Jump to content

भाषावार प्रांतरचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग,बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग येणे अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली.

पूर्वार्ध

[संपादन]

ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांत केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० साली नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषतः नेहरूंना, संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया इ. स. १९३८ च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही. त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. इ. स. १९३५ साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला. इ. स. १९३७ च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले. विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर इ. स. १९३८ साली त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला. [१]

इ. स. १९३८ साली पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला [ संदर्भ हवा ] . माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचे व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हणले. इ. स. १९४६ चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात ' संयुक्त महाराष्ट्र समिती ' स्थापन झाली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यिकांनी पाठवले. या ठरावांना राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

फाजलअली आयोग

[संपादन]

फाजल अली आयोग / राज्य पुनर्रचना आयोग

स्थापना : २९ डिसेंबर १९५३

अहवाल : १० ऑक्टोबर १९५५

अध्यक्ष : फाजल अली

सदस्य : १) के. एच. पण्णीकर २) एच.ए. कुंझरू

★ शिफारशी

भारताचे भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर विभाजन करावे.

a. विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्यात यावे.

Q. मराठी व गुजराती भाषिकांचे मिळून द्विभाषिक राज्य निर्माण करावे.

एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार केला.

४. भारताच्या एकतेला प्राधान्य देणे

→ भाषिक व सांस्कृतिक एकरूपतेला प्राधान्य देऊन राज्याची निर्मिती करणे

चळवळीस सुरुवात

[संपादन]

== संयुक्त महाराष्ट्राची स्थापना== 1 may 1960

हुतात्म्यांची नावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले