Jump to content

भारत सरकार कायदा १८५८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८
युनायटेड किंगडमच्या संसदेचा सार्वजनिक सर्वसाधारण कायदा
अधिकृत नावAn act for the better Government of India. संपादन
लघुनामGovernment of India Act 1858 संपादन
देशग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र संपादन
कार्यक्षेत्र भागग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र संपादन
मालिका21 & 22 Vic संपादन
प्रकाशन तारीख1858 संपादन
आरंभ वेळ१ नोव्हेंबर 1858 संपादन
Work available at URLhttps://archive.org/details/acollectionpubl20britgoog संपादन
Legislated byयुनायटेड किंग्डमची संसद संपादन
Date of promulgation२ ऑगस्ट 1858 संपादन
Legal citation of this text21 & 22 Vict. c. 106 संपादन

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ हा युनायटेड किंग्डमच्या संसदेत इ.स. १८५८मध्ये पारित करण्यात आलेला कायदा होता. याद्वारे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर बरखास्त करून भारत मंडळ व भारतमंत्री पद निर्माण झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात येउन ब्रिटनच्या राणीची सत्ता सुरू झाली. दुसरी कायदा समिती नेमण्यात आली.संस्थानिकांच्या अंतर्गत हस्तक्षेप ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले. १ नोव्हेंबर १८५८ रोजी लॉर्ड कॅनिंगने हा जाहीरनामा इलाहाबाद येथे वाचून दाखविला.

*Pits India act 1784, ने केलेली विभागणी रद्द करण्यात आली.भारताच्या 'गव्हर्नर जनरल' ऐवजी व्हाईसरॉय नाव देण्यात आले.