पापलेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पापलेट

पापलेट या प्रकारचा मासा भारतआशिया खंडातील लोक खातात. पापलेटला इंग्रजी मधे पॉमफ्रेट Pomfret असे म्हणतात. खाऱ्या पाण्यातील हा मासा हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात आढळतो.

माहिती[संपादन]

पापलेटचे शास्त्रीय नाव ब्रामा ब्रामा असे आहे.मासळीच्या बाजारात पाँफ्रेट मासे पापलेट किंवा पपलेट या सामान्य मराठी नावाने ओळखले जातात. पापलेट हा पाँफ्रेट या शब्दाचाच अपभ्रंश आहे. पाँफ्रेट मासे तीन प्रकारचे असतात – करडा किंवा रुपेरी पाँफ्रेट, पांढरा पाँफ्रेट आणि काळा पाँफ्रेट. करडा आणि पांढरा पाँफ्रेट हे स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुलातले असले, तरी दोन वेगळ्या वंशांचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा व पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे. काळा पाँफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुलातला असूनफोर्मिओ वंशाचा आहे. करड्या अथवा रुपेरी पाँफ्रेटाचे शास्त्रीय नाव स्ट्रोमॅटियस अर्जेंटियस, पांढर्‍याचे काँड्रोप्लायटीस चायनेन्सिस आणि काळ्याचे फोर्मिओ नायजर आहे. व्यापारी दृष्टीने फोर्मिओ नायजर या माशाला जरी पाँफ्रेट म्हणत असले, तरी तो खरा पाँफ्रेट नव्हे.


प्रकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a93e92a93294791f