भुईकोट
Appearance
भुईकोट म्हणजे भूमीवर बांधलेला कोट. अर्थात, जमिनीवर बांधलेला किल्ला. मराठ्यांच्या आणि पेशवाईच्या काळात अनेक भुईकोट अस्तित्वात आले.
संरचना
[संपादन]भुईकोट हे साधारणपणे खाड्यांच्या किनाऱ्यावर बांधलेले आहेत. किल्ल्याच्या भोवताली तट असतो.पाच सहा बुरुज असतात. आतमध्ये रोजच्या वापरासाठी पाण्याची टाकी असते. शिपायांना राहण्यासाठी घरे असतात. किल्ल्याला मुख्य प्रवेशद्वार असते. असे साधारणपणे भुईकोटाचे स्वरूप असते.पालघर जिल्ह्यात डहाणू,पालघर,वसई तालुक्यात कित्येक भुईकोट आहेत. ते बरेच पोर्तुगीज काळात बांधलेले आहेत.इसवी सन १७३९ मध्ये पेशवे चिमाजी आप्पांनी वसई जिंकली त्याअगोदर माहीम, डहाणू, शिरगाव, मनोर, दातिवरे, केळवे इत्यादी किल्ले जिंकून घेतले होते.[१]
महाराष्ट्रातील भुईकोट
[संपादन]- संग्रामदुर्ग
- शनिवारवाडा
- वसईचा किल्ला
- चाकणचा किल्ला (किल्ले सुभानमंगळ)
- खर्डा-जामखेड तालुका
- परांडा
- औसा-लातूर
- ^ पुस्तक - किल्ले, लेखक:गोपाळ नीळकंठ दांडेकर,मँजेस्टिक प्रकाशन, मुंबई -४००००४.