मत्स्यशेती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांगोमधील मत्स्यशेतीची तळी

मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे अनेक लोकांच्या जेवणातील पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करून त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.

समुद्रातील माशांना पर्याय[संपादन]

समुद्रात व नदीत माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते परंतु तेथील उत्पन्न अनेक कारणामुळे कमी होत आहे व खाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे हा पर्याय समोर आला.

खाण्यायोग्य माशाचे प्रकार[संपादन]

कोळंबी (जम्बो प्रॉन्स)(मायक्रोबेकियम रोझेंबर्गी)
रोहू
कोटला इत्यादी.
जीताडा
टायगर प्रॉन्स (समुद्री कोळंबी)

प्रकार[संपादन]

मत्स्यशेतीचे सानधारण दोन प्रकार आहेत:

गोड पाण्यातील मत्स्यशेती
निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती

गोड पाण्यातील मत्स्यशेती[संपादन]

समुद्राच्या व नदीच्या किनाऱ्याव्यतिरिक्त, इतर क्षेत्रात यातून झालेल्या उत्पन्नाची मागणी आहे.समुद्रकिनाऱ्यावरच्या मासे खाणाऱ्या लोकांनाही 'बदलती चव' या दृष्टीनेही तो एक उत्तम पर्याय आहे.याची निर्यातही केल्या जाउ शकते.

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेती[संपादन]

क्षाराचे प्रमाण अधिक असलेल्या पाण्यात समुद्री कोळंबीचे उत्पन्न घेता येते.याचे उत्पादनास लागणारी वेळ ही सुमारे १५०-१६० दिवस इतकी आहे.त्यामुळे वर्षातून याचे दोनवेळा उत्पन्न घेता येते.गोड्या पाण्यातील कोळंबीपेक्षा याचे वजन पर्यायाने कमी असते.

तलाव[संपादन]

हा कृत्रिम तलाव असतो.यास एका बाजूस उतार असतो.त्याने पाणी बदलणे व उत्पादन काढणे सोपे होते.याचे तळाशी चिक्कणमातीचा लेप लावल्या जातो.याची निवड,जागेची निवड, मातीचे परिक्षण व वापरावयाच्या पाण्याचे परिक्षण करून केल्या जाते.ते तज्ञांकडून केल्या जाते.तलावाचे क्षेत्र २० गुंठे तेएकर पर्यंत राहू शकते.

माशांचे खाद्य[संपादन]

कॅल्शियम व नत्र अधिक प्रमाणात असलेले सेंद्रिय पदार्थ माशांना खाद्य म्हणून वापरतात.यासाठी पाणशेवाळाचाही उपयोग होतो.कोणी भाताचा कोंडा,शेंगदाण्याची पेंडही वापरतात.