Jump to content

नेपच्यून ग्रह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेपच्यून या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपच्यून (वरुण)  

व्होयेजर २ यानातून घेतलेले छायाचित्र
शोधाचा दिनांक: सप्टेंबर २३, १८४६
कक्षीय गुणधर्म
इपॉक J2000
भौतिक गुणधर्म
विषुववृत्तीय त्रिज्या: कि.मी.
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: किमी [१]


नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे. या ग्रहाला हिंदीतमराठीत वरुण असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह दुर्बिणीनेच पाहता येतो.

नेपच्यून हा ग्रह युरेनसच्याही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४,४९८,२५२,९०० कि.मी. ( 30.06896348 A.U.) एवढे आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः ४९,५२८ कि.मी. आहे.

अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवतीदेखील कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते वर्तुळाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आहे. ज्यामुळे ते घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही.

नेपच्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेपच्यून ग्रहास एकूण १३ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास चुंबकीय क्षेत्रदेखील आहे.

नेपच्यूनचा शोध[संपादन]

गॅलिलिओने इ.स. १६६२मध्ये केलेल्या काही पहिल्या संशोधनांच्यावेळी त्याने आखलेल्या चित्रांकनांतील एका बिंदूत नेपच्यूनची कक्षा आढळली. एकूण १३ चंद्र आहेत

भौतिक गुणधर्म[संपादन]

अवकाशयानांनी केलेले निरीक्षण[संपादन]

नेपच्यून हा दिसायला निळ्या रंगाचा आहे.

नेपच्यूनभोवतीची कडी[संपादन]

नैसर्गिक उपग्रह(चंद्र)[संपादन]

एकूण १३ चंद्र

पृथ्वीवरूनची दृश्यता[संपादन]

पृथ्वीवरून दिसणाऱ्या नेपच्यूनची दृश्य प्रत(भासमान प्रत) +७.७ ते +८.० इतकी असते. हा आकडा +६पेक्षा जास्त असल्याने नेपच्यून नुसत्या डोळ्याने दिसत नाही.

संदर्भ[संपादन]