haran'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 21 April 2020. 29 April 2020 रोजी पाहिले.
 9. ^ "'I can't help acting like Abhishek's mother'". Rediff. 10 March 2017 रोजी पाहिले.
 10. ^ "Tollywood movies that prove Roopa Ganguly is a treasure to Bengali cinema | The Times of India". The Times of India. 18 August 2018 रोजी पाहिले.
 11. ^ "Has Roopa Ganguly been exploited to the full brim of her talent!". filmsack.jimdo.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 31 July 2017. 27 May 2017 रोजी पाहिले.
 12. ^ a b "Directorate of Film Festival". iffi.nic.in. Archived from the original on 14 July 2014. 10 March 2017 रोजी पाहिले.
 13. ^ "Directorate of Film Festival". iffi.nic.in. Archived from the original on 14 July 2014. 27 May 2017 रोजी पाहिले.
 14. ^ "Actor Roopa Ganguly nominated to Rajya Sabha". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 October 2016. 27 May 2017 रोजी पाहिले.
 15. ^ "'Mahabharat' Actress Rupa Ganguly To Head BJP's West Bengal Women's Wing". Huffington Post India. 31 December 2015. 27 May 2017 रोजी पाहिले.
 16. ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. Archived from the original on 22 July 2017. 7 May 2017 रोजी पाहिले.
 17. ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. Archived from the original on 22 July 2017. 7 May 2017 रोजी पाहिले.
 18. ^ "West Bengal Motion Picture Artists' Forum". wbmpaf.com. Archived from the original on 22 July 2017. 7 May 2017 रोजी पाहिले.