मेरी कोम (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मेरी कोम
दिग्दर्शन ओमंग कुमार
निर्मिती संजय लीला भन्साळी
कथा करण सिंग राठोड
प्रमुख कलाकार प्रियांका चोप्रा
दर्शन कुमार
सुनील थापा
संगीत शशी सुमन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ५ सप्टेंबर २०१४
वितरक व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स
अवधी १२२ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १५ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १०४ कोटीमेरी कोम हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटूऑलिंपिक कांस्य-पदक विजेती मेरी कोम हिचे व्यक्तिचित्र रंगवले आहे. ओमंग कुमार ह्याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता.

मुंबईमनाली येथे चित्रण झालेला मेरी कोम ५ सप्टेंबर २०१४ रोजी जगभर प्रदर्शित करण्यात आला. मेरी कोमला टीकाकारांनी पसंद केले. चित्रपटाची पटकथा, छयाचित्रण, प्रियांका चोप्राचा अभिनय इत्यादी बाबींसाठी मेरी कोमचे कौतुक केले गेले. तिकिट खिडकीवर देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बाह्य दुवे[संपादन]