विनया खडपेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विनया खडपेकर या एक मराठी लेखिका आहेत. त्या राजहंस प्रकाशनामध्ये एक संपादक आहेत.

राजहंसने प्रकाशित केलेल्या पार्वतीबाई आठवले यांच्या माझी कहाणी या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी विनया खडपेकर यांची प्रस्तावना आहे.

पुस्तके[संपादन]

  • एक होती बाय (शांता आपटे यांचे चरित्र, अनुवादित; मूळ लेखक - सुरेन आपटे)
  • देश माझा मी देशाचा (अनुवादित, सहअनुवादक - माधव भंडारी, आनंद हर्डीकर, सदानंद बोरसे, सुजाता देशमुख; मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी)
  • निवडक शकुंतला परांजपे (संपादन)
  • सूत्रचालक (कादंबरी)
  • स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : विसाव्या शतकातील परिवर्तन
  • ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर

पुरस्कार[संपादन]

  • महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार (२००७-०८) - ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर