मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा१[१]मराठी भाषा व वाङ्मय विभाग[२] हा १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ.एस.एस. भोसले, प्रा. प्रभाकर मांडे या व्यासंगी प्राध्यापकांची नियुक्ती झाली व विभागाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली.

अनुक्रमणिका

विशेष योगदान[संपादन]

मराठवाडयाच्या ग्रामीण भागातून लोकसंग्रहातील प्राचीन हस्तलिखिते मिळविणे, त्यांचे संशोधन व जतन करणे असे मोलाचे कार्यही विभागात पूर्वीपासून चालत आलेले आहे. प्रा. अरविंद थिटे, प्रा. ढोके, प्रा. अरविंद कुरुंदकर  व डॉ. सुधारक चांदजकर या संशोधन साहाय्यकांनी या प्राचीन हस्तलिखितांच्या नोंदीचे कार्य केले. त्यातील काही हस्तलिखितांचे संशोधन डॉ. यू. म. पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली कै. अरविंद कुरूंदकर आणि डॉ. सुधाकर चांदजकर यांच्या सहकार्याने करुन काही पुस्तकेही विद्यापीठाच्या साहाय्याने प्रकाशित केली आहेत.[२]


थोर कलावादी समीक्षक कै. वा. ल. कुलकर्णी यांनी या विभागात शिक्षण घेणाऱ्या पहिल्या शिक्षित पिढीतील वाचकांची आणि साहित्यिकांची पिढी घडविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. यू. म. पठाण मराठी विभागाचे माजी प्रमुख संत वाङ्मयाचे  गाढे अभ्यासक  म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. लोकसाहित्य या विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी याच विद्यापीठात प्रथम झाली याचे श्रेय डॉ. प्रभाकर मांडे यांना आहे. विभागातीलच माजी विद्यार्थी नंतर विभागातच प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पुढे सदरील विद्यापीठाचे कुलगुरु असा अभिमानास्पद प्रवास असलेले मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे आदर्श होत. शिवाय त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. याप्रमाणेच या विभागाचे माजी विद्यार्थी कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला. सुरुवातीच्या काळात प्राचार्य डॉ. मा. गो. देशमुख, डॉ. ल. म. भिंगारे, प्रा. भगवंत देशमुख हे ज्येष्ठ समीक्षकही अभ्यागत प्राध्यापक म्हणून विभागात कार्यरत होते.[२]


आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि लोकसाहित्य या तीनही प्रवाहांचा अभ्यास संशोधनाचा पातळीवर चालू आहे. या विभागाने दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन प्रवाहांना अतिशय समृद्ध केले. निर्मितीच्या पातळीवर कार्य करणाऱ्या लेखकांत मोठया प्रमाणात विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. प्राचार्य रा.रं. बोराडे आणि प्रा. फ. मुं. शिंदे हे दोन्ही साहित्यिक अनुक्रमे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते दोघेही याच विभागाचे विद्यार्थी होत.जागतिक पातळीवरचे  परदेशी अभ्यासक डॉ. सोनथायमर आणि डॉ. एलिनार झेलियट यांनी या विभागास भेट देऊन दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह पाहून समाधान व्यक्त केले आहे. तसेच डॉ. दुशान डिक यांनीही येथे संशोधन कार्य केले आहे. १९८० पासून मराठी विभागात एम. फिल. च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनही दखल पात्र आहे.[२]


इ.स. २०१८ सालात मराठी विभागात पाच प्राध्यापक असून प्राचीन मराठी वाङ्मय, आधुनिक मराठी वाङ्मय, वाङ्मयाचा इतिहास] लोकसाहित्य, साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी‌-आदिवासी साहित्य प्रवाह, भाषिक कौशल्ये, प्रसारमाध्यमे व सृजनशील लेखन तसेच भाषाविज्ञान अशा अभ्यासपत्रिका अभ्यासल्या जातात. तसेच या क्षेत्रातील संशोधनाचे कार्यही तेव्हापासून अविरत सुरू आहे.[२]

मराठी विभागाचे विभागप्रमुख व कार्यकाल :[संपादन]

अ.क्र. विभागप्रमुख कार्यकाल
प्रा. वा. ल. कुलकर्णी १९५९-१९७३
प्रा.डॉ. यू. म. पठाण १९७३-१९९०
प्रा.डॉ. सुधीर रसाळ १९९०-१९९३
प्रा.डॉ. एस. एस. भोसले १९९३-१९९५
प्रा.डॉ. गंगाधर पानतावणे १९९५-१९९७
प्रा.डॉ. सुदाम जाधव १९९७-१९९९
प्रा.डॉ. शरद व्‍यवहारे १९९९-२००१
प्रा.डाॅ. बाळकृष्‍ण कवठेकर २००१-२००३
प्रा. दत्ता भगत २००३-२००५
१० प्रा.डॉ. भगवान ठाकूर २००५-२००६
११ प्रा.डॉ. प्रल्‍हाद लुलेकर २००६-२००९
१२ प्रा.डॉ. सुदाम जाधव २००९-२०१०
१४ प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर २०१०-२०११
१५ प्रा.डॉ. परशुराम गिमेकर २०११-२०१४
१६ प्रा.डॉ. सतीश बडवे २०१४-२०१७
१७ प्रा.डॉ. अशोक देशमाने २०१७ पासून

मराठी विभागप्रमुखांचे साहित्य[संपादन]

१.  प्रा. वा. ल. कुलकर्णी यांची पुस्तके :-

१) वामन मल्‍हार : वाङ्मयदर्शन  (१९४४)

२) वाङ्मयातील वादस्‍थळे (१९४६)

३) वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९)

४) वाङ्मयीन टीपा आणि टिप्‍पणी (१९५३)

५) वाङ्मयीन दृष्‍टी आणि दृष्टिकोन (१९५९)

६) श्रीपाद कृष्‍ण : वाङ्मयदर्शन (१९५९)

७) साहित्‍य आणि समीक्षा (१९६३)

८) मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५)

९) साहित्‍य : शोध आणि बोध(१९६७),

१२) न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३)

१३) हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३)

१४) साहित्‍य : स्‍वरूप आणि समीक्षा (१९७५)

१५) विविधज्ञानविस्‍तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६)

१६) मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०)

संपादित पुस्तके :-

१) मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०)

२) हरिभाऊंच्‍या कादंबरीतील व्‍यक्‍ती (१९६२)

३) मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३)

४) काव्‍यातील दुर्बोधता (१९६६)

५) मराठी समीक्षा (१९७२)

६) एका पिढीचे आत्‍मकथन (१९७५)

प्रा. डॉ. यू.म.पठाण यांची पुस्तके[संपादन]

१) भाऊसाहेबांची बखर

२) मराठवाडयातील लोककथा

३) नागेशसंप्रदाय

४) स्वामी रामानंद यांच्या संपादण्य

५) गोपाळदासकृत ‘ शुक्रदेवचरित्र ‘

६) अज्ञानसिद्धविरचित ‘ वरदनागेश ‘

७) दृष्टांतपाठ

८) स्मृतिस्थळ

९) शिवप्रभूंचे चरित्र

१०) संतसंग

११) मराठवाडयातील मराठी शिलालेख

१२) आठव - ज्ञानदेवांचा ज्ञानदेवीचा

१३) आधुनिक हिंदी कहानिया

१४) मराठी संतोकी हिंदी वाणी इत्यादी

प्रा. डॉ.सुधीर रसाळ यांची पुस्तके[संपादन]

१) कविता आणि प्रतिमा

२) काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली

३) निवडक गाडगीळ समीक्षा (संपादन)

४) साहित्यप्रकार आणि वाङ्मयाचे अध्यापन (संपादन)

५) दासोपंत विरचित गीतार्णव अठरावा अध्याय (संपादन) इत्यादी

प्रा. डॉ. एस.एस. भोसले यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१) खांडेकर : व्यक्ती आणि साहित्य

२) सूर्ययुगाची सुरूवात : प्रेरणा आणि निर्मिती

४) अधिकउणे

५) प्रात:स्मरण

६) होऊ कसे उतराई

७) प्र.के. अत्रे साहित्य आणि समीक्षा

८)   राजर्षी शाहू : संदर्भ आणि भूमिका

९)   नागरी परंपरेचे लोकाविष्कार

१०)  सारे काही जनतेसाठी

११)   तुकाराम  गाथा

प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांची पुस्तके[संपादन]

१) मूल्यवेध (समीक्षा)

२) विद्रोहाचे पाणी पेटले आहे (संशोधन)

३) दलितांचे प्रबोधन (वैचारिक )

४) मूकनायक

५) पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संशोधन)

६) वादळाचे वंशज

७) प्रबोधनाच्या दिशा (समाजचिंतन)

८) हलगी (वैचारिक)

९) चैत्य (समीक्षा)

१०) लेणी

११) दलित वैचारिक वाङ्मय (समीक्षा)

१२) साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती

प्रा. डॉ. सुदाम जाधव यांनी लिहिलेली पुस्तके [संपादन]

१) आदिवासी लोकसाहित्य

२) सौदा

३) बनारस की सुबह, लखनौकी श्याम

४) तमाशाचे अंतरंग

५) लोकनाटय स्वरुप

६) संवाद

७) भिल्ल जीवन आणि आविष्कार

८) भिल्लांची गाणी

९) आदिवासी साहित्य इत्यादी

शरद व्यवहारे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१)  लोकसाहित्य : उदगम आणि विकास

२) लोकसाहित्य : रंग आणि रेखा

३) मराठी लोकगीते

४) एकनाथांची भारुडे (संपादन)

५) लोकवाङ्मय : रूप आणि स्वरूप

६) लोकधर्मी नाटयाची जडण – घडण

७) मराठी स्त्रीगीते

८) लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप

९) लोकसंस्कृतीचा अंत:प्रवाह

प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१)  दलित साहित्य : एक आकलन

२) वाङ्मयीन चर्चा आणि चिकित्सा

३) स्वातंत्र्यवीर सावरकर – साहित्य आणि जीवननिष्ठा

४) हैद्राबादचा मुक्तिसंग्राम – एक उपेक्षित संघर्षित गाथा

५) प्रतिसाद (समीक्षालेख ) इत्यादी

प्रा. भगवान ठाकुर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१) स्ट्रीट लाईट  (कवितासंग्रह)

२) आंबेडकरी जलसे इत्यादी

प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१) वेध आणि वेधक (समीक्षा)

२) बलुतेदार  (समाजचिंतन)

३) मोगडा (वैचारिक)

४)  आले ढग .... गेले ढग  (कविता संग्रह)

५) मराठी व्याकरण आणि लेखन

६) वेदनांचा प्रदेश (समीक्षा)

७) प्रतिभेचे प्रदेश (समीक्षा)

८) पंचधारांचा प्रदेश(समीक्षा)

९)  साहित्याचे सांस्कृतिक संचित (समीक्षा)

१०)  साहित्याचे वर्तन आणि वर्तमान (समीक्षा)

११)  भंजनांचे भजन (समीक्षा)

१२) गावगाडयाचे शिल्पकार (समीक्षा)

१३) अनिवार्य मराठी : व्याकरण, लेखन आणि आकलन

१४) अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा (दलिततेरांसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर)

१५) बलुतेदार : हत्यारे आणि अवजारे

१६) साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग – १

१७) साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग – २

संपादित पुस्तके :-

१) जास्वंद  (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)

२) युवाकंप  (अनियतकालिक) : बाबा आमटे विशेषांक

३) युवाकंप  (अनियतकालिक) : नरहर कुरुंदकर विशेषांक

४) जातक  (दत्ता भगत गौरव ग्रंथ)

५) मराठवाडयातील साहित्य (सहकार्याने)

६) सार्वजनिक सत्यधर्म

७) निवडक  : उत्तम कांबळे .

प्रा. डॉ. परशुराम गिमेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१) वडारवाडी (कवितासंग्रह)

२) वणवा (कवितासंग्रह)

३) संघर्ष (कवितासंग्रह)

४) मोहाडी (कवितासंग्रह)

५) मराठवाडयातील दलितांचे लोकसाहित्य

६) साहित्य : रंग आणि रुप

७) लोककवी वामनदादा कर्डम यांची गीतरचना

प्रा. डॉ. सतीश बडवे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१. मध्ययुगीन साहित्याविषयी ...

२. संतसाहित्य समीक्षेचे बीजप्रवाह

३. साहित्याची सामाजिकता

संपादित पुस्तके :-

१. दमयंती स्वयंवर

२. मराठवाडयातील साहित्य (सहकार्याने)

३. साहित्य : आस्वाद, अध्यापन आणि समीक्षा

४. संत नामदेवविषयक अभ्यास

५. संत एकनाथ – एक समग्र अभ्यास

६. साहित्य संस्कृती आणि परिवर्तन

७. मोरोपंताची श्लोककेकावली

सध्या (?) विभागात कार्यरत असलेले प्राध्यापक :[संपादन]

१. प्रा. डॉ. अशोक देशमाने         -   प्राध्यापक व विभागप्रमुख

२. प्रा. डॉ. दासू वैद्य                -      प्राध्यापक

३. प्रा. डॉ. मीरा घांडगे            -   प्राध्यापक

४. प्रा. डॉ. रमेश जाधव            -   प्राध्यापक

५. डॉ. कैलास अंभुरे            -   सहायक प्राध्यापक

विद्यमान प्राध्यापक व त्यांची पुस्तके[संपादन]

प्रा. डॉ. अशोक देशमाने (विभागप्रमुख ) :-

१. वारकरी आविष्कार

२. मराठी कथा : रूप आणि स्वरूप

३. चंदनशिवांची कथा : स्वरूप मीमांसा

४. संत नामदेवकृत तीर्थावळीचे अभंग (संपादन)

५. ज्ञानेश्वरी अध्याय नववा (संपादन)

६. ज्ञानदेवांची वाणी (निवडक रचना) (संपादन)

. प्रा. डॉ. दासू वैद्य (प्राध्यापक) यांची पुस्तके =[संपादन]

१. नांदी (संपादन)

२. भुर्रर्र ऽऽऽ (बालकथासंग्रह)

३. तुर्तास  (कवितासंग्रह)

४. आजूबाजूला  (ललितलेख संग्रह)

५. निबंधाची वही  (संपादन)

६. तत्पूर्वी (कवितासंग्रह)

प्रा. डॉ. मीरा घांडगे (प्राध्यापक) यांची पुस्तके[संपादन]

१. मराठी नाटयवाङ्मयातील  वास्तवता एक मूल्य (संपादन)

२. दत्तवरद विठ्ठल विरचित महाभारत (वाङ्मयीन व ऐतिहासिक मूल्य)

३. स्वामी : एक शोध (प्रस्तावना आणि संपादन )

४. अनुष्टुभ (द्वैमासिक सूची)

५. महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सूची (१९१३-२००४)

६. अस्मितादर्श : सूची (१९६७-२००७)

७. अवचिता परिमळु

८. मराठी भाषा आणि शुद्धलेखन : एक विचारमंथन (संपादन )

प्रा. डॉ. रमेश जाधव  (प्राध्यापक) यांची पुस्तके[संपादन]

१. ग्रामीण कथा : वास्तवता आणि रंजकता

२. विमुक्तरंग

३. भटक्या विमुक्तांचे परिप्रेक्ष्य

४. गोर कविता

५. वसंतयुग

६. वसंतविचार

संपादित :-

१.गोरवाणी (त्रैमासिक)

२.सर्जनशीलनिर्मिती

३.सावधान – लघुकथा

डॉ. कैलास अंभुरे (सहायक प्राध्यापक) यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

१. आशययुक्त अध्यापन पद्धती : मराठी

२. समीक्षा : संदर्भलक्ष्यी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]