Jump to content

न्यू यॉर्क (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यूयोर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू यॉर्क
New York
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द एंपायर स्टेट (The Empire State)
ब्रीदवाक्य: Excelsior
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी आल्बनी
मोठे शहर न्यू यॉर्क शहर
क्षेत्रफळ  अमेरिकेत २७वा क्रमांक
 - एकूण १,४१,३०० किमी² 
  - रुंदी ४५५ किमी 
  - लांबी ५३० किमी 
 - % पाणी १३.५
लोकसंख्या  अमेरिकेत ३वा क्रमांक
 - एकूण १,९३,७८,१०२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४०८.७/किमी² (अमेरिकेत ७वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $४८५६२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २६ जुलै १७८८ (११वा क्रमांक)
संक्षेप   US-NY
संकेतस्थळ www.ny.gov

न्यू यॉर्क (इंग्लिश: New York) हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियोक्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनियान्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमॉंट, कनेटिकटमॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यू यॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो.

न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल न्यू यॉर्क शहराशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते.


शहरे

[संपादन]

खालील सहा न्यू यॉर्क राज्यातील सर्वात मोठी शहरे आहेत.

सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या
न्यू यॉर्क शहर
८१,७५,१३३
बफेलो
२,६१,३१०
रॉचेस्टर
२,१०,५६५
यॉंकर्स
१,९५,९७६
सिरॅक्युज
१,४५,१७०
आल्बनी
९७,८५६


गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: