Jump to content

हलवा (मासे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हलवा हा एक प्रकारचा मासा आहे.

हा मासा रुपेरी आणि पांढऱ्या पाँफ्रेटांच्या कुलातला नसून भिन्न कुलातला आहे; पण दिसायला तो बराचसा रुपेरी पाँफ्रेटासारखा असल्यामुळे मासळी बाजारात यालाही पाँफ्रेट हे नाव मिळालेले आहे.याचे शरीर सापेक्षतेने मोठे असते. शरीराची लांबी सु. ६० सेंमी. पर्यंत असते; मलबार किनाऱ्यावरील माशांची सरासरी लांबी सु. ३८ सेंमी. असते. रंग गडद तपकिरी अथवा करडा तपकिरी असून त्यांत निळ्या रंगाच्या छटा असतात. पोटाकडचा भाग फिक्कट तपकिरी असतो. परांचे टोकाकडचे भाग काळसर असतात. शेपटी पिवळसर रंगाची असून तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे असतात. काळ्या पाँफ्रेटात वसा (चरबी), कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने बऱ्याच प्रमाणात असतात.

पाँफ्रेटांच्या मासेमारीची भारतातील महत्त्वाची केंद्रे पश्चिम किनाऱ्यावर द्‍क्षिण कारवार व मलबार आणि पूर्व किनाऱ्यावर विशाखापटनम्नेलोर जिल्हा ही होत.