Jump to content

बलखशेर मझारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलखशेर मझारी

सरदार मीर बलखशेर मझारी (उर्दू: بلخ شیر مزاری ; रोमन लिपी: Balakh Sher Mazari ;) (जुलै ८, इ.स. १९२८ - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी व १८ एप्रिल, इ.स. १९९३ ते २६ मे, इ.स. १९९३ या कालखंडादरम्यान अधिकारारूढ असलेला पाकिस्तानाचा पंतप्रधान होता. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष गुलाम इशहाक खान याने तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रीय विधिमंडळाचे विसर्जन करून बलखशेर मझारी याला काळजीवाहू पंतप्रधान नेमले. मात्र पाकिस्तानाच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्षाचा आदेश रद्दबातल ठरवत आधीचा पंतप्रधान नवाझ शरीफ याला पंतप्रधानपद सांभाळण्यास माघारी बोलावले.

बाह्य दुवे

[संपादन]